15 April, 2010

सारंगताई


हे झाड कुठचं ओ ? हा प्रश्न तसा साधा पण त्यातल्या मालवणी भाषेतल्या हेलाने माझं लक्ष वेधून घेतलं. या बाई थेट मालवणहून सहलीला आल्या असतील असा माझा समज झाला. पन्हाळा आणि पुढे दांडेली अभयारंण्यात फिरताना मात्र आम्ही कायमचे मित्र झाले. सारंगकाका आणि ताई त्या नंतर अनेक सहलींना भेटल्या आणि ऋणानुबंध वाढत गेले. काल त्यांनी घेतलेला D70 कॅमेरा दाखवायला आल्या. येताना कोकणातल्या फणसाचे गोड गरे आणि मालवणी खाजं आणायला विसरल्या नाहीत. मालवणी माणसाला फणसाची उपमा देतात, बाहेरून काटे आणि आतून गोड. पण या सबाह्य गोड स्वभावाच्या. महापालिकेच्या शाळेतून शिक्षीका म्हणून निवृत्त झाल्या पण घरात बसून राहील्या नाहीत. झाडं फुलं यांची खुप आवड, फिरण्याची आवड, जंगलातून फिरताना एखादा प्राणी दिसला की एवढ्या खुश होतील की सांगता सोय नाही. एकदा असाच ताडोबात वाघ दिसला तर या लहानमुलासारख्या उत्साहाने ओरडल्या काय नाय वाघ...!, दिसता बघा कसो...! बाबा माज्या केदो मोठे......, जंगलचो राजोच तो...! त्यांच्यातलं लहान मुल अजून जागं आहे. वयाच्या सदुसष्टव्या वर्षी मधूमेह, स्लिपडीस्कचा त्रास असूनही शिरापडो तेच्यार म्हणत, त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत, आपण आनंदी राहत आणि इतरांना आनंद देत त्या त्यांच्या बालसुलभ स्वभावाप्रमाणे अनेक क्षेत्रात अजून खुप शिकायचं आहे म्हणून रस घेतात आणि प्रश्न विचारतात. आता फोतोग्राफी शिकायची आहे म्हणून म्हणत होत्या. हे असं जगलं पाहीजे. सारंगताईंकडून जगण्याची कला शिकली पाहीजे.                    
LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates