धावत होती कालच
दुडूदुडू असे वाटते
मनात उरले कधीच
सरले असे वाटते
सोनपावले घेऊन
आली क्षण सोन्याचे
तालावरती
पदन्यास करी स्वछंदी नाचे
अशी अचानक लयीत
येऊन जरा थबकली
वाळूसम ती कितीक
वर्षे सरकून गेली
रंगमंच हा फिरतो
आहे आयुष्याचा
जरा थांबना वेध
घेऊ दे तुझ्या मनाचा
धृतलयीतच खेळ
चालला तुझा असा हा
कधीच सरला काळ
तुझा तो बालपणाचा
अशीच पडू दे तालावरती तुझी पाऊले
घन बरसू दे तुझ्यावरी
तो आनंदाचा
नरेंद्र प्रभू
११ ऑगष्ट २०२५

No comments:
Post a Comment