22 October, 2010

नको नको रे पावसा




नको नको रे पावसा
असा घालू धुडगूस
गेला दसरा सरून
आले दिवाळीचे दिस

तुझ्या संगे वारा वेडा
हालवतो झाडा पेडा
विज करीते कडाडा
असा करू नको राडा

किती अधीर झालास?
आज दिस आहे खास
कशी करू मी आरास?
जीव होतो कासावीस

झाली ना रे लगबग
पाहूण्यांची लागे रांग
आता जरा धर तग
माझा होई राग राग

तुला बोलावले नाही
हाच गुन्हा कारे होई?
समजून जरा घेई
नको ना रे करू घाई

पिक हाताशी आलेले
असे मातीमोल झाले
रिण फेडू कसे सांग
पापणीत आले ढग

नको नको रे पावसा 

7 comments:

  1. far chan kavita aahe....nako nako re pavsa...

    Manisha:

    ReplyDelete
  2. मनिषा, आता हा अवेळी पडणारा पाऊस सगळ्यानाच नकोसा झालाय.

    ReplyDelete
  3. कविता छान झाली आहे.
    'पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा'

    ReplyDelete
  4. विजयजी, आपण म्हणता ते बरोबर आहे. आपण पराधीनच आहोत, निसर्गापुढे काय चालत नाही म्हणून कविता लिहिली.

    ReplyDelete
  5. मला तुमची ही कविता खुप आवडलीय... आणि मी या पोस्टची लिंक माझ्या फेसबुकवर दिली आहे. चालेल ना?

    ReplyDelete
  6. मृण्मयी, धन्यवाद.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates