16 June, 2013

कैलास मानसरोवर यात्रा – हाय अल्टीटयुड सिकनेससाधारणपणे माणूस दहा हजार फुट उंचीवर गेल्यावर हाय अल्टीटयुड सिकनेस (HAS)  किंवा  ऍक्यूट माऊंटन सिकनेस (AMS)  चा त्रास होवू शकतो. एवढ्या उंचीवर असलेली विरळ हवा आणि त्यामुळे असलेला विरळ किंवा कमी दाब असलेला ऑक्सिजन यामुळे हा त्रास होत असतो.  

अशा विरळ हवेत शरीरातील पाणी वेगाने कमी होत असते आणि फुप्पूसातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने त्रास व्हायला सुरूवात होते. अचानक जास्त उंचीवरून प्रवास झाल्याने हा त्रास उत्भवू शकतो. असं असलं तरी हा त्रास तात्कालीक स्वरूपाचा असतो. जर हळू हळू वर चढत गेल्यास असा त्रास कमी होतो.  

कोणती लक्षणं असतात? 
 • डोकं दुखणं
 • थकवा जाणवणं
 • पोटदुखी
 • नीट झोप न येणं.

काय त्रास होवू शकतो ?
 • चिडचिड होणे
 • मळमळल्या सारखे होणे
 • उलटी होणे.
 • थकवा येणे.
 • चक्कर येणे.

उपाय
 • हळू हळू उंचीवर जाणे हा सर्वात चांगला उपाय आहे. असं केल्याने विरळ हवेची शरीराला सवय होते.
 • जोरदार हालचाली न करणे. ( उदा: जलद चालणं, धावणं हे टाळावं.)
 • आल्कोहोलीक पदार्थ टाळणे.
 • धुम्रपान न करणे.
 • उंचावरच्या वातावरणाशी जुळऊन घेण्यासाठी हळू हळू उंचीवर गेल्यावर तिथे काही काळ विश्रांती घ्यावी. थोडं अधिक उंचीवर जावून पुन्हा कमी उंची वर यावं. अशाने शरीराला त्या वातावरणाची सवय होते (Altitude acclimatization) . 
 • भरपूर प्रमाणात पाणी पिणे.
 • प्राणायाम करणे.
 • जास्त उंचावर न थांबता लवकर खाली येणे.


Can any medications help speed the acclimation process?
Yes, you can get a prescription for acetazolamide (Diamox), which causes your kidneys to excrete bicarbonate more quickly, helping you speed your breathing rate in a shorter period of time. It may cause dizziness or drowsiness and heightens your skin’s sensitivity to sunlight, so it should be used with sunscreen.


Reference:
     

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates