19 March, 2009

चला ' गंगाजल ' जाणून घेऊया

नदी, मग ती जगातली कोणतीही असूद्या, तिला अनन्यसाधारण महत्व आहे. पाण्याचा प्रश्न अतिशय स्फोटक होऊ पहातोय. अनादी काळापासून नद्यांच्या आश्रयाने अनेक संकृतींचा उदय झाला आणि त्यांची भरभराटही झाली. भारतातही नद्या आणि हिंदू संकृती एकमेकांच्या हतात हात घालून सहजीवन जगत आली. नद्यांचं महत्व जाणूनच ऋषी मुनींनी त्यांना देवत्व बहाल केलं. पुजन केलं. सहस्रावधी वर्षं माणसाला जगवणार्‍या या नद्या आता मात्र स्वतःच मृत्यूपंथाला लागल्या आहेत. त्यांची पात्रं कोरडी पडताहेत.गाळाने भरून जाताहेत. मल-मुत्र, सांडपाणी, कारखान्यातील रासायनीक कचरा, मेलेली जनावरं- माणसं यापासून विषारी खतं, धातू, सगळं सगळं नदीलाच येऊन मिळतय. नद्यांची पार गटारं होऊन गेलीत.

मुंबईची मिठी नदी घ्या, एकेकाळी गोड्यापाण्या मुळेच तीचं नाव ' मिठी ' असं पडलं, पण आजची तिची अवस्था फारच केविलवाणी आहे. आणि हे आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. पण एकवेळ मिठीचं पाणी परवडलं त्या पेक्षाही वाईट स्थिती कानपूर येथे गंगेची आहे. गंगा थेट स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली ती भागिरथाच्या तपश्चर्येमुळे पण तीच गंगा आज भागिरथाला दोष देत असेल. पुन्हा ती स्वर्गवासी होण्याच्या मार्गावर आहे. आपण नद्यांना असं का सडवलं ? पाण्याचा पर्यायाने मानवाचा हा विनाश कोण घडवून आणतय ? कोसी असो की गोदावरी या नद्या का कोपल्या ? अवर्षणाचा चटका का बसतोय ? आणि या पुढे काय वाढून ठेवलय ? हे सर्व जाणून घेण्यासाठी चला एकत्र येऊया आणि जाणून घेऊया जिवनाला... पाण्याला.

येत्या २९ मार्च २००९ ( रविवार ) रोजी. स्थळ आहे रचना संसद , प्रभादेवी, मुंबई ४०००२५. वेळ आहे दुपारी 3 वा.

कार्यक्रमात आहे प्रमुख पाहुणे मँगसेसे पुरस्कार प्राप्त, जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंहजी यांचं व्याख्यान , गंगाजल फौंडेशनने आयोजित केलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन, माहितीपट, आणि बरच काही. तेव्हा मित्रहो जरूर या. जागृत व्हा.

नरेंद्र प्रभू 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates