25 May, 2010

ए पब्लिक है, सब जानती है


या पुढे रत्नागिरी टिळकांची नव्हे तर नरेंद्र महाराजांची भूमी म्हणून ओळखली जाईल इती भास्कर जाधव ही बातमी वाचून हसावं का रडावं तेच समजेना. कोण हे नरेंद्र महाराज? ज्याला लोकमान्य टिळकांच्या जागी बसवायला जाधव निघालेत. काही वर्षांपुर्वी एक सामान्य ग्रामसेवक असलेला, सामान्य वकुबाचा माणूस स्वतःला स्वतःच शेंदूर फासून देव होवू पहातोय. अगोदर दगडाला शेंदूर फासला जात होता तिथपर्यंत ठिक होतं, तो दगड स्वतः उठून कुणाला नादी लावत नव्हता. अशा प्रकाराना रोखायचं सोडून आजचे राजकारणी त्यांची पाद्यपुजा करतना दिसताहेत. हेच ते महाराज ज्यानी आपल्या हातातली काठी खांद्यावर घेऊन उत्तरप्रदेशात विमानात प्रवेश करण्याचा हट्ट धरला होता आणि सुरक्षा यंत्रणेने मज्जाव करताच मुंबईत त्याच्या बगलबच्च्यांनी विमानतळावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आपल्या काठीचा प्रसाद दिल्यावर त्याची पांगापांग झाली हा भाग वेगळा.

गर्दी दिसली की लगेच हात धूऊन घ्यायची आजच्या फुढार्‍यांना एवढी घाई झालेली असते की विचारता सोय नाही. त्या नरेंद्र महाराज्याने जमवलेल्या गर्दीला भुलून जाधव, तोगडीया अशी भुतावळ तिकडे गेली आणि मग तोंडाला येईल ते बोलली. त्यांचं सुद्धा बरोबरच आहे. ज्या सरकारात जाधव आहेत त्याचे म्होरकेच जर वर्षावर जाहीरपणे सत्य साईबाबाची पाद्य पुजा करतात, मग एखाद्या राज्य मंत्र्याने नरेंद्र महाराजाचे पाय  धरले तर सामान्यांनी बघायचं तरी कुणाच्या तोंडाकडे?

पण मुळ मुद्दा वेगळाच आहे. या राजकारण्यांची वक्र दृष्टी आता महाराष्ट्रातल्या लक्षावधी देवळांकडे, नव्हे नव्हे त्यांच्या सपत्तीकडे वळलेली आहे. त्याचच हे मार्केटींग असावं. पण त्यासाठी आमच्या श्रध्दा स्थानांना हात लावायचा कुणालाच अधिकार नाही. काय सांगाव? उद्या छत्रपती शिवाजी महराजांचा महाराष्ट्र तुम्ही अशाच एखाद्या बाबाला आंदण द्याल हो..... हे कसं चालऊन घ्यायचं? अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक बासनात गुंडाळून ठेवणारं हे सरकार अंधश्रद्धेला खतपाणी घालायला निघालय. घाला, सध्या मुजोरांची चलती आहे, पण एक लक्षात घ्या, जनता वेडी नाही, ए पब्लिक है भाई, सब जानती है।     

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates