15 May, 2016

याद तुझी येते

दरवळतो मोगरा अन
याद तुझी येते
सडा असे पडलेला
प्राजक्तही भेटे  

तू शिंपलेले झाड कसे
डवरत बघ होते
हात असा धरुनी मला
चांदण्यात नेते

कुंपणास जाई-जुई
बिलगली ग होती
शिपलेल्या चांदण्यास
सुगंधी करी ती

ती मला अशी बोलाऊन
अंगणात नेते
तुझा भास दडलेला
सावली करीते

याद तुझी येते ग  
याद तुझी येते
अंतरात जपलेल्या
कुपीला उघडते

नरेंद्र प्रभू

१५/०५/२०१६ 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates