11 April, 2009

पुन्हा वस्त्रहरण

मालवणी नाटकांचा अनभिषीक्त सम्राट मच्छिंद्र कांबळी आणि लेखक गंगाराम गवाणकर यांनी केवळ एक नाटक केलं असतं तरी ते नट आणि नाटककार म्हणून याच उंचीवर असले असते असं नाटक म्हणजे वस्त्रहरण. कै. मच्छिंद्र कांबळी असताना तीन प्रयोग मी पाहीले. मच्छिंद्र कांबळींनी जीवनपटा वरून अनपेक्षिक्तरीत्या एक्झिट घेतली आणी मालवणी रंगभुमीचच वस्त्रहरण होतं की काय अशी शंका आली पण श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी यांनी show must go on हे खरं करून दाखवलं आणि भय्या बरोबरच वस्त्रहरणही रंगमंचावर आणलं.

आज नव्या संचातलं वस्त्रहरण पाहीलं. मा. दिनानाथ मंगेशकर नाटयगृह हाउसफुल होतं. नाटकाला दादही पुर्वी सारखीच. जुना सरपंच बाजूला ठेवून नाटक पाहीलं तर मजा पण येते. सर्व कलाकार विशेषतः गोप्या मन जिंकून जातो. तरी सुध्दा नाटकभर मच्छिंद्र कांबळी आठवत राहतो. खर्‍या नटाची जागा तशी रिकामी राहतेच ना ? पाच हजाराव्या प्रयोगाकडे घोडदौड करणार्‍या वस्त्रहरणला मनःपुर्वक शुभेच्छा !

नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates