14 February, 2018

हे विश्व प्रेमिकांचे




हे विश्व प्रेमिकांचे अनिवार भावनांचे
जुळती सुरेल तारा झंकार तनमनाचे
डोळ्यात भाव वेडे जागेपणीच स्वप्ने
स्वप्नात स्वप्न दिसते त्या दोन पाखरांचे

हळूवार भावनांनी इथला वसंत बहरे
मनमोर नाचताना तनगंध हाही पसरे
ते चांदणे सुखाचे न्हाऊनीया अबोली
चाहूल पावलांची गेली फिरून आली

नयनातले इशारे सांगून सर्व गेले
स्पर्शातले किनारे दुथडी भरून ले
कल्लोळ भावनांचा मग शांत शांत झाला
विश्वात प्रेमिकांचा सूर तो जुळून आला    

नरेंद्र प्रभू
१४/०२/२०१८

  

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates