साक्षात
मृत्यु आणि अंदमानच्या सेल्युलर कारागृहत
कैद्यांचा थरकाप उडवणारा जेलर बारी यांच्यावर विजय मिळवणारे स्वातंत्र्यवीर विनायक
दामोदर सावरकर हा विषय असलेलं ‘हे
मृत्युंजय’
हे प्रेरणादायी आणि अंगावर शहारे आणणारं नाटक पहाण्याचा आज योग आला. पहिल्याच
प्रवेशापासून प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेणारं हे नाटक पाहातना पहिल्यांदा
सुत्रधाराच्या भुमिकेत वाटणारा ‘मृत्यु’
शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शरण येतो. वेळोवेळी आपल्या मिठीत येऊन अंदमानच्या
अनंत यातनादायी जगण्यातून सुटका करून घेण्याचं सुचवतो पण:
अनादि
मी अनंत मी, अवध्य मी भला
मारीला
रिपु मजसी असा कवण जन्मला?
असं
विचारणारे स्वातंत्र्यवीर शेवटी ‘भिउनी मला
भ्याड मृत्यु पळत सुटतो’ म्हणतात
ते किती सार्थक होतं त्याची प्रचिती हे नाटक पाहाताना येतेच येते.
सेल्यलर जेलचं
वातावरण हुबेहूब उभं केलय यात शंकाच नाही. अंदमानला सेल्युलर जेलमध्ये मी दोन वेळा जाऊन आलो आहे म्हणून मी असं
खात्रीपुर्वक म्हणू शकतो. त्या जेलचा
परिणामकारक सेट,
तो कोलू,
काळ कोठडी या नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर रंगत जाणारा हा प्रयोग म्हणजे स्वातंत्र्यवीर
सावरकरांच्या जन्मठेपेच्या काळातला जिताजागता इतिहास आहे,
तो काळ पुन्हा नव्याने जनमानसासमोर आणला गेला,
जो पहण्याण्यासारखा, अनुभवण्यासारखा आणि त्याचावेळी
अंतरमुख होण्यासारखाही आहे. कारागृहात किंवा त्याबाहेर असताना स्वातंत्र्यवीर
सावरकरानी आपल्या क्रांतीकार्यात खंड पडू दिला नाही,
पण जेलर बारीसारख्या क्रुरात्म्यासमोरही हार न मानता त्यानी हे महत्कार्य सुरूच
ठेवलं हे विशेष. सहकैद्यांना प्रेरणा देत,
इतिहासाचे केवळ दाखले न देता तो पुन्हा घडवण्याचा पराक्रम (आग्र्याहून
सुटका/अंदमानच्या काळकोठडीतून सुटका) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केला हे पाहून आपण
स्तिमित होतो.
सर्वच
कलाकारांनी समरसून केलेलं काम, संहिता,
संबाद,
संगीत,
नेपथ्य,
प्रकाशयोजना सरस असलेला हा उत्तम नाट्य प्रयोग तिकिट न लावता ‘स्वेच्छा
देणगी’
ती ही प्रयोग संपल्यावर स्विकारण्याचं निर्मात्यांनी ठरवलं आहे हे त्याचं आणखी एक
वैशिष्ट्य. राष्ट्र भावनेचं स्पुलिंग
चेतवणारा हा नाट्य प्रयोग प्रत्येक भारतीयाने अवश्य पाहिला पाहिजे.
ता.क. राजकीय बंद्यांना अट्टल गुन्हेगारांहुनही वाईट वागणूक सेल्युलर
कारागृहात दिली जात होती. त्याला सावरकरांच्या प्रेरणेने राजकैद्यांनी विरोध केला, एकाने कैद्याने “जेवणात
गोम सापडली, मी शाकाहारी आहे “ असं म्हणतच जेलर बारीने त्याच्या तोंडावर मानवी मल
भरलेली बालदी रिकामी करायला लावली असा प्रसंग आहे. आज मात्र एका राजकीय पप्पूने स्वत:च्या
हाताने तो मल ग्रहण केला. काय करणार देवा ! ‘तेथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम
नोहे.’
No comments:
Post a Comment