26 June, 2013

आपत्ती निवारण आणि संपत्ती भरण


देवभूमी उत्तराखंड आणि चारधामच्या हजारो चौ.कि.मी. भागत १७ जून रोजी झालेल्या भयंकर ढग फुटीत तो भागच बेचीराख झाला आहे. हजारो मृत्युमुखी पडले आहेत, हजारो बेपत्ता झाले आहेत आणि लाखो अडकून पडले आहेत. लष्कराचे जवान आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांनी प्राणाची बाजी लावून मदत कार्य केलं आणि अजूनही ते चालू आहे. कालच खराब हवामानत लष्कराचं एक हेलिकॉप्टर कोसळलं आणि वीसजण मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक रस्ते वाहून गेले आहेत, अनेक घरं होत्याची नव्हती झाली आहेत. धर्मशाळा आणि हॉटेलं वाहून गेली आहेत. हे सगळं आपण सर्वांनी प्रसिद्धीमाध्यमाद्वारे पाहिलं, ऎकलं आणि वाचलं आहे. आता प्रश्न आहे तो आपत्ती निवारणाचा आणि मदतीचा.

यातील आपत्ती निवारण प्रथम येतं. गेली काही वर्ष आपलं सरकार कामच करेनासं झालयं. कोणतीही गंभिर घटना असो न्यायालयाने  हस्तक्षेप केल्याशिवाय शासन व्यवस्था हालतच नाही. राजकिय इच्छाशक्ति जणू शुन्यवत झाली आहे. पूर आला, इमारती कोसळल्या, अतिरेकी हल्ला झाला किवा कोणतीही नैसर्गीक आपती कोसळली तरी हे मुक आणि बधीर झालेलं सरकार हालतच नाही. फक्त ठरावीक छापाची पोपटपंची आणि निवेदन प्रसारीत करून ते मोकळे होतात. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि त्यांच्या मागचा हात हे सगळे काहीही झालं तरी एकच छापील उत्तर वाचून दाखवतात. या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळीही तसंच झालं आहे. आज दहा दिवस झाले तरी अजून ह्जारो लोक तिकडे चारधामला अडकून मरणाची वाट बघत आहेत. ही सगळी भयावह स्थिती पाहून अनेक प्रश्न उभे राहतात.


 • आपल्या देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाचं काय झालं?
 • काही वर्षांपुर्वी असलेले या विभागाचे शिरोमणी शरद पवार याचं उत्तर देवू शकतील  काय?
 • सद्ध्या या विभागाचे प्रमूख कोण आहेत?
 • त्या विभागाने या कठीण प्रसंगी काय केलं?
 • फक्त पैसा डोळ्यासमोर ठेवून नदी पात्रालगत हॉटेल धंदे उघडणार्‍यांना आता तरी शिक्षा होणार का? 
 • सरकारच्या वेगवेगळ्या खात्यात समंवय का नाही?
 • आपती आल्यानंतर चौथ्या दिवशी समन्वयकाची नियुक्ती होते याला काय म्हणावं?
 • देशाचा गृहमंत्री गोंधळ आहे हे स्वताच सांगतो, मग तो दूर करण्याची जबाबदारी कोणाची?
 • उत्तराखंडात राजरोस लूटमार चालू आहे, असहाय्य आपत्तीग्रस्तांकडून घासभर अन्नासाठी सोन्याचाभाव लावला जात आहे, त्या टाळूवरचं लोणी खाणार्‍यांना निदान दम तरी कुणी देणार आहे की नाही?
 • तिथले स्थानीक पोलिस, प्रशासन  कुठे गेलं?
 • गुजरातच्या मुख्यमंत्र्यानी स्वत: आपल्या अधिकार्‍यांना बरोबर घेऊन मदत कार्यात अडथळा न आणता तिथल्या पंधरा हजारावर गुजराती बांधवाना मदत केली आणि त्याना घरपोच केलं ही धमक अन्य कुणी राजकर्ता का दाखवू शकला नाही?
 • उत्तराखंड सरकारने तीन दिवसाचा दुखवटा जाहिर केलेला असताना शेजारच्या दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्री शिला दिक्षीत कॉंग्रेसच्या युवराजाच्या वाढदिवसाचा भलामोठा केक सार्वजनिक ठिकाणी कसा काय कापतात?
 • कॉंग्रेसचा युवराज आपला वाढदिवस सोडून परदेशातून त्वरीत का येवू शकला नाही?
 • २१ तारखेला तयार असलेले मदतीचे ट्रक २४ तारीख पर्यंत कॉंग्रेस मुख्यालयासमोर उभे करून ठेवले होते त्या मागचं प्रयोजन काय?  
 • कॉंग्रेसची वस्तूरुपातली मदत चालते मग मदत म्हणून सरकारला फक्त पैसेच का हवे आहेत?
 • सरकारी मदत सोडून अन्य मदत करणार्‍यांना का रोखून धरलं जात आहे?
 • या देशाचं सरकार म्हणजे कॉंग्रेस आय आहे काय?
 • इरत अनेक आपत्तीच्या वेळी आपती हिच संधी हे ब्रिद वाक्य असलेल्यांना आपत्ती निवारण म्हणजे संपत्ती भरण असंच वाटत आहे. सरकारने लोकांकडे मदतीचा हात पसरला आहे ती मदत पिडीत लोकांपर्यंत पोहोचणार याची काय खात्री? की ती मदत तेराव्याचं जेवण म्हणून फस्त करणार?


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates