05 October, 2009

प्रचार अडला


(महाराष्ट्रात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने प्रचाराचा खेळखंडोबा झाला. उमेदवारांची तर पाचावरधारण बसली. तेव्हा असं झालं.)

(चाल: सुर्य उगवला प्रकाश पडला)


पाऊस पडला,प्रचार अडला,आडवा उमेदवार

आडवा उमेदवार, तयाचा मला नमस्कार


अग.. गग.. गगा...... चिखल झाला

देवा रे देवा कुर्ता भिजला

आता काय मी करू

रविवार गेला

आता कुणाला सांगू

प्रचार बुडला

दिवस गेला, प्रचार रडला, प्रचार बुडला हो !


काय क्रोध त्याचा झाला

आज पावसाने घाम फोडीला

त्याने प्राण कंठासी आला

आय आय आये प्रचार बुडला गे..


यावर एकच उतारा

चमचे सगळे मागे सारा

जनसेवा खरीच करा

प्रचार करण्याची पाळीच ना ये..


मतदार राजा ताsssरी लवकर

श्री गणेशाsss अन् खरच काम

जनताजनार्दन की जयLinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates