फुल फुलल्यानंतर त्याचा सुगंध सर्वदूर पसरतो पण ते उमलताना पहीलं म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे काय त्याची प्रचिती येते. कला विकसीत होताना पहायला मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. सौ. रेखाताई भिवंडीकर या त्यापैकी एक आहेत. त्याच्या कलेची परीपक्वता न्याहाळायची असेल तर अशी संधी आपणाला उद्याच चालून येणार आहे.
सुप्रसिद्ध
चित्रकर्त्या सौ. रेखाताई भिवंडीकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या
चित्रांचं ‘मेमोयर‘ हे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी जहांगीर कलादान,१६१ बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन दि. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.

सौ. रेखाताई भिवंडीकर या उत्तम छायाचित्रकार आहेत. उत्तम निसर्ग छायाचित्रं टिपणं हा त्यांचा छंद
आहे. पण कुंचल्यातून चित्र साकार करताना कॅनव्हासवर जे उमटतं त्यांची रचना त्यांच्या
स्मृतीपटलावर कितीरती आधीच झालेली दिसते. त्यांच्या संस्मरणातून साकार झालेली चित्रं
पहाताना आपण आपल्याच बालपणातील जगात कधी पोचतो हे समजत देखील नाही. विविध माध्यमातील
आणि शैलीमधील चित्रं साकारताना त्याना नकळत त्यांची स्वता:ची अशी एक शैली सापडली आणि
मग रंग-कुंचल्याचा जो अविष्कार कॅनव्हासवर झाला त्यातून ही चित्रमालीका कला रसिकांच्या
भेटीला येत आहे.
आई आणि मुलीचं
साधेपणात व्यतीत झालेलं जीवन, त्यालील बारकावे, प्रेम, जिव्हाळा, निखळ मैत्री, ममता अशी सौदर्य स्थळं,आणि उमदेपणा, भावूकपणा यथार्थवादी शैलीमध्ये रेखातांईंच्या चित्रांमधून
प्रतिबिंबित झाला आहे. मानवी जीवनाची ही लड त्यानी किती हळूवारपणे कॅनव्हासवर उतरवली
आहे ते अनुभवण्याची सुवर्णसंधी मुंबईकर कला रसिकांनी मिळणार आहे याचा जरूर लाभ
घ्यावा.
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment