Showing posts with label त्रिमिती. Show all posts
Showing posts with label त्रिमिती. Show all posts

27 April, 2010

मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय इती.- मुकेश अंबानी


मराठी  माणसाला धंदा करता येत नाही, मराठी  माणूस डाऊनमार्केट आहे मराठी  माणसानी चाकरीच करावी अशा शेलक्या शब्दात मराठी माणसांची संभावना गेली अनेक वर्ष मराठी  माणूसच करत आहे आणि त्यामुळेच मग दुसरा कुणीतरी त्याची री ओढतो. पण यावर उपाय काय? मुळात मराठी माणूस तसा आहे काय? तर त्याला उत्तर नाही असचं आहे. हे दुसरं तीसरं कुणी म्हणत नसून मुकेश अंबानीचेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड  यांचं म्हणणं आहे.

त्यांच्या लेखातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. 

 

  • मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.
  • सौंदर्याची आणि श्रीमंतीची खाण असणा-या या भाषेवर माझेही मनापासून प्रेम आहे.
  • आपली मुंबई हे बॉलिवूड म्हणून ओळखले जाते याचा मला खूप अभिमान वाटतो.
  • भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा मराठी सिनेमाही आता पुन्हा एकदा नव्या जोमाने आहे.
  • आता रिलायन्समध्येही ज्येष्ठ पदांपासून कनिष्ठ वर्गापर्यंत मोठ्या प्रमाणात मराठी माणसे काम करताना दिसतील
  • 'मराठी माणसाला धंदा करता येत नाही ' हा आता इतिहास झालाय.
  • मराठी माणूस व्यवसायात मागे का? अगदी मनापासून सांगायचे तर हे वाक्य कदाचित काही दशकांपूर्वी खरंही असेल, पण आज असे चित्र बिलकूलच नाही
  • नव्या ज्ञानाधिष्ठित समाजरचनेमध्ये मराठी माणूस अग्रणी असेल यात मला तरी शंका वाटत नाही. 
  • व्यवसाय करणे हा एका समुदायाची किंवा जातीची मक्तेदारी राहणेच शक्य नाही
  • घराणेशाही आणि समुदायाच्या परंपरेतून मिळणारा व्यवसायाचा वारसा हा फार काळ टिकणार नाही. 
  • महाराष्ट्रातील शिक्षणाची संस्कृती या नव्या युगात उद्योजकतेची कास घेताना मला दिसतेय.
  • महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्तीचे अद्वैत आहे.

 

मुकेश अंबानींचा हा संपुर्ण लेख नितीन पोतदार.कॉम वर अवश्य वाचा. अंबानी सारख्या सोनारानेच कान टोचलेत ते बरं झालं पणं याच गोष्टी गेली दोन वर्ष सभा-समारंभातील भाषणातून आणि वृत्त्पत्रातील लिखाणातून कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार  जोरदारपणे सांगत आले आहेत. गेल्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्रिमितीच्या स्वप्न बघा स्वप्न जगा   या विशेष कार्यक्रमात व्याख्यान देताना त्यानी या सर्वच गोष्टींचा उहापोह केलेला दिसतो. (वाचा: विचारांची आतषबाजी नितीन पोतदार)  सहजच मी पोतदारांच्या लेखांचा धांडोळा घेतला तेव्हा त्यानी सातत्याने मांडलेला मराठी माणसाविषयीचा दृष्टीकोन आणि कळवला दिसून आला, वानगी दाखल काही दुवे पुढे देत आहे.



........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे!


2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त सहकार्य’ (collaboration)!


मराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची


महाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे - नितीन पोतदार


महाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा


बिझिनेस नेटवर्किंग’ - मराठी उद्द्योगजगत प्रगतीचा एक्सप्रेस वे!


सीमोल्लंघन - बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)


यशासाठी घ्या राईट टर्न


मराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स!


मराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे!


मराठी मिल्लिओलानिअर 



हे सगळे लेख म्हणजे आपली कर्मभुमीवरची गीताच आहे  तेव्हा वाचा, विचार करा आणि नि:शंक मनाने कामाला लागा. यश आपलच आहे. जय हो...!!!


विनंती: प्रत्येक वाचकाला विनंती, की त्याने हा लेख किमान ५ मराठी माणसांना तो वाचायला आग्रहाने द्यावा.


24 January, 2010

संगीतकार कौशल इनामदार यांची ग्रेट-भेट



Kaushal S. Inamdar

त्रिमितीच्या कार्यक्रमात नुकतीच संगीतकार कौशल इनामदार यांची ग्रेट-भेट झाली. मराठी अभिमानगीत आणि त्याबाबतचे त्यांचे अनुभव ऎकण्यासारखे होते. मराठीत असं काही भव्यदिव्य घडतय हीच खरीतर उत्साहपुर्ण गोष्ट आहे.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
सुरेश भटांच्या या गीताला त्यानी संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, शंभरहून अधिक गायक, गायिका आणि ३०० पेक्षा जास्त कोरस मधुन हे गाणे साकारते आहे. नावच सांगायची झाली तर प्रख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर,शाहीर विठ्ठ्ल उमपपासून अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, स्वानंद किरकिरे, अजित परब, स्वप्नील बांदोडकर, मुग्धा वैशंपायनपर्यंत गायक गायिका तसेच अशोक पत्की, श्रीधर फडकेपासून मिलिंद जोशी, मिथिलेश पाटणकरांपर्यंत बरेच संगीतकार या शिवाय अमराठी असलेले गायक-गायिका हरीहरन, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर अशा अनेकांनी अतिशय प्रेमाने यात सहभाग घेतला आहे.
एफ्एम् वाहिन्यावर मराठी गाणी लावत नाहीत पण हे अभिमानगीत झाल्यावर तरी या एफ्एम् वाहिन्यांना मराठीची दखल घ्यावीच लागेल.
चळवळीचा एका भाग म्हणून या प्रकल्पासाठी कुणाही प्रायोजकाची आर्थिक मदत न घेता त्यासाठीचा निधी लोकसहभागातून उभा केला जाणार आहे. सध्या त्याला सर्वाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अजूनपर्यंत तीन लाख रुपये जमा झाले आहेत. किमान दोन हजार लोकांनी पाचशे रुपये देऊन या प्रकल्पात सहभागी व्हावे अशी विनंती आहे.
या उपक्रमासाठी धनादेश मराठी अस्मिता’ ( Marathi Asmita) या नावाने काढून
मराठी अस्मिता, द्वारा कौशल श्रीकृष्ण इनामदार, १०२, त्रिवेणी, शुचिधाम, फिल्म सिटी मार्ग, दिंडोशी बस आगाराजवळ, गोरेगांव (पू), मुंबई४०० ०६३, महाराष्ट्र, भारत, या पत्त्यावर पाठवावेत. कृपया धनादेशासोबत आपलं नांव, पत्ता, दूरध्वनी क्र., आणि ई-मेल ही माहिती पाठवावी.
http://www.marathiasmita.org/ या संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करू शकता. आपण ऑन्लाईन पैसे ट्रान्स्फर केल्यास एक विनंती आहे. ई-मेल करून आपला पत्ता, दूरध्वनि आणि ई-मेल कळवावा म्हणजे सीडी पाठवणं सोयिस्कर होईल. कौशल इनामदार यांचा ई-मेल ksinamdar@gmail.com असा आहे. दूरध्वनि क्रमांक ९८२०४५४५०५ असा आहे.
हे गीत प्रत्येक मराठी घरात ऐकले जावे आणि प्रत्येक मराठी कार्यक्रमात गायले अथवा वाजवले जावे या उद्देशाने सहभागी होणा-या प्रत्येक व्यक्तीला एक ध्वनिमुद्रिका आणि त्यासोबत माहितीपुस्तिका विनामूल्य घरपोच केली जाईल. हा आपण सर्वांनी साकारलेला प्रकल्प असल्याने माहितीपुस्तिकेत आपलं नाव असेलच पण त्याच बरोबर मराठीबद्दल उपयुक्त माहितही असेल. ही मराठी अभिमानगीताची सीडी लवकरच प्रकाशित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates