05 June, 2013

कैलास मानसरोवर यात्राकरताना घ्यावयाची काळजी


  1. यात्रेचं पावित्र्य जपावे. 
  2. यात्रेला निघण्यापूर्वी पहाटे लवकर उठून सूर्याला नमस्कार करून स्मरण करावे. सूर्यनमस्कार घालून चार ते पाच फर्लाग हळू गतीने धावण्याची सवय करावी. 
  3. प्रवासाला निघताना कुठल्याही तिबेटीयन लामाचे फोटोपुस्तकनकाशा घेऊन जाऊ नका. 
  4. सदैव बॅटरीऔषधेपासपोर्ट इत्यादी गोष्टी जवळ सांभाळून ठेवा. जास्तीत जास्त गरम कपडे घेऊन जा.
  5. पाऊस व बर्फवृष्टीपासून संरक्षणार्थ सदैव रेनकोट जवळ ठेवा. 
  6. रक्तदाबहृदयविकारबायपास सर्जरीदमामधुमेह किंवा श्वासाचा विकार असल्यास किंवा वयोवृद्ध व लहान मुलांनी ही यात्रा करताना कळजी घ्यावी. 
  7. आपत्कालीन अपघात विमा उतरवावा. 
  8. काठमांडू विमानतळावर उतरल्याबरोबर एमिग्रेशनचा शिक्का आपल्या पासपोर्टवर न विसरता मारून घ्यावा व मगच विमानतळाबाहेर यावे. तिबेटमध्ये अशा शिक्क्याची गरज असते.
  9. यात्रे दरम्यान कॅमेऱ्याचे व बॅटरीचे सेल आपल्या खिशात गरम कपडय़ांमध्ये गुंडाळून ठेवा. गरज भासल्यास त्याचा वापर झाल्यावर पुन्हा गरम कपडय़ांत गुंडाळून ठेवा. 
  10. कितीही ऊन-पाऊस पडला तरी कानटोपी (मंकी कॅप) कधीच काढू नका. 
  11. समुद्रसपाटीपासून १0 हजार फुटांवर पोहोचल्यावर वातावरणाचा परिणाम यात्रेकरूवर होतो. तो काहीसा चिडचिडा बनतो. यात्रेकरूंनी संयम पाळावा. 
  12. संपूर्ण प्रवासात दिवसातून तीन ते चार लिटर पाणी अवश्य घ्या व ग्लुकॉन-डी व इलेक्ट्रॉन पावडरचा वापर करा. 
  13. कैलासाला परिक्रमा आखून दिलेल्या मार्गानेच सावकाश करा. 
  14. साथीदाराची वाट पाहा. जोडीने प्रवास करा. आपल्यासोबत जवळचा मित्र किंवा नातेवाईक असणे केव्हाही चांगले असते. 
  15. डोलमा पास येथे जास्त वेळ थांबू नका. ते अत्यंत उंचावर आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे डोलमा देवीचे दर्शन होताच त्वरित खाली उतरा. 
  16. आरतीचेपूजेचे सामान तेथे काहीच मिळत नाही. शक्यतो घरातून सर्व वस्तू घेऊन जाव्यात.
  17. संपूर्ण प्रवासात एका एअर बॅगेत सुकामेवा, खाण्याचेपूजेचे सामानकॅमेरापाण्याच्या बाटली सदैव जवळ असू द्या.
  18. जास्त खोल पाण्यात जाऊ नका. आखून दिलेल्या जागेजवळ स्नान करा 
  19. होमहवनतर्पन मानसरोवराच्या काठी करा. 
  20. यात्रा पूर्ण झाल्यावर काठमांडूला येताना वातावरणाच्या बदलामुळे भोवळ किंवा गरगरल्यासारखे वाटते. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. काही दिवसांनी शारीरिक स्थिती पूर्ववत होईल. 

  LinkWithin

  Related Posts with Thumbnails
   

  Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
  Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates