04 February, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ६)आज आम्ही नुब्रा व्हॉलीकडे प्रयाण करत होतो. पण त्याआधी आणखी एक मुख्य आकर्षण होतं ते खारदुंगला पासचं - जगातील सर्वात उंच मोटारवाहतुकीचा रस्ता तेथूनच जातो. १६३६० फूट उंचीवर आम्ही पोहोचलो स्वर्ग दोन बोटच उर्ला होता. भारताचा तिरंगा फडकवतच आम्ही ग्रुप फोटो काढला . सैनिकांशी नेहमीप्रमाणे हितगुज करुन आम्ही डिस्कीटच्या दिशेने निघालो. इथे निसर्गाचं आणखी 

एक वेगळं रुप पहायला मिळालं ते हुंडर येथे. लडाखचं 

वाळवंट येथे आहे. उंटावरुन स्वारी, वाळूच्या टेकद्या , तर्‍हेतर्‍हेचे आकार आणि आकाशात ढगांची गर्दी. चारही बाजूला निसर्गाचच वर्चस्व. माणूस इथे शून्य आहे असं वाटत आसतानाच तिथलं आकाशवाणी केंद्र बघून धक्काच बसला. दोन बैठ्या इमारती, त्यातूनच कारभार चाललेला. छप्परही नसलेला जगातला सर्वात उंच पेट्रोलपंप सगळच आश्चर्यकारक. एका पूलाजवळ आम्ही पोहोचलो, तिथून पुढे जायला पर्यटकांना बंदी होती. त्यापुढे एक गाव व नंतर पाकव्याप्त काशिर. सैनिकांशी पुन्हा एकदा मनमोकळ्या गप्पा. वातावरण भारावलेलं.

(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates