कितीही मोठं संकट आलं तरी हार न मानता त्याला सामोरं जात प्रयत्नांची पराकाष्ठा करत यशस्वी होणारी माणसं आपल्याला सतत प्रेरणा देतात. मित्रवर्य आत्माराम परब यांच्यामुळे सौ. स्मिता बापट-जोशी यांच्याशी परिचय झाला आणि त्यांचा चिरंजीव सिद्धार्थ याच्याशी दोस्ती झाली. जसं सिद्धार्थ हा स्मिता बापट-जोशी यांचा मुलगा एवढीच त्याची ओळख सांगाता येणार नाही तशीच सौ. स्मिता बापट-जोशी या सिद्धार्थची आई एवढीच त्यांची ओळख सांगता येणार नाही. ही दोन्ही व्यक्तिमत्व जाणून घ्यायची तर राजहंस प्रकाशनाचं ‘आयुष्याचं ’जिगसॉ पझल’ सोडवणारा सिद्धार्थ’ हे पुस्तक वाचलं पाहिजे.
ईशाटूर्सच्या नुकत्याच पार पडलेल्या वाराणसी-प्रयागराज-अयोध्या-लखनौ या
सहलीत या दोन्ही मायलेकाला जवळून वाचता आलं आणि जीवनाचे अनेक पैलू पुन्हा एकदा समजून
घेता आले. ‘लिम्का
बुक ऑफ रेकॉर्डस, २०१९ मध्ये चमकाणारा ‘सिद्धार्थ’ स्वत:ला सिद्ध करतोच पण हे घडताना त्याला
स्मिता ताईंनी कसे पैलू
पाडले असतील याचा अचंबा वाटतो. ‘उव्दिगनेती खोल खाई’ याचा अर्थ खुप खोल आहे. स्वत:चा गुंता सोडवताना माणसांना
आपल्यात गुंतवणारा सिद्धार्थ आज आपल्या पायावर उभा रहात आहे, आईवर खुप माया करणारा सिध्दार्थ आपल्याही मनात घर
करतोच पण घराबाहेर पडून अनेक समाजोपयोगी उपक्रमात आनंदाने भाग घेतो हे ऐकून स्तिमित
व्हायला होतं.
कोरोना काळात अनेकांनी हात-पाय गाळले पण याही काळात यांनी ‘मन-मानी’ करून आणखी एक पाऊल पुढे
टाकलंच. आईने डिझाईन केलेले टी-शर्टस सिद्धार्थने वितरीत करायला सुरूवात केली, ‘केल्याने होत आहे रे’ हे सिद्ध केलं. खरं तर स्मिता ताई रोज जिगसॉ पझल
सोडवत आहेत, एक एक भाग जोडत आहेत.
No comments:
Post a Comment