30 March, 2009

नद्यांबरोबर समाजमन जोडलं गेलं पाहीजेडॉ. राजेंद्र सिंह

मिठी नदी सुध्दा गंगेसारखीच सुंदर होती. प्रत्येक नदीचं आपलं वेगळं सौंदर्य असतं. गंगा, यमुना असो की अन्य कोणतीही नदी, जैविक कचरा पचवण्याची तिची स्वतःची एक ताकद होती. आता माणसाने रसायन आणि धातूंच प्रदुषण केल्याने नदीची ताकद संपुष्टात आली आहे. पहिल्यांदा विचारांचं प्रदुषण दुर झालं पाहीजे. जाणिवपुर्वक प्रयत्न करून पाण्याला समजून त्यांचं संवर्धन केलं पाहीजे. नद्यांशी समाजमन जोडलं गेलं पाहीजे असे उद् गार मँगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ डॉ. रजेंद्र सिंह यानी काढले. ' गंगाजल फौंडेशन' च्या राष्ट्रीय परितोषक वितरण समरंभात ते बोलत होते. १४४ नद्यांच्या खोर्‍यात प्रवास करून त्यांचा अभ्यास करताना आलेल्या अनुभवांचं कथन करत त्यांनी अनेक समस्यांवर प्रकाश टाकला.

गंगाजल फौंडेशनचं चित्र प्रदर्शन पाहून आपण मंत्रमुग्ध झालो अशी प्रतिक्रीया देताना उत्तरेकडून पुर्वेकडे वाहणार्‍या गंगेची काळजी पश्चिमेकडचं गंगाजल फौडेशन आणि विजय मुडशिंगीकर घेतात म्हणजे गंगा जीवनधारा आहे आणि ती संपुर्ण देशाला एका सुत्रात बांधते याचं प्रतिक आहे असं ते पुढे म्हणाले. या प्रसंगी श्री. अभिजीत घोरपडे यांना गंगाजल फौंडेशनचा ' नदी मित्र " पुरस्कार देण्यात आला.

नरेंद्र प्रभू

28 March, 2009

मतदान

दान मग ते कोणतेही असूदे ते सत्पात्रीच केलं पाहीजे. मतदान हे असे दान आहे की ते रोज करता येत नाही. पाच वर्षांनी किंवा कधी कधी राजकीय नाकर्तेपणा, खोडसाळपणा, स्वार्थी राजकारण या मुळे मुदतपुर्व हे दान करावं लागतं. पारतंत्र्यातील जुलूम-जबरदस्ती, हाल अपेष्टा, आणि मुख्य म्हणजे मानहानी पाहता स्वातंत्र्याची किंमत कळते. लोकशाहीची जपणूक आपण योग्य प्रकारे करत नाही. लोकसभेत आपणच निवडून दिलेले खासदार असभ्य वर्तन करताना, गोंधळ घालताना दिसतात. भ्रष्ट, गुन्हेगार प्रवृत्तीची व्यक्ती आता तरी निवडून देता नये. खासदारकी ही कुणाची मिरासदारी ठरू नये. निवृत्तीचं वय राजकारणी मंडळींना नाही, आता ते आपणच ठरवून त्यांना निवृत्त केलं पाहीजे. 

नरेंद्र प्रभू

19 March, 2009

चला ' गंगाजल ' जाणून घेऊया

नदी, मग ती जगातली कोणतीही असूद्या, तिला अनन्यसाधारण महत्व आहे. पाण्याचा प्रश्न अतिशय स्फोटक होऊ पहातोय. अनादी काळापासून नद्यांच्या आश्रयाने अनेक संकृतींचा उदय झाला आणि त्यांची भरभराटही झाली. भारतातही नद्या आणि हिंदू संकृती एकमेकांच्या हतात हात घालून सहजीवन जगत आली. नद्यांचं महत्व जाणूनच ऋषी मुनींनी त्यांना देवत्व बहाल केलं. पुजन केलं. सहस्रावधी वर्षं माणसाला जगवणार्‍या या नद्या आता मात्र स्वतःच मृत्यूपंथाला लागल्या आहेत. त्यांची पात्रं कोरडी पडताहेत.गाळाने भरून जाताहेत. मल-मुत्र, सांडपाणी, कारखान्यातील रासायनीक कचरा, मेलेली जनावरं- माणसं यापासून विषारी खतं, धातू, सगळं सगळं नदीलाच येऊन मिळतय. नद्यांची पार गटारं होऊन गेलीत.

मुंबईची मिठी नदी घ्या, एकेकाळी गोड्यापाण्या मुळेच तीचं नाव ' मिठी ' असं पडलं, पण आजची तिची अवस्था फारच केविलवाणी आहे. आणि हे आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. पण एकवेळ मिठीचं पाणी परवडलं त्या पेक्षाही वाईट स्थिती कानपूर येथे गंगेची आहे. गंगा थेट स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली ती भागिरथाच्या तपश्चर्येमुळे पण तीच गंगा आज भागिरथाला दोष देत असेल. पुन्हा ती स्वर्गवासी होण्याच्या मार्गावर आहे. आपण नद्यांना असं का सडवलं ? पाण्याचा पर्यायाने मानवाचा हा विनाश कोण घडवून आणतय ? कोसी असो की गोदावरी या नद्या का कोपल्या ? अवर्षणाचा चटका का बसतोय ? आणि या पुढे काय वाढून ठेवलय ? हे सर्व जाणून घेण्यासाठी चला एकत्र येऊया आणि जाणून घेऊया जिवनाला... पाण्याला.

येत्या २९ मार्च २००९ ( रविवार ) रोजी. स्थळ आहे रचना संसद , प्रभादेवी, मुंबई ४०००२५. वेळ आहे दुपारी 3 वा.

कार्यक्रमात आहे प्रमुख पाहुणे मँगसेसे पुरस्कार प्राप्त, जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंहजी यांचं व्याख्यान , गंगाजल फौंडेशनने आयोजित केलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन, माहितीपट, आणि बरच काही. तेव्हा मित्रहो जरूर या. जागृत व्हा.

नरेंद्र प्रभू 


17 March, 2009

दैत्यसुदन मंदीर (लोणार)

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या गावी हे अप्रतीम मंदीर आहेलोणार सरोवरात लोणासूर राक्षस रहात होतात्या दैत्याचा भगवान विष्णूने वध केलात्याची आठवण म्हणून सहाव्या शतकात चालुक्य राजांनी दैत्यसुदन मंदीर बांधलेसन १८७८ साली मातीच्या टेकडीचे उत्खनन करताना त्याचा शोध लागलावास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदीर उत्तराभीमुख आहेसप्तस्थरीय व्हरांडा असलेल्या मंदीराच्या बाहेरील बाजुस अप्रतीम शिल्पकृती आहेत. 


 


सर्व छायाचित्रे :नरेंद्र  प्रभू

10 March, 2009

लोणार सरोवरऔरंगाबाद पासून १७० कि.मी. अंतरावर बुलढाणा जिल्ह्यात लोणार हे गाव आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपुर्वी अवकाशातून अशनीपात होऊन या ठिकाणी १८७५ मीटर व्यासाचं एक सरोवर तयार झालं. जगातील अशनीपातापासून तयार झालेलं हे तिसर्‍या क्रमांकाचं मोठं सरोवर आहे. आजुबाजुला गोड्या पाण्याचे स्त्रोत असले तरी या विवरात साठलेलं पाणी मात्र समुद्राच्या पाण्यापेक्षा खारट आहे.
लोणारला जाण्यासाठी औरंगाबादहून पहाटे सहा वाजता निघालो. वाटेत पठारी प्रदेश असल्याने दूर क्षितीजापर्यंत पसरलेली शेतं दिसत होती. काही ठिकाणी नदीवर घालतलेले बांध दिसले तर एका ठिकाणी नदीच्या पात्रातच विहीरी दिसल्या . वाटेत सिंधखेडराजा हे विरमाता जिजाऊ यांचं जन्मगाव लागलं. या प्रदेशावर मोगलांची सत्ता असल्याने जिजाबईला त्यांच्या जाचाची चांगलीच कल्पना होती म्हणून स्वराज्याचे स्वप्न जिजाऊने पाहीले व पुढे शिवबाला दाखवले. त्याची मनात उजळणी चालू होती. हा पठारी प्रदेश दुरवर नजर फिरवता येते, पण कोकणात, पच्छिम महाराष्ट्रात जसे कडे-कपारी आहेत तशी परिस्थीती इथे नाही. शिवजीमहाराजांची युध्दनीती विषेशतः गनिमी कावा म्हणूनच मोगलांना महागात पडला व दक्षिण विजय मिळवता आला नाही.
भुकेने इतिहासातून बाहेर काढले. सिंधखेडराजा गावात एका ठिकाणी चवदार मुगवडे, भजी, चहा मिळाला. पोटपुजा झाली बरं वाटलं. जवळच द्राक्षबागेतून काढून आणलेली ताजी द्राक्ष मिळाली, छान होती. ' वेडी-वाकडी वळणे वाहने सावकाश हाका ' असले फलक रस्त्यांवर नव्हते लांबवर दिसणारे सरळ रस्ते, प्रवास मजेत चालला होता. दोन्ही बाजूला असलेली शेतं सोबत करत होतीच.
एक वळण घेऊन निघालो आणि लोणारचं अंतर दाखवणारे मैलाचे दगड दिसायला लागले. लोणारची माहिती देणारे श्री. बुकदाणे सर भेटतील का ? मनात विचार आला. बुकदाणे सर भेटले तर काम सोप होईल, पण बुकदाणे सर प्रकृती अस्वास्थ्या मुळे भेटले नाहीत त्यानी आपला विद्यार्थी शैलेश सरदार (मो.. ९७६३५४५१६९) याला पाठवलं . या पठ्ठ्याने मात्र पुर्ण परीसर, लोणार सरोवर , रामगया हे यादवकालीन रामाचं मंदिर (या मंदीरात आता रामा ऎवजी कृष्णाची मुर्ती आहे.) दाखवलं . अरे हो पण आम्ही सुरवात कमळजा देवीच्या मंदीरा पासून केली. तर हे कमळजादेवीचं मंदिरही यादव कालीन आहे. या मंदीरात चक्रधर स्वामींचं आसन आहे. कमळजादेवी हे तेथील ग्रामदैवत , दरवर्षी जत्रा भरते त्यामूळेच एवढ्या सुंदर कोरीव मंदीरात ग्रामस्तानी रंग काढून मुळ सौंदर्य नष्ट केलं आहे. अजून बाहेरून रंग काढलेला नाही हे नशीब. अशनीपातामूळे इथल्या दगडात चुंबकीय शक्ती निर्माण झाली आहे. होकायंत्राची सुई गोल फिरते. पुढे तळ्याच्या काठाने चालत गेलं की विष्णू मंदिर, रामगया मंदिर , रामेश्वराची आयताकृती पिंडी (दक्षिण भारतात अशीच पिंडी आहे.) अशी मंदीरे लागतात. संपन्न कला-संकृतीचं प्रतीक. वर चढून आल्यावर लोणारच्या धारेजवळ गेलो. हे धारेचं पाणी अठरा कि.मी. वरून जमिनीखालून येतं, बरेच लोक इथे आंघोळ करताना दिसले.
पुढे ५०० मीटरवर मोठा मारूती मंदिर आहे. हा मारूती हात उशाला घेऊन झोपलेला आहे. त्याच्या जवळ होकायंत्र नेल्यास सुई फिरते आणि चुकिची दिशा दिसते. हे मंदिर कानेटकर घराण्याच्या मालकीचं आहे. एवढं सगळं करेपर्यंत एक वाजून गेला होता. दैत्यसुदन मंदीराला भेट देऊन आम्ही शैलेशचा निरोप घेतला. वेळ व पैसा सार्थकी लागला होता.
परत येताना सिंधखेडराजाला आलो तर तिथे एक मिरवणूक निघाली होती. बहुतेक ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सदस्यांची असावी. उत्साही कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांना उचलून घेतलं होतं. ते अवघडले होते. सहन करता येत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थीती, पुन्हा खालचा चिडता किंवा चिरडता जाऊ नये याची काळजी घ्यावी लागत होती. सकाळी जाताना जिजाऊचं वाटलेलं हे गाव आता जागं झालं होतं. सिंधखेडराजाचे आताचे राजा माणसांवर स्वार झाले होते. आताचं राजकारण पण तसच नाही का ? थेट माणसांना चिरडणारं .

जालना जवळ आलं तसं रस्त्याशेजारी धाबे, रेस्टॉरंटची गर्दी दिसू लागली. त्यापैकी एका धाब्यावर जेवलो. जेवण चागलं होतं. १२ तासांहून जास्त फिरुनही उत्साह कायम होता.  
लेखकः नरेंद्र  प्रभू


05 March, 2009

मासिक अंतराळामध्ये नरेन्द्र प्रभू

मासिक अंतराळात या ब्लॉगमधिल लेख वापरले आहेत त्याची लिंक पुढे दिली आहे.

http://antaraal.com/e107_v0617/content.php?content.1391


03 March, 2009

हल्ला मानवतेवरचा

आज श्रीलंकेच्या खेळाडूंवर तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला, त्याचा आता जगभरातून निषेध होईल. पण जग या प्रवृत्ती विरूध्द एकत्र येणार आहे का ? श्रीलंका तर या विरोधात काही करेल असं वाटत नाही. लिट्टे विरूध्दची लढाई अजुन त्यांना जिंकायची आहे. परंतू जगाला तत्वज्ञानाचे डोस पाजणार्‍या अमेरीका आणि युरोपीय देशांनी आता कृती करावी. पाकिस्तानाला दिली जाणारी मदत आतिरेकी कारवाया साठी भारताविरूध्द वापरली जातेच, पण आता इतर देशही त्याचे बळी जात आहेत.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या मुंबईवर हल्ला झाला, आता थेट क्रिकेटवरच हल्ल झाला आहे. पाकिस्तान वर बहिष्कार आणि मुंबईत येणं टाकून हे प्रश्न सुटणार नाहीत, तर या प्रवृत्तीचं समुळ उच्चाटन केलं पाहीजे. अतिरेक ही वृत्ती आहे त्या विरूध्द आता संपुर्ण जगानेच आवाज उठवणं जरुरीचं आहे.

लेखकः नरेंद्र  प्रभूश्रीलंकेच्या खेळाडूंवर तालिबानी अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या निमीत्ताने

" युद्धाची परिस्थिती आहे, दहशतवाद आहे आणि हिंसाचार दिसतो आहे. आपले अर्थकारण दुबळे झाले आहे. हावरटपणा आणि बेजबाबदार वर्तनामुळे तर ही वेळ आली आहेच; पण नव्या काळातील नवा देश घडविण्यात आलेल्या सामूहिक अपयशाचा देखील तो परिपाक आहे. आमची घरे गेली आहेत, रोजगार हिरावून घेतले जात आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत. आमची आरोग्य व्यवस्था महागडी आहे, आमच्या शाळा उदार नाहीत. ज्या पद्धतीने आपण वागतो आहोत त्यामुळे आपण वसुंधरेलाच रोज इजा पोहोचवत आहोत. हे सारे पेचप्रसंगाचे निदर्शक आहेत. यामुळे एक भीती निर्माण झाली आहे. “ हे वर्णन भारताचे नाही, चमकलात ना ? हो ! हे आहे अमेरिकेचे वर्णन. शपथ घेतल्यावर बराक ओबामांनी आपल्या भाषणात केलेलं.

जगभरातल्या दहशतवादाला खतपाणी घालणे, तिसर्‍या जगात सतत हस्तक्षेप करणे, अलिप्त देशाना सतत धमकावणे, पाकिस्तानला सर्वप्रकारची मदत करणे, व्हिएतनाम पासून इराक पर्यत युध्द आरंभणे, इस्त्राईलला गाझापट्टीत हल्ले सूरू ठेवण्याची मुभा देणे. आणि एंरॉन पासून बुडवण हि अमेरिकेची नजिकच्या भुतकाळातली कामगिरी.

सतत भोगवादाचीच पुजा करणार्‍या अमेरिकेला आता शास्वतमुल्य आणि परंपरेची आठवण झाली आहे. पैसा असला की हे आठवत नाही, तो गेला की पायाखालची वाळू सरकते, अमेरिकेचं आता तसच झालं आहे. जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र असलेल्या अमेरिकेला आता गरिबीची भिती वाटत आहे. बराक ओबामांच्या रुपात त्याना आता एक आशेचा किरण दिसत आहे. मनाची श्रीमंती त्यानी दाखवली आहेच, आता कृती पाहूया.

लेखकः नरेंद्र  प्रभूLinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates