माझं स्वैर लेखन
15 December, 2025
आत्माची भ्रमणगाथा
17 March, 2025
निर्मळ
‘निर्मळ’
म्हणजे ‘मळ’ नसलेलं; ‘स्वच्छ’
मग ते जल अथवा मन काहीही असो त्याचा आस्वाद घेणारी किंवा सहवासात आलेली प्रत्येक
व्यक्ती पावन होते. म्हणूनच गंगाजलाला या शृष्टीत अनन्यसाधारण महत्व आहे.
गंगाजलासारखं स्वच्छ मन असणार्या ‘माई’ने (प्रिय मित्र आत्माराम परब यांच्या
आईने) आणखी एक सुखद धक्का दिला त्याची ही गोष्ट. १५ मार्च २०२५ रोजी ‘आत्माची
डायरी’ या आमच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रकाशन समारंभात व्यासपिठावर
उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये माई होतीच (‘माई’ होती म्हणण्यात तिचा उपमर्द
करण्याचा हेतू नाही तर आमच्या मालवणी मुलखात आईला गे ‘आवशी’ आणि देवाला रे
‘भावाशी’ असंच म्हणतात आणि समोर जे कुणी असेल ते त्याला ओ... देखील देतं.) तर
माईने व्यासपिठावर हातात धरलेलं पुस्तक सोबत नेलं नाही. कार्यक्रम संपला, माई आपल्या
नातवंडासोबत बाहेर पडली, दारात गर्दी होती तिथे काही काळ
थांबली असताना मला माई दिसली तेव्हा निरोप घेण्याकरता मी पुढे झालो, बोलता बोलता तिची नजर हेड्विग प्रकाशनाच्या स्टॉलवर गेली. मला माईने विचारलं
“पुस्तकाची किंमत काय?” मी “२५० रुपये” असं म्हणताच तिने
स्वत:च्या पाकीटातले २५० रुपये काढून दिले आणि “माका एक पुस्तक व्हया” असं म्हटलं
तेव्हा मी स्तंबीत झालो, ‘स्तंबीत झालो’ हा शब्द अनेक वेळा
वापरला आहे पण खरंच तसा अनुभव येतो तेव्हा आपण निर्जीव खांबासारखे झाले आहोत हे
जाणवतं. प्रथम मी म्हटलं थांब, पैसे नको, मी पुस्तक आणून देतो. पण माईच्या आग्रह पाहून ते पैसे घेतले, पुन्हा तिच्याच हातात देत तिला स्टॉलपर्यंत नेलं आणि तिने पुस्तक विकत
घेतलं. जन्मभराची ठेव हातात धरावी तशी ती पुस्तकाला न्याहाळत होती. आपल्या बाळूला
कृथार्थ भावाने पहात होती. (आत्माचा सर्वप्रकारचा विरोध डावलून त्याचं छायाचित्रं
असलेलं मुखपृष्ठ मी तयार करायला लावलं होतं.)
नंतर
फोन करून माईला विचारलं तू ते पुस्तक विकत का घेतलं?
तर म्हणाली “आपण सुरवात करून देवक व्हयी मा!, म्हणान
कनवटीचे पैसे काढून दिलय. तशे काय ते माझे पैसे नाय तेच्याच वडलांचे, तेंची पेन्शन गावता तेच्यातलेच दिलय, मी खय कमऊक
जातय?” हे तीचं ‘इदंनमम’ ऐकून मी पुन्हा अवाक झालो.
स्वत:च्या
मुलाची ‘ईशा टुर्स’ ही कंपनी आता देशात नावारूपाला आली आहे. देशाची सिमा उलंघून
‘ईशा टुर्स’ आज घडीला पंचवीस पेक्षा जास्त
विदेशी सहली आयोजित करीत आहे. ‘लडाख... प्रवास अजून सुरू आहे’ आणि ‘हे प्रवासी गीत माझे’ अशी दोन पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत आणि आता हे तिसरं पुस्तक कालीदास
नाट्यगृहात पर्यटकांच्या भरगच्च उपस्थित प्रकाशीत झालं आहे याची पुरे पूर कल्पना
असूनही माई आपल्या मुळ भूमिकेत कायम आहे. हे ईश्वराचं देणं आहे, ही तिची मनोधारणा कायम आहे. पुस्तकाला हा असा
आशीर्वाद मिळाला, मी धन्य झालो.
ता.क.
माईने “बाळू लडाखाक जावक कीती पैसे लागतत रे...?”
असं विचारलं तो किस्सा आमच्या ‘आत्माची डायरी’ या पुस्तकात लिहिला आहे
तो जरूर वाचा.
19 May, 2022
एका व्रताची सांगता
![]() |
| संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे |
एप्रिल २०२२ पासून ‘ईशान्य वार्ता’चं प्रकाशन बंद केलं असं वाचलं आणि का कोण जाणे हायसं वाटलं. घरात एकुलता एक माणूस कमावता असताना महानगर टेलिफोन निगमच्या नोकरीला रामराम करून ईशान्येकडच्या जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सिद्ध होणं हिच एक कर्म कठीण घटना होती. १४-१५ वर्षांपुर्वी पुरुषोत्तम रानडेंनी हे शिवधन्युष्य हाती घेतलं आणि एप्रिल २०२२ पर्यंत अव्याहतपणे ‘ईशान्य वार्ता’चं संपादन, प्रकाशन, वितरण, लेखन..... (ही यादी कितीही वाढवता येईल) हा माणूस करीत राहिला. ध्येयनिष्ठा आणि अंगचे ‘उत्तम’ गुण सोडून कसलंच पाठबळ नसतना राष्ट्रधर्मासाठी सतत कार्यरत राहिलेल्या या उत्तम पुरूषाची तळमळ मी जवळून पहात होतो. एखादं मासिक वेळच्यावेळी प्रकाशित करणं या मागे किती व्याप असतात हे त्यात काम केल्याशिवाय कळणार नाही. बरं महाराष्ट्रापासून हजारोमैल दूर असलेल्या ईशान्य भारतातील सात राज्यांचा लेखाजोखा आणि वार्तांकन एवढाच या मागचा उद्देश्य नव्हता तर तिथलं समाजमन मुख्यभूमीशी जोडलं गेलं पाहिजे अशी तळमळ होती आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची तयारी रानडे सतत करीत होते.
करोनाचा भयाण काळ आला आणि
सगळ्यांच्याच जगण्याला संघर्षाची धार आली आणि कदाचीत त्यातच ‘ईशान्य वार्ता’चं
प्रकाशन बंद करण्याचा समयोचीत निर्णय घ्यावा लागला. शिवाय आत्ताच्या आधुनिक
प्रसारमाध्यमाच्या युगात ‘प्रिंट मिडीया’ मागे पडत आहेच. कुठलीही बातमी सांगितली तरी नवीन काहीतरी सांगा असा
समोरच्याचा भाव असतो. ते नव्या स्वरुपात येईलही, तुर्तास
छपाई बंद आहे.
मासिक छापण्याच्या ताणातून
संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे सध्यातरी मोकळे झाले आहेत. अपवाद सोडता सगळीच प्रसार
माध्यमं नकारात्मक घटनांचा रतीब घालत असल्याने येवढं सगळंवाईट घडत असताना, हे जग चालतं तरी कसं? असा प्रश्न पडतो, तेव्हा रानडेंसारखे अनेकजण सकारात्मक कामं निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे
करीत असतात म्हणून; असं त्याचं उत्तर मिळतं. गेलं एक तप हा ‘यज्ञ’ चालू होता. एवढा काळ एखादं काम सातत्याने करीत रहाणं यालाच व्रत म्हणतात, रानडेंनी या एका व्रताची नुकतीच सांगता केली म्हणायचं.
नरेंद्र प्रभू
या विषयी आणखी वाचा:
समर्पीत पत्रकार, संपादक
: पुरुषोत्तम रानडे
ईशान्य वार्ता
ईशान्य वार्ताचं दमदार पुनरागमन
मिशन मणिपूर - एकांडय़ा देशभक्ताची वीरगाथा
राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं?
27 February, 2022
Memoir
फुल फुलल्यानंतर त्याचा सुगंध सर्वदूर पसरतो पण ते उमलताना पहीलं म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे काय त्याची प्रचिती येते. कला विकसीत होताना पहायला मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. सौ. रेखाताई भिवंडीकर या त्यापैकी एक आहेत. त्याच्या कलेची परीपक्वता न्याहाळायची असेल तर अशी संधी आपणाला उद्याच चालून येणार आहे.
चित्रांचं ‘मेमोयर‘ हे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी जहांगीर कलादान,१६१ बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन दि. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.
नरेंद्र प्रभू
09 February, 2022
हिम्मतवान
कितीही मोठं संकट आलं तरी हार न मानता त्याला सामोरं जात प्रयत्नांची पराकाष्ठा करत यशस्वी होणारी माणसं आपल्याला सतत प्रेरणा देतात. मित्रवर्य आत्माराम परब यांच्यामुळे सौ. स्मिता बापट-जोशी यांच्याशी परिचय झाला आणि त्यांचा चिरंजीव सिद्धार्थ याच्याशी दोस्ती झाली. जसं सिद्धार्थ हा स्मिता बापट-जोशी यांचा मुलगा एवढीच त्याची ओळख सांगाता येणार नाही तशीच सौ. स्मिता बापट-जोशी या सिद्धार्थची आई एवढीच त्यांची ओळख सांगता येणार नाही. ही दोन्ही व्यक्तिमत्व जाणून घ्यायची तर राजहंस प्रकाशनाचं ‘आयुष्याचं ’जिगसॉ पझल’ सोडवणारा सिद्धार्थ’ हे पुस्तक वाचलं पाहिजे.
20 July, 2021
‘आत्मा’ रंगी रंगलो
पहिल्या लडाख सफरीत लडाखला पोचल्यावर दुसर्याच दिवशी आत्माराम परब हे वेगळंच रसायन आहे हे आम्हा मित्रांच्या लक्षात आलं. बरोबर आलेल्या प्रत्येकाला सहलीचा पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. सहलीत कबूल केलेली ठिकाणं सोडून कितीतरी जास्त देण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून आम्ही चकीत झालो होतो. बोलता बोलता आम्ही सांगून टाकलं की “आम्ही दिलेले पैसे फिटले, आता आमच्याकडून तुम्ही हवं ते काम करून घ्या.” मग शेवटच्या दिवसापर्यंत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असंच सगळं चालू होतं. श्रीनगरला शेवटच्या दिवशी आता ही सफर संपणार आणि आपले पाय पुन्हा जमिनीवर येणार म्हणून मन खट्टू झालं. पण माझ्या बाबतीत असं व्हायचं नव्हतं, त्या सहलीच्या शेवटालाच माझी एक अनोखी सफर सुरू व्हायची होती.
लडाखहून परत आलो आणि चार-दोन दिवसातच आत्माराम परबांचा फोन आला. काहीतरी कारण काढून त्यानी भेटूया म्हणून सांगितलं, भेटलो. जबरदस्त इच्छाशक्ती आणि अपार उत्साह असलेला हा माणूस अगदी प्रत्येक भेटीत मनाला भिडत गेला. कुठलीही गोष्ट ‘केली’ न म्हणता ‘झाली’ म्हणणारा, मैत्रीला जागणारा, नफा-नुकसानाचा विचार न करता झोकून देणारा, कुणालाही अगदी कुणालाही; बिनधास्त भेटणारा असा हा ‘आत्मा’ आत्तापर्यंत माझ्यासाठी आत्मारम परब होता. पण एका दिवशी बोलता बोलता त्याने “मला माझे सगळे मित्र ‘आत्मा’म्हणून हाक मारतात, तेव्हा तुम्हीही आत्माच म्हणा” असं म्हणाला. मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण त्याने हट्ट सोडला नाही आणि मग तो माझ्यासाठीही ‘आत्मा’ झाला. अशी माणसं नशीबात असावी लागतात. आत्माशी मैत्रं जुळलं आणि जीवनातल्या एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली. त्याच्या पोतडीतून कधी काय बाहेर येईल याचा नेम नाही. कोरोना काळातही लडाख, अजंठा-वेरूळ-औरंगाबाद, बारा मोटेची विहिर, दोनदा कोकण या ठिकाणी त्याने उचलून नेलंच. पण त्याधी अनेक सहलींवर अनेकदा नेलं. घासून घासून टूर लिडर बनवलं. गेल्या पंधरा वर्षात माझ्या परिघाच्याबाहेर नेवून त्या बाहेरची दुनिया दाखवली.
या आधीच्या पोस्टमध्ये त्याचा आत्माराम परब असा उल्लेख केला त्याकर फेसबूक वर त्याने अभिप्राय दिला तो असा:
प्रत्येक
क्षण डोळ्यासमोरुन जात आहे. किती तरी वेगळी आव्हान होती त्यावेळी पण खूप मजा
यायची. कारण सोबतचे पर्यटक सुद्धा त्या आव्हानं कडे एक अनुभव म्हणूनच बघत होते
त्यामुळे सर्वच काही सोपं वाटायचं. 2003 मध्ये इशा टुर्स केल्यापासून साधारण 2009
पर्यंत इशा टुर्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची थेट संपर्क होता. आणि
तोपर्यंत सहलीला येणारी मंडळी मला "आत्मा" या नावाने हाक देत होती. पुढे
त्याचं आत्माजी, आत्मारामजी, सर अशी
बरीच विशेषण लागली जी मला आवडत नाहीत.
Narendra Prabhu च्या या लिखाणामुळे ते पुन्हा
अनुभवण्याचा आनंद घेतो आहे
आणखी एक प्रसंग: एकदा असेच आम्ही लडाखची दमछाक करणारी टूर संपवून मुंबईत परतलो. मी घरी आलो आंघोळ केली आणि मोबाईल पहातो तर हा घरी न जाता विमानतळावरून थेट मित्रांना भेटायला गेला होता, निमित्त होतं ‘मैत्री’ दिवसाचं. कसं जमतं हे याला. त्याचे ते फोटो पाहून मी चक्रावून गेलो. मनाला काही भिडलं, भावलं की कविता सुचते तशी ती तेव्हाही सुचली:
नरेंद्र प्रभू०२/०८/२०१५
एकदा असेच आम्ही पुण्याला जायला निघालो, वाटेत मला पिकअप करून गाडी सुरू करताना आत्मा काही तरी शोधायला लागला. फोन करून एक रिंग दिली आणि चला... म्हणून गाडी सुरू केली. मग मी विचारलं काय झालं? तर म्हणाला मोबाईला हरवला बहुतेक. लोणावळ्याला फुड मॉलवर मी म्हटलं, अरे मोबाईल हरवला आणि तू एवढा शांत कसा? तर म्हणाला वैतागून तो कसा मिळणार? मिळायचा असेल तर मिळेलही.
अनेक अतर्क्य, अशक्य वाटणार्या कितीतरी गोष्टी या माणसाने लिलया केल्या आहेत, त्यातल्या अनेक ‘लडाख प्रवास अजून सुरू आहे...’ आणि ‘हे प्रवासी गीत माझे‘ या दोन पुस्तकात लिहिल्या आहेत, ती पुस्तकं जरूर वाचावीत अशी विनंती आहे.
भाग
१: मुक्काम तर येणारच
भाग २: ‘क्यामेरा’ क्या तेरा
भाग ३: जागेपणीचं स्वप्न
भाग ४: स्वर्गारोहण
भाग ५: पचेल तेच खावं
भाग ६: ब्रो
भाग ७: सीमा रक्षक
भाग ८: युटी (Union Territory) अच्छा है?
भाग ९: ‘आत्मा’ रंगी रंगलो
13 February, 2021
तुझी सावली लाभली
स्वामी स्वरुपानंदाचा स्नेह लाभलेल्या लेखिका मृणालिनीताई जोशी यांचा आज ९४ वा वाढदिवस. नुकतीच या विदुषीची भेट घेता आली. त्यांच्या दर्शनानंतर सुचलेल्या या ओळी आजच्या वाढदीवशी त्याना अर्पण.
माया आभाळभरून तुझी अनुभवाआली
किती दिसांनी गे
माये तुझी सावली लाभली
एका कृपाकटाक्षाने
अमृताचा गे वर्षाव
मन चिंब चिंब न्हालं
क्षणोक्षणी ती आठव
किती प्रकाश दाटला
निरांजन तेजाळलं
दाही दिशा तुझ्या
झाल्या गात्र गात्र उजाळलं
वर प्रेमाचा वर्षाव
जणू आभाळ भरलं
इवल्याशा कुटीमध्ये असे ब्रम्हाण्ड साठलं
स्वामी स्वरूप
दाविती चित्त थाऱ्यावर एक
हर्ष आनंद जाहला
आशीर्वचन प्रेरक
अन् लाभला मजला
प्रसादाचा हा ‘आलोक’
तुझ्या
कृपाकटाक्षाचा सोनसळी अभिषेक
नरेंद्र प्रभू
१३ फेब्रुवारी २०२१
02 May, 2020
स्वप्नांचा प्रवास

25 January, 2020
समर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे
09 November, 2019
तेजाची आरती
गीत रामायण हा मराठी गीत, गायन आणि सादरीकरणाचा मुकूटमणी. गीत रामायण हे एप्रिल १९५५ ते एप्रिल १९५६ या कालावधीत ग. दि. माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेलं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं आणि गायीलेलं महाकाव्य आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालं होतं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला होता.
| अनघा मोडक |
| नेहा खरे |
वाचकसंख्या
About Me
Join this site
अनुक्रमणिका
Popular Posts
-
आपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. ...
-
हर्षदाने लगीनघाईत काढलेला महिना आणि ऋचाच्या अभ्यासाची घाई सुरू होण्याआधी श्रम परिहार करावा, जवळपास कुठेतरी दोन दिवसांसाठी जावून यावं म्हणू...
-
दरवळतो मोगरा अन याद तुझी येते सडा असे पडलेला प्राजक्तही भेटे तू शिंपलेले झाड कसे डवरत बघ होते हात असा धरुनी...
-
संगीताने आपलं जीवन किती सुरस बनवलय. गाता गळा आणि फुललेला मळा ही तर निसर्गाचीच देणगी. एखादी सुंदर तान ऎकताक्षणी वाह...! क्या बात है....! अस...
-
मन मानत नाही तरी चार दिवसांपूर्वी माझा प्रिय मित्र चेतन जानी गेला ही गोष्ट खरी आहे. तो निघून गेला पण मागे उरलेल्यांना त्यांचं काम केलच पाह...
-
आम्ही जेव्हा सांताकृझला राहायला आलो तेव्हा पहाटे जाग यायची ती चिमण्यांच्या चिवचिवाटाने आणि पक्षांच्या किलबिलाटाने. गेल्या दहा-अकरा वर्षात त...
-
आधी न कळवता अनाहूतपणे आलेला पाहूणा आता शहरात तरी कुणालाच नको असतो. पण आम्हाला हवाहवासा वाटणारा आमचा हा पाहूणा गेली दोन वर्ष झाली याच दरम्यान...
-
‘ कळेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट तरच होईल जय महाराष्ट्र ’ ‘प्रोग्रेसीव्ह मराठी माणूस’ हा माझा ध्यास आहे. ज्याला तुम्ही आपल्या ...
-
आजच्या लोकसत्तामध्ये मुंबई-पुण्यात दूध पिशव्यांतून मिळते ‘ विष ’! हि बातमी वाचली. आम्ही गोकूळचं दूध घेतो. आता गोकूळ असो नाहीतर इतर कुठल्या...
-
गोठलेल्या लडाखसफरीवर आत्माराम परब निसर्गाच्या करामती त्याचे विभ्रम आणि एकुणच निसर्ग आपल्या सर्वानाच आवडतो पण तो कितपर्यंत तर तो आपल्याला...
Blog Archive
Labels
Search This Blog
My Blog List
-
अभिप्राय - १ - “आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार, आत्म...1 year ago
-
Finance Fair – 2019 - *Lokmanya Seva Sangh, Parle* *P.V.Bhagwat Investment Guidance Cell* *Presents* Finance Fair – 2019 *12 & 13th January, 2019 13TH* *Enrollment* Registra...7 years ago








