07 September, 2009

देवगिरीचा किल्ला

औरंगाबादला जात असतानाच अंकाईचा किल्ला ट्रेन मधून पाहिला होता. सह्याद्रीच्या या रांगेतलाच पुढचा किल्ला म्हणजे देवगिरी. यादवकुळ देवगिरीवर राज्य करत होते. अल्लाऊद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला करून तो हस्तगत केला. पुढे कित्तेक वर्षे निजामाची राजधानी याच किल्ल्यावर होती. २५ जुलै १६२९ या दिवशी लखुजी जाधवांचा त्यांच्या तीन पुत्रांसह मुजर्‍यास आले असता खुन झाला, तो घातही या किल्ल्याने पाहिला. अशी इतिहासाची पार्श्वभुमी आठवत आम्ही इथे गेलो. या किल्ल्याचे काही बुरूज अजुनही शाबूत आहेत. एका पहाडावर किल्ला आणि चोहोबाजूस खाई अशा या किल्ल्यावर पंधरा मिनीटात चढून गेलो. निजामने हा किल्ला ताब्यात आल्यावर तिथे एक चाँदमिनार तेवढा बांधला. तो चाँदमिनार परकीयांनी भोसकलेल्या सुर्‍या सारखा नजरेला खुपत होता. हा किल्ला औरंगाबाद पासून १६ कि.मी. अंतरावर आहे.
बीबीचा मकबरा
बीबीचा मकबरा हा आगरा येथील ताजमहालची प्रतिकृतीच आहे. औरंगजेबाची बायको रुबियाची ही कबर आहे. हा मकबरा त्याचा मुलगा शाहजादा आजम शाहने बांधला. हा पाहून ताजमहालचा भास होतो. एकदा तरी भेट द्यावी असं हे ठिकाण आहे.
पानचक्की

समाजसेवेचं व्रत घेतलेली व्यक्ती काय करू शकते त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. लोकप्रिय संत बाबाशाह मुसाफिर यांचं हे निवासस्थान. या स्थानापासून ८ कि.मी. उत्तरेकडून डोंगरावरून मातीचा एक जलमार्ग बांधून पाणी आणलं आहे. हे पाणी एका हौदात पडतं. त्या हौदातून एक प्रवाह जात्याच्या लोखंडी पट्ट्यावर पडतो आणि जातं फिरतं. त्या जात्यातं पुर्वी गरीब लोकाना धान्य दळून दिलं जात असे.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates