31 July, 2013

लडाख प्रवास अजून सुरू आहे - पुस्तक परिक्षण लोकसत्ता




लोकसत्ता दैनिकाच्या दि.  २८/०७/२०१३ च्या समीक्षा या सदरात लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या आमच्या पुस्तकावर खालील प्रमाणे परिक्षण आलं आहे.


लडाखमध्ये भ्रमंती करताना तेथील स्थानिक व्यक्ती, समाज, त्यांची जीवनशैली, संस्कृती आणि ऐतिहासिक संदर्भ जाणवले त्याचे वर्णन आत्माराम परब आणि नरेन्द्र प्रभू यांनी या पुस्तकात केले आहे. त्या प्रवासाचा थरारही पुस्तकात ओघवता भेटतो. त्यांचा गिर्यारोहणाचा श्रीगणेशा कसा झाला, सह्य़ाद्री आणि हिमालयातील साम्यभेद, मोटारसायकलवरून लडाख मोहिमेची तयारी, मोहिमेदरम्यान आलेले थरारक अनुभव, अनुभवलेले मृत्यूचे थैमान, मृत्यूच्या दाढेतून झालेली सुटका, उत्तुंग उत्तर सीमेवरील आनंदाचे क्षण, मोहीम सर करून परतताना पुढे आलेले मदतीचे हात असे विविध टप्प्यांतील अत्यंत भावपूर्ण, प्रेरणादायी आणि दाद देण्याजोगे असे हे प्रवासकथन आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पर्यटकांचं नंदनवन असलेल्या लडाखचे वर्णन केलं आहे. विषयाला साजेशा रंगीत चित्रांचा समावेश हेदेखील पुस्तकाचं एक वैशिष्टय़ म्हणायला हवं. या पुस्तकातून लडाखचं चांगलं दर्शन होतं आणि लडाख पाहावंसंही वाटतं.  


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates