01 February, 2010

भिगवण – पक्षांचे निवासस्थान


गेले दोन दिवस भिगवणला होतो. पुण्यापासून १०५ किलोमीटर आणि बारामती पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेलं भिगवण हे ठिकाण पक्षी निरीक्षणासाठी अगदी योग्य असं स्थान आहे. उजनी धरणाच्या जलाशयाचा फुगवटा बारामती जवळच्या भिगवण या गावा पर्यंत पसरला आहे. पानथळ जागेत वास्तव्यला असलेले रोहीत (Flamingo), अनेक प्रकारचे बगळे, बदके, पाणकोंबड्या, समुद्रपक्षी (Greater Flamingo, Stork, Moorhen, Seagulls, Geese), वेडा राघू एक ना अनेक पक्षी सर्वत्र वावरत होते. दोन वेळा रोहीत पक्षांची भरारी पहायला मिळाली. जलाशयाच्या मधूनच जाणारा रहदारीचा रस्ता असल्याने हे पक्षी माणसाच्या हालचालीना सरावलेले होते. त्यामुळे अगदी जवळून त्यांच दर्शन घेता येत होतं. सुखद थंडी आणि आल्हाददायक असा परिसर असल्याने पक्षीनिरिक्षणाचा आनंद घेत आला.
भिगवणला रहाण्याची हॉटेलची उत्तम व्यवस्था आहे.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates