15 August, 2010

सच्चा नाना



काही व्यक्तिमत्व अशी असतात की कोणत्याही परिस्थितीत, कितीही कठीण प्रसंगात ती आपला मुळ धर्म, स्वभाव सोडत नाहीत. नाना पाटेकर हा त्यातलाच एक, सच्चा माणूस. पराकोटीचं दारिद्र्य आणि नंतर आलेली सुबत्ता या दोन्ही वेळी आतला माणूस नानाने सतत जागता ठेवला. त्याचे नाटक, सिनेमे गाजत असताना बॉलीवूडचे नट नट्या जसे नखरे करतात तसे नानाने कधी केले नाहीत. जे काही असेल ते सरळ, साधं, सोप.  अभिनायाचं जबरदस्त अंग असलेला हा अभिनेता तोंडाला रंग फासून क्वचीतच सेटवर गेला असेल. भुमिका जगणारा आणि अभिनय हे काम नसून विरंगूळा आहे असं म्हणणारा नाना म्हणूनच अख्ख्या भारतीय सिनेजगतात उठून दिसतो.
नाना मातीत पाय असणारा कलावंत आहे. पुण्याजवळ आजूबाजूला जंगल असलेल्या त्याच्या गावातल्या घरात तो रहातो. निसर्गाशी एकरूप होतो. दुरदर्शन संच, वर्तमानपत्र, मोबाईल असल्या साधनांपासून स्वतःला आवर्जून दूर ठेवतो आणि हे करत असताना कलेची उपासना करतो. आपल्यातलाच माणूस शोधतो. एकाच वेळी बाळासाहेब ठाकरे आणि बाबा आमटेंवर पराकोटीचं प्रेम करतो. माझी ओंजळ अजून छोटीच आहे असं म्हणून अनेक संस्थांना कोणताही गाजावाजा न करता आर्थिक मदत करतो. (आनंदवनात त्याने केलेल्या मदतीतून इमारत उभी राहिली, पण त्याचा उल्लेख कुठेच नको असं नानाने सांगितलं हे मी विकास आमटेंच्या तोंडून ऎकलं तेव्हा थक्क झालो होतो.)

आज हे लिहिण्याचं कारण म्हणजे आयबीएन लोकमतवर ग्रेट भेट मध्ये काल रात्री नाना पाटेकरची एक छान मुलाखत ऎकली. आजही ती दुपारी बारा वाजता पुन्हा ऎकता येईल. जरूर ऎका आणि नानाचा सच्चेपणा अनुभवा. (नाना खरच मोठा माणूस त्याला अरे तूरे करण्याचा उद्देश नाही, पण सचिन तेंडुलकर, गावस्कर ही माणसं देव माणसं वाटतात. तसं गणपतीलाही आपण अहो जाहो कुठे करतो?)                      

6 comments:

  1. Nana, nana aahet.
    nana aani nilu phule sarakhe samajik bhawana wyakt karanaare nat faar kami aahet...

    ReplyDelete
  2. खरच स्वप्निल, आपण म्हणता तसे खुप कमी नट असे आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो.

    ReplyDelete
  3. मागे हेरंबने पोस्ट लिहिली होती... ती पण वाचा...http://www.harkatnay.com/2010/06/blog-post.html

    खरच एकदम सच्चा आणि दिलाचा माणूस... :)

    ReplyDelete
  4. खरच सच्च्या दिलाचा माणूस.

    ReplyDelete
  5. अरुण सरनाईक हे आनखी एक नाव सच्चा कलावंत म्हणून घ्यायला हवे. त्यांच्या विषय़ी एक प्रसंग ऐकला होता. मराठवाड्य़ात चित्रपट शुटींगच्या निमीत्ताने रात्रीचा प्रवास करताना त्यांना एका ठिकाणी तमाशाचा फड दिसला. तो पहायला गेल्यावर तिथे गोंधळ सुरु असल्याचे दिसले. अरुण सरनाईकांनी आयोजकांना भेटून गोंधळाचे कारण विचारले तेव्हा समजले की ढोलकी वादकाला जोराचा ताप आलाय व तो आज उभा राहू शकत नाही. बाहेर कार्यक्रमाची वेळ झाल्यामुळे दंगा अनावर झाला होता स्टेजवर दगड येत होते, अशा परिस्थितीत स्वत: अरुण सरनाईक ढोलकी घेऊन स्टेजवर उभा राहीले व रात्रभर कार्यक्रम पार पाडला. धन्य तो कलावंत व धन्य त्याची कलेवरची निष्ठा.

    ReplyDelete
  6. कॉलेजात असताना अरुण सरनाईकांचं 'अश्रूंची झाली फुले' हे नाटक पाहिलं होतं. आपण ही माहिती दिलीत म्हणून या प्रसंगाबद्दल समजलं. थोर ते कलाकार.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates