28 October, 2010

‘आदर्श’ सहकार ?तीन दिवसांपुर्वी आशेचा किरण या पोस्ट मध्ये डॉ. गिरीश जाखोटिया यांनी दाखवलेला मार्ग अनुसरून आपण भ्रष्टाचाराचा मुकाबला करू शकू असं वाटत असतानाच आज हे आदर्श सोसायटीचं प्रकरण बाहेर आलं आणि त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या पासून सर्वच राजकिय पक्षांचे नेते, आमदार खसदार, सनदी अधिकारी, दोन माजी लष्कर प्रमुख यांचा समावेष आहे हे पाहून या सर्वांची तोंडं किती मोठी झाली आहेत हेच दिसून येत आहे. कन्हयालाल गिडवाणी या कॉग्रेसच्या नेत्याचे तर या एकाच सोसायटीत तीने फ्लॅट आहेत. आपण सारे भाऊ भाऊ भ्रष्टाचाराचा घास वाटून खाऊ ही म्हण आणखी रुढ होत आहे. आता पाहूया दिल्लीच्या मॅडम काय कारवायी करतात ते?       

महाराष्ट्र टाईम्स मधली ही बातमी वाचा


मटा ऑनलाइन वृत्त मुंबई
लष्करी अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधलेल्या आदर्श सोसायटीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सासूबाईंचा फ्लॅट असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी हा महिती प्रसिद्धी माध्यमांना दिल्याचे समजते. भगवती मनोहरलाल शर्मा या चव्हाण यांच्या सासूबाई आहेत.

कारगिल युद्धात शहीद झालेल्यांच्या पत्नींना घरे देण्यासाठी हा भूखंड लष्करी अधिकाऱ्यांनी मिळवला. प्रत्यक्षात तेथे एकाही अशा दुदैर्वी वीरपत्नीला फ्लॅट मिळाला नाही. तेथे लष्कराच्या आजी आणि माजी ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी फ्लॅट्स बळकावले अशी तक्रार नौदलाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केली. कारण हा टॉवर नौदलाच्या संवेदनशील भागाला खेटूनच उभा राहीला आहे.

आता असे उघडकीस आले आले आहे अनेक राजकीय नेते आणि सनदी अधिकारी यांनीही तेथे फ्लॅट्स मिळवले आहेत ..

यामध्ये, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सुरेश प्रभू अशी नावे आहेत. तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव शंकरन, भारतीय परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ अधिकारी देवयानी खोब्रागडे, मुंबईच्या माजी जिल्हाधिकारी कुंदन अशी अनेक नावे आहेत. देवयानी,आयएएस अधिकारी उत्त्तम खोब्रागडे यांची कन्या आहे.

या प्रकरणीची आता सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. सीबीआयने सोसायटीच्या चिटणीसांना, एका आठवड्यात या प्रकरणाबाबत विचारलेल्या माहितीचा तपशील पुरवावा, असे कळवले आहे.

दरम्यान लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांनी, या प्रकरणाच्या चौकशीच आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री अँथनी यांनीही या मामल्याची माहिती काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना दिली आहे.

हा भूखंड सोसायटीला मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारमधील अनेक अधिकाऱ्यांनी नियम बाजूला सारले असे आता आढळले आहे. या अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

येथील प्रत्येक फ्लॅटची किंमत किमान तीस कोटी रूपये आहे, परंतु या प्रत्येक सदस्याने हा फ्लॅट सुमारे साठ लाख रूपयांत खरेदी केल्याची नोंद महसूल खात्यात आहे.

दरम्यान चव्हाण यांचे विरोधक सक्रीय झाले असून इतक्या महत्त्वाच्या, संरक्षणाच्या दृष्टिने नाजूक मामल्यात चव्हाण यांनी दुर्लक्ष केले असा त्यांचा आरोप असून ही बाब पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नजरेस आणून द्यावे असे विरोधकांचे प्रयत्न आहेत.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates