काल ऋचाचा पदवीदान समारंभ झाला, तीच्यासाठी स्पुरलेली कविता.
हे असे चिरंतन नाते, तू मला बापपण दिधले
मन हळवे होते आता, हळूहळू बालपण सरले
दुडूदुडू धावत जाशी, खेळात हवी असे सरशी
हरण्याचे मजला सुख, तू मनापासूनी हसशी
लडिवाळ गुंफुनी हात
तू गळा घातले कितीदा
शाळेला जाऊ नकोच बस
गेली तर जाऊद्या
यश सह्यासाने लाभे, तू धडे गिरवले होते
लय-ताल नृत्य सारे जे सहजी जुळून येते
दिस दिसामागुनी
सरले, शाळेचे कुंपण नूरले
अवकाश कवळीशी आता
जे दोनच बोटे उरले
जीवनाचे गाणे
व्हावे, तू अमृताने न्हावे
सुख त्यातच आहे
माझे, परि तुला दिव्य लाभावे
नरेंद्र प्रभू
०१/०५/२०२२
No comments:
Post a Comment