29 June, 2013

लडाख प्रवास अजून सुरू आहे - पुस्तक परिक्षण लोकप्रभा






लोकप्रभा साप्ताहिकाच्या दि. २८/०६/२०१३ ते ०५/०७/२०१३ च्या पुस्तकाचे पान  सदरात लडख प्रवास अजून सुरू आहे या आमच्या पुस्तकावर परिक्षण आलं आहे.  सुहास जोशी यांनी केलेल्या या परिक्षणात  हे पुस्तक आत्माराम परब यांच्या निवेदनावर नरेंद्र प्रभूंनी केलेले शब्दांकन इतके जिवंत आहे की नरेंद्र प्रभू हे देखील त्या मोहिमेत सहभागी होते असेच वाटते. पुस्तकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे हे केवळ त्या नसíगक आपत्तीचे वर्णन नाही. येथे पुस्तकाच्या पानापानांवर लडाख तुम्हाला भेटत राहतो. कधी तो तेथील माणसांच्या माध्यमातून तर कधी निसर्गवर्णनातून. कारण आत्माराम त्या आपत्तीत अडकले असले तरी कशाला आलो, अशी त्यांची मनोवृत्ती नाही. अस्मानी-सुलतानी संकट आले तरी त्यांच्यातील छायाचित्रकार गप्प बसत नाही. लडाखचे ते सारे स्वर्गीय सौंदर्य तो टिपत राहतो. मनात साठवत राहतो.
त्यामुळेच लडाखच्या पहिल्याच भटकंतीत आयुष्यभर पुरतील एवढे भयंकर अनुभव आले असले तरी ते लडाखच्या ते इतके प्रेमात पडतात की पुढील आयुष्यात लडाखच्या सोबतीनेच स्वत:ची टूर कंपनी सुरू करतात. त्याहीपेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे या पहिल्या प्रवासानंतर त्यांनी लडाखला आजवर १०० वेळा भेटी दिल्या आहेत. आणि पुढेदेखील देण्याची इच्छा आहे. म्हणूनच लडाख प्रवास अजून सुरू आहे असे म्हणावे वाटते.

28 June, 2013

लडाख प्रवास अजून सुरू आहे - पुस्तक परिक्षण नवशक्ती




नवशक्ती दैनिकाच्या दि. २३/०६/२०१३ च्या ऎसी अक्षरे रसिके या सदरात लडख प्रवास अजून सुरू आहे या आमच्या पुस्तकावर परिक्षण आलं आहे.  सुनील वागळे यांनी केलेल्या या परिक्षणात  हे पुस्तक अतिशय वाचनीय झालं असून वाचकांना पुस्तक मुळापासून वाचण्याचं आवाहन केलं आहे.  
  

26 June, 2013

आपत्ती निवारण आणि संपत्ती भरण


देवभूमी उत्तराखंड आणि चारधामच्या हजारो चौ.कि.मी. भागत १७ जून रोजी झालेल्या भयंकर ढग फुटीत तो भागच बेचीराख झाला आहे. हजारो मृत्युमुखी पडले आहेत, हजारो बेपत्ता झाले आहेत आणि लाखो अडकून पडले आहेत. लष्कराचे जवान आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांनी प्राणाची बाजी लावून मदत कार्य केलं आणि अजूनही ते चालू आहे. कालच खराब हवामानत लष्कराचं एक हेलिकॉप्टर कोसळलं आणि वीसजण मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक रस्ते वाहून गेले आहेत, अनेक घरं होत्याची नव्हती झाली आहेत. धर्मशाळा आणि हॉटेलं वाहून गेली आहेत. हे सगळं आपण सर्वांनी प्रसिद्धीमाध्यमाद्वारे पाहिलं, ऎकलं आणि वाचलं आहे. आता प्रश्न आहे तो आपत्ती निवारणाचा आणि मदतीचा.

यातील आपत्ती निवारण प्रथम येतं. गेली काही वर्ष आपलं सरकार कामच करेनासं झालयं. कोणतीही गंभिर घटना असो न्यायालयाने  हस्तक्षेप केल्याशिवाय शासन व्यवस्था हालतच नाही. राजकिय इच्छाशक्ति जणू शुन्यवत झाली आहे. पूर आला, इमारती कोसळल्या, अतिरेकी हल्ला झाला किवा कोणतीही नैसर्गीक आपती कोसळली तरी हे मुक आणि बधीर झालेलं सरकार हालतच नाही. फक्त ठरावीक छापाची पोपटपंची आणि निवेदन प्रसारीत करून ते मोकळे होतात. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि त्यांच्या मागचा हात हे सगळे काहीही झालं तरी एकच छापील उत्तर वाचून दाखवतात. या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळीही तसंच झालं आहे. आज दहा दिवस झाले तरी अजून ह्जारो लोक तिकडे चारधामला अडकून मरणाची वाट बघत आहेत. ही सगळी भयावह स्थिती पाहून अनेक प्रश्न उभे राहतात.


  • आपल्या देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाचं काय झालं?
  • काही वर्षांपुर्वी असलेले या विभागाचे शिरोमणी शरद पवार याचं उत्तर देवू शकतील  काय?
  • सद्ध्या या विभागाचे प्रमूख कोण आहेत?
  • त्या विभागाने या कठीण प्रसंगी काय केलं?
  • फक्त पैसा डोळ्यासमोर ठेवून नदी पात्रालगत हॉटेल धंदे उघडणार्‍यांना आता तरी शिक्षा होणार का? 
  • सरकारच्या वेगवेगळ्या खात्यात समंवय का नाही?
  • आपती आल्यानंतर चौथ्या दिवशी समन्वयकाची नियुक्ती होते याला काय म्हणावं?
  • देशाचा गृहमंत्री गोंधळ आहे हे स्वताच सांगतो, मग तो दूर करण्याची जबाबदारी कोणाची?
  • उत्तराखंडात राजरोस लूटमार चालू आहे, असहाय्य आपत्तीग्रस्तांकडून घासभर अन्नासाठी सोन्याचाभाव लावला जात आहे, त्या टाळूवरचं लोणी खाणार्‍यांना निदान दम तरी कुणी देणार आहे की नाही?
  • तिथले स्थानीक पोलिस, प्रशासन  कुठे गेलं?
  • गुजरातच्या मुख्यमंत्र्यानी स्वत: आपल्या अधिकार्‍यांना बरोबर घेऊन मदत कार्यात अडथळा न आणता तिथल्या पंधरा हजारावर गुजराती बांधवाना मदत केली आणि त्याना घरपोच केलं ही धमक अन्य कुणी राजकर्ता का दाखवू शकला नाही?
  • उत्तराखंड सरकारने तीन दिवसाचा दुखवटा जाहिर केलेला असताना शेजारच्या दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्री शिला दिक्षीत कॉंग्रेसच्या युवराजाच्या वाढदिवसाचा भलामोठा केक सार्वजनिक ठिकाणी कसा काय कापतात?
  • कॉंग्रेसचा युवराज आपला वाढदिवस सोडून परदेशातून त्वरीत का येवू शकला नाही?
  • २१ तारखेला तयार असलेले मदतीचे ट्रक २४ तारीख पर्यंत कॉंग्रेस मुख्यालयासमोर उभे करून ठेवले होते त्या मागचं प्रयोजन काय?  
  • कॉंग्रेसची वस्तूरुपातली मदत चालते मग मदत म्हणून सरकारला फक्त पैसेच का हवे आहेत?
  • सरकारी मदत सोडून अन्य मदत करणार्‍यांना का रोखून धरलं जात आहे?
  • या देशाचं सरकार म्हणजे कॉंग्रेस आय आहे काय?
  • इरत अनेक आपत्तीच्या वेळी आपती हिच संधी हे ब्रिद वाक्य असलेल्यांना आपत्ती निवारण म्हणजे संपत्ती भरण असंच वाटत आहे. सरकारने लोकांकडे मदतीचा हात पसरला आहे ती मदत पिडीत लोकांपर्यंत पोहोचणार याची काय खात्री? की ती मदत तेराव्याचं जेवण म्हणून फस्त करणार?


19 June, 2013

कैलास मानसरोवर यात्रा – परिक्रमेत घ्यावयाची काळजी आणि आहार



कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान परिक्रमेत १५६०० ते १८६०० फुट उंची वरून सुमारे ४२ किलोमीटर एवढा प्रवास तीन दिवसात चालत करावा लागतो. हाय अल्टीटयुडमुळे यावेळी चालताना काळजी घ्यावी लागते. वर चढताना नेहमीच आपण सावकाश वर चढतो पण खाली उतरताना धावत उतरण्याकडे कल असतो. तसे न करता खाली उतरतानाही सावकाश उतरावे. झर झर खाली उतरू नये, कारण तसे केल्यास ढोपरांवर जोर पडून पाय लवकर दुखायला लागतात.   

चालत निघताना बरोबर खालील गोष्टीची नीट तपासणी करून त्या बरोबर असाव्यात.

  • स्वेटर, विंडचिटर, थर्मलस, उलन मंकी कॅप, ग्लोव्हज, स्कार्फ, सन ग्लास परिधान केलेले असावेत.
  • पाठीवरची सॅक हलकी असावी.
  • कोल्ड क्रिम, सन क्रिम इत्यादी बरोबर घ्यावे.  
  • लागणारी औषधं बरोबर घ्यावीत.
  • चालताना, चढताना विशेषत: उतरताना काठीचा आधार घेतल्यास कमी श्रम पडतात. वॉकिंग पोल बरोबर असणे केव्हाही चांगले.    
  • चांगली टॉर्च सोबत ठेवावी.
  • डोलमा ला पासवरून उतरताना धावत खाली येवू नये, थोड्याच अंतरात थकून जाण्याची शक्यता असते, शिवाय ढोपरांवर अनावश्यक जोर पडतो.
  • तीन दिवस आंघोळ टाळल्यास उत्तम.

आहार
  • एवढया उंचीवर चालताना शारिरीक क्षमता टिकवण्यासाठी सुकामेवा, मेथीलाडू अशा गोष्टी बरोबर असू द्या. सुक्यामेव्याची छोटी छोटी पॅकेट करून घ्यावीत, चॉकलेट, कॅन्डीही बरोबर घ्याव्यात. नाष्टा किंवा जेवण कमी गेल्यास याचा  उपयोग होतो.

  • हाय अल्टीटयुड सिकनेसचा त्रास कमी करण्यासाठी दिवसभरात किमान 5 लिटर पाणी  पिणे आवश्यक आहे. वाटेत पिण्यासाठी पुरेसे पाणी बरोबर बाळगावे. उंचावरच्या विरळ आणि कोरड्या हवेत चालताना श्वास लागत असल्याने शरिरातील बाष्प कमी होवून डिहायड्रेशनचा त्रास होवून हाय अल्टीटयुड सिकनेस सुरू होतो. यासाठीच भरपूर पाणी पिणं फायद्याचं ठरतं.


  • थंड हवामानामुळे तहान लागत नाही म्हणून पाणी पिण्याचा कंटाळा करू नये.     

16 June, 2013

कैलास मानसरोवर यात्रा – हाय अल्टीटयुड सिकनेस



साधारणपणे माणूस दहा हजार फुट उंचीवर गेल्यावर हाय अल्टीटयुड सिकनेस (HAS)  किंवा  ऍक्यूट माऊंटन सिकनेस (AMS)  चा त्रास होवू शकतो. एवढ्या उंचीवर असलेली विरळ हवा आणि त्यामुळे असलेला विरळ किंवा कमी दाब असलेला ऑक्सिजन यामुळे हा त्रास होत असतो.  

अशा विरळ हवेत शरीरातील पाणी वेगाने कमी होत असते आणि फुप्पूसातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने त्रास व्हायला सुरूवात होते. अचानक जास्त उंचीवरून प्रवास झाल्याने हा त्रास उत्भवू शकतो. असं असलं तरी हा त्रास तात्कालीक स्वरूपाचा असतो. जर हळू हळू वर चढत गेल्यास असा त्रास कमी होतो.  

कोणती लक्षणं असतात? 
  • डोकं दुखणं
  • थकवा जाणवणं
  • पोटदुखी
  • नीट झोप न येणं.

काय त्रास होवू शकतो ?
  • चिडचिड होणे
  • मळमळल्या सारखे होणे
  • उलटी होणे.
  • थकवा येणे.
  • चक्कर येणे.

उपाय
  • हळू हळू उंचीवर जाणे हा सर्वात चांगला उपाय आहे. असं केल्याने विरळ हवेची शरीराला सवय होते.
  • जोरदार हालचाली न करणे. ( उदा: जलद चालणं, धावणं हे टाळावं.)
  • आल्कोहोलीक पदार्थ टाळणे.
  • धुम्रपान न करणे.
  • उंचावरच्या वातावरणाशी जुळऊन घेण्यासाठी हळू हळू उंचीवर गेल्यावर तिथे काही काळ विश्रांती घ्यावी. थोडं अधिक उंचीवर जावून पुन्हा कमी उंची वर यावं. अशाने शरीराला त्या वातावरणाची सवय होते (Altitude acclimatization) . 
  • भरपूर प्रमाणात पाणी पिणे.
  • प्राणायाम करणे.
  • जास्त उंचावर न थांबता लवकर खाली येणे.


Can any medications help speed the acclimation process?
Yes, you can get a prescription for acetazolamide (Diamox), which causes your kidneys to excrete bicarbonate more quickly, helping you speed your breathing rate in a shorter period of time. It may cause dizziness or drowsiness and heightens your skin’s sensitivity to sunlight, so it should be used with sunscreen.


Reference:




     

15 June, 2013

बाप दु:खी होतोच ना?



काळ खुप लवकर बदलतो आहे. तसा तो बदलणारच. आमचा काळ वेगळा होता आणि आजचा वेगळा आहे. जग झपाट्याने बदलत चाललय, असं असलं तरी माणूस जुन्या काळातच जास्त जगत असतो म्हणायचं. आमच्या काळात वडीलांसमोर ब्र काढण्याचीही सोय नव्हती पण आता मुलं आई-वडीलांशी सहज बोलतात. माझ्या एका मित्राच्या मुलीचं लग्न ठरलं आहे. त्या लग्नाचा आनंद असण्यापेक्षा ते कसं पार पडेल याचीच त्या मित्राला काळजी वाटत आहे. बाकी सगळं ठिक ठाक असलं तरी लग्नासाठी होणारा खर्च हा मुख्य विषय आहे. आपल्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढून तो हे कार्य पार पाडणार म्हणतो, तेव्हा मुलगी विचारते की तुम्ही आयुष्यभर एकाच नोकरीत टिकून राहिलात. काय कमवलं तिथे राहून?

माझा हा मित्र कर्नाटकातल्या आपल्या गावातून मुंबईत आला. सोबत आजारी आई-वडील. वडील लवकर देवाघरी गेले म्हणून याला आपलं भविष्य घडवण्याच्या काळातच लग्न करावं लागलं कारण घरात आजारी आई होती. मिळालेली नोकरी टिकऊन आणि ती इनामे इतबारे करून त्याने आपला संसार सांभाळला. त्याची एकमेव मुलगी शिकली, आय टी मध्ये नोकरीला लागली, आय टी वाल्यांची तर्‍हाच वेगळी, नोकरी बदलण्याचं त्यांना काहीच वाटत नाही. वाटायला पण नको. आताच्या काळाप्रमाणे ते बरोबरही असेल, पण आपण तसं करतो म्हणून आपल्या वडीलानीही तसंच केलं पाहिजे होतं असं कसं होऊ शकतं? प्रामाणिकपणे नोकरी करून त्याने आपला संसार केला, मुलीला मोठी केली आता तो आपल्या ताकतीप्रमाणे तिचं लग्न करू पाहतोय, तेव्हा त्याला काय कमावलं आयुष्यभर? एवढंच? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा तो  बाप दु:खी होतोच ना?
         

       

05 June, 2013

कैलास मानसरोवर यात्राकरताना घ्यावयाची काळजी


    1. यात्रेचं पावित्र्य जपावे. 
    2. यात्रेला निघण्यापूर्वी पहाटे लवकर उठून सूर्याला नमस्कार करून स्मरण करावे. सूर्यनमस्कार घालून चार ते पाच फर्लाग हळू गतीने धावण्याची सवय करावी. 
    3. प्रवासाला निघताना कुठल्याही तिबेटीयन लामाचे फोटोपुस्तकनकाशा घेऊन जाऊ नका. 
    4. सदैव बॅटरीऔषधेपासपोर्ट इत्यादी गोष्टी जवळ सांभाळून ठेवा. जास्तीत जास्त गरम कपडे घेऊन जा.
    5. पाऊस व बर्फवृष्टीपासून संरक्षणार्थ सदैव रेनकोट जवळ ठेवा. 
    6. रक्तदाबहृदयविकारबायपास सर्जरीदमामधुमेह किंवा श्वासाचा विकार असल्यास किंवा वयोवृद्ध व लहान मुलांनी ही यात्रा करताना कळजी घ्यावी. 
    7. आपत्कालीन अपघात विमा उतरवावा. 
    8. काठमांडू विमानतळावर उतरल्याबरोबर एमिग्रेशनचा शिक्का आपल्या पासपोर्टवर न विसरता मारून घ्यावा व मगच विमानतळाबाहेर यावे. तिबेटमध्ये अशा शिक्क्याची गरज असते.
    9. यात्रे दरम्यान कॅमेऱ्याचे व बॅटरीचे सेल आपल्या खिशात गरम कपडय़ांमध्ये गुंडाळून ठेवा. गरज भासल्यास त्याचा वापर झाल्यावर पुन्हा गरम कपडय़ांत गुंडाळून ठेवा. 
    10. कितीही ऊन-पाऊस पडला तरी कानटोपी (मंकी कॅप) कधीच काढू नका. 
    11. समुद्रसपाटीपासून १0 हजार फुटांवर पोहोचल्यावर वातावरणाचा परिणाम यात्रेकरूवर होतो. तो काहीसा चिडचिडा बनतो. यात्रेकरूंनी संयम पाळावा. 
    12. संपूर्ण प्रवासात दिवसातून तीन ते चार लिटर पाणी अवश्य घ्या व ग्लुकॉन-डी व इलेक्ट्रॉन पावडरचा वापर करा. 
    13. कैलासाला परिक्रमा आखून दिलेल्या मार्गानेच सावकाश करा. 
    14. साथीदाराची वाट पाहा. जोडीने प्रवास करा. आपल्यासोबत जवळचा मित्र किंवा नातेवाईक असणे केव्हाही चांगले असते. 
    15. डोलमा पास येथे जास्त वेळ थांबू नका. ते अत्यंत उंचावर आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे डोलमा देवीचे दर्शन होताच त्वरित खाली उतरा. 
    16. आरतीचेपूजेचे सामान तेथे काहीच मिळत नाही. शक्यतो घरातून सर्व वस्तू घेऊन जाव्यात.
    17. संपूर्ण प्रवासात एका एअर बॅगेत सुकामेवा, खाण्याचेपूजेचे सामानकॅमेरापाण्याच्या बाटली सदैव जवळ असू द्या.
    18. जास्त खोल पाण्यात जाऊ नका. आखून दिलेल्या जागेजवळ स्नान करा 
    19. होमहवनतर्पन मानसरोवराच्या काठी करा. 
    20. यात्रा पूर्ण झाल्यावर काठमांडूला येताना वातावरणाच्या बदलामुळे भोवळ किंवा गरगरल्यासारखे वाटते. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. काही दिवसांनी शारीरिक स्थिती पूर्ववत होईल. 

    LinkWithin

    Related Posts with Thumbnails
     

    Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
    Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates