17 September, 2009

त्या माय-बापाला शतशः प्रणाम...!प्रसाद नागेश घाडी. ज्याला देव पाठीचा कणाच द्यायला विसरला असं बाळ. कुठलीही शारीरिक

हालचाल करायची असली तरी त्याच्या दुसर्‍याच्या आधाराची गरज भासायची. ताठ मानेनं

बसण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना त्याच्या काखेत हात घालून, त्याच्या शरीराची वर-खाली

हालचाल करून पाठीचे मणके एकात एक घट्ट बसले आहेत याची खात्री करून, पाठीचा कणा

ताठ करून मगच त्याला बसवावं लागायचं. अशा या मुलाला त्याच्या आई-वडीलानी एवढ्या

जिद्दीने वाढवलं की त्याला तोड नाही. मानेखाली जवळ जवळ लुळा असलेल्या प्रसादला त्याच्या

एकवीस वर्षांच्या आयुष्यात या माय-बापाने क्षणाचंही अंतर दिलं नाहीच पण त्याच्यातील कला

गुणाना ओळखून त्याच्या प्रतिभेला वाट करून दिली. या अशा जीवनाचंही त्याने कसं सोन केलं बघा.


त्याची आई शरयूनं त्याच्यातल्या उपजत कलेला, चित्रकलेला आणि गाण्याला

प्रश्नेत्साहन दिलं. प्रदीप जोशींकडे तो शास्त्रीय संगीताचे धडे घेऊ लागला.

चौपाटी समोरच्या बालभवनमध्ये चित्रकलांच्या स्पर्धेत भाग घेऊ लागला. चित्र काढता काढता,

गाणी गाता गाता, छोटय़ा-छोटय़ा कविता करता करता, त्याच्या शिक्षिका आईने,

त्याच्यात ‘ऐकण्याची आवड’ निर्माण केली.

त्याच्या या सर्व कलागुणांची दखल घेतली गेली आणि प्रसादला २०००-२००१चाबालश्री

हाराष्ट्रपती पुरस्कार’मिळाला.

सलग दोन - तीन तास हातात पेन्सिल धरू न शकणाऱ्या प्रसादने लेखनिकाच्या मदतीने

दहावी शालांत परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले.

२००३ मध्ये तो सर्व बालगायकांबरोबरनक्षत्रांचे देणेमध्ये सहभागी झाला. केवळ दोन गाणी

गाऊन हालिटल चॅम्पअनेक रसिकांच्या मनात जाऊन बसला.

प्रसादच्या एकटय़ाच्या गाण्याचाजिद्दीचे गाणेहा सलग तीन तासांचा कार्यक्रम सादर झाला.

झी मराठीने त्याच कार्यक्रमात ‘आता खेळा नाचा’ ही नक्षत्रांचे देणे मालिकेतली डीव्हीडी रिलीज केली.

लहानपणी इतिहासाच्या अभ्यासातल्या गडांची प्रत्यक्ष माहिती व्हावी. म्हणून त्याच्या वडिलांनी

त्यालाखांद्यावर बसवूनप्रतापगडसुद्धा चढून पार केला.

आपल्या गाण्याच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर, दुबईच्या महाराष्ट्र मंडळाचं सन्माननीय

आमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या आई-वडिलांनाही परदेशवारीचा आनंद उपभोगू दिला.

कलेच्या साधनेमुळे रु. ५०,००० चा मानाचानॅशनल अ‍ॅबिलिटीपुरस्कारही पटकावला.

प्रसादच्या कलागुणांनी आणि शरयू नागेशच्या हसतहसत दु:ख स्वीकारण्याच्या जिद्दीने
प्रभावित होऊन माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी आपल्याआधीच्या राष्ट्रपतींनी सन्मान
केलेल्या याबालश्रीला पुन्हा एकदा भेटीसाठी निमंत्रण पाठवलं. त्याच्या एका चित्राचा स्वीकार केला.

डॉ. बात्रा पॉझिटिव्ह हेल्थपुरस्कार दिला गेला.
नागेश घाडींच्या कुटूंबात जन्मला नसता तर...! तर त्याला हे आयुष्य असं जगता आलं असतं काय़ ?
असा प्रश्न पडतो. त्या माय-बापाला शतशः प्रणाम...!

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates