ब्लॉगर हा एक उत्साही मनूष्यप्राणी आहे हे काल पटलं. मे महिन्यातला रविवार, त्यात कित्तेकानी दुपारीच घर सोडलेलं. काही तर थेट पूणे, नाशिकहून आलेले. एकमेकांना भेटण्याची उर्मी एवढी की गर्मीवर मात करून मंडळी वेळेवर पोहोचली होती. कांचन कराई (मोगरा फुलला), महेंद्र कुलकर्णी (काय वाट्टेल ते), रोहन चौधरी (माझी सह्यभमंती) हे जणू आपल्या घरचंच कार्य असल्यासारखे सर्वांचं स्वागत करत होते. सगळेच एकमेकांना पहिल्यांदाच भेटत असूनही एखाद्या शाळेतल्या वर्गाचा स्नेह मेळावा असावा अशी आपुलकी दिसली.
साहित्य संमेलनातले रुसवे फुगवे, लाथाळ्या, राजकारण आणि मुळ उद्देशाला लावलेली काडी हे पाहता या मेळाव्याचं यश उठून दिसलं. जेष्ठ-कनिष्ठ, लहान-मोठा असले कसलेच भेदभाव नव्हते, की मिरवणं नव्हतं. मुख्य आयोजक कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी, रोहन चौधरी हे सुद्धा इतरांच्या बरोबर बसले होते. (खरंतर त्यांनी व्यासपीठावर बसणं संयुक्तिक ठरलं असतं.) स्वतः लांबलचक भाषणं न ठोकता सर्वांना मन मोकळं बोलू देण्यात आलं. महाजालात मराठीचा जास्तीतजास्त वापर कसा होईल, शुद्धलेखन करण्यासाठी काय करावं अशा कळीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्व क्षेत्रातले, वयोगटातले ब्लॉगर्स एकत्र आले आणि तो एक आनंद मेळा संपन्न झाला.
मिलिंद वेर्लेकर यांच्या राजाशिवाजी.कॉम विषयीची माहिती, महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिव लीनाताई मेहेंदळे यांच्या बत्तीस ब्लॉग वरचं विवेचन, नेट-भेट वाले सलील चौधरी आणि प्रथमेश यांची थेट-भेट, ज्येष्ठ नागरिक संघ विलेपारले यांचा ब्लॉग कसा चालतो इत्यादी बद्दल ऎकून आणि सर्वांना भेटून कालचा रविवार कामी आला तसच संस्मरणीय ठरला. हे सगळं घडवून आणणारे आयोजक आणि उपस्थित ब्लॉगर्स यांचे मनापासून आभार. आणखी एक, आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर चहापान, अल्पोपहार प्रायोजित करणार्या अनाम दानशूरास धन्यवाद......!
नरेन्द्र प्रभू
बाकी इथे लिहता तस काल तुम्ही मेळाव्यात बोलला नाहि बर का काका.
ReplyDeleteआणि निघालाही लगेच गप्पा मारायचया राहिल्यात आपल्या.
नरेंद्रजी, सगळ्या ब्लॉग्सवरचे वृत्तांत वाचून मेळावा किती उत्कृष्ट झाला आणि मी काय काय मिस केलं याची यादी करत होतो. प्रत्येक पोस्ट वाचल्यावर जाणवतंय की मिस केलेल्या गोष्टींची यादी वाढतेच आहे. :) :( .. तुम्हा सर्वांचं अभिनंदन..
ReplyDeleteब्लॉगर्स मेळावा यशस्वी केल्याबद्दल सगळ्यांचेच अभिनंदन!:)महेंद्र, कांचन व रोहनचे, खास आभार.
ReplyDeleteखूप मस्त वाटला तुम्हाला भेटून..
ReplyDeleteनरेंद्रजी सगळ्यांचे वृत्तांत वाचतेय, सगळेजण वाक्य वेगळी लिहीत असले तरी सगळ्यांची एकी मात्र दिसून येतेय... आता वाट पहातेय ती कांचनच्या आणि महेंद्रजींच्या लेखाची.
ReplyDeleteछानच झालाय मेळावा... आणि खरचं नावं न सांगता मदत करणाऱ्या त्या अनामिकास अनेक धन्यवाद!!!!
सुहास धन्यवाद. सगळ्यानाच भेटता आलं म्हणून बरं वाटलं.
ReplyDeleteहेरंभ, भानस, सहजच, कॅनव्हास धन्यवाद. मेळावा खरच यशस्वी झाला. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteनरेंद्रजी
ReplyDeleteतुम्ही आलात खूप आनंद झाला. भेटायची खूप इच्छा होती. पुढल्यावेळेस थोडं सावकाश भेटूया!!
तुम्हा सगळ्यांच्या ऍकिट्व्ह सहभागामुळेच मेळावा यशस्वी झाला..
मस्त लिहिलाय वृत्तांत. कालपासून मिळतील तेव्हढे वृत्तांत वाचतोय.
ReplyDeleteमहेंद्रजी नमस्कार, खुप मजा आली पुन्हा भेटूच.
ReplyDeleteछान वॄत्तांत...असे मेळावे ठराविक कालावधीनंतर नियमीत व्हायला हवेत...
ReplyDeleteविद्याधर आभारी.
ReplyDeleteदवबिंदू, आभारी आपल्या मताशी मी सहमत आहे. असे मेळावे नियमीत व्हायला हेवेत.
ReplyDelete