04 February, 2010

हिमालयाची फोटोरूपी भ्रमंती!

प्रदर्शन कुठे : ठाणे आर्ट गॅलरी, बिग बाजारजवळ, बाळकूम रोड, माजीवडे, ठाणे

केव्हा : ५ ते ७ फेब्रुवारी, सकाळी ११ ते सायंकाळी ८

हिमालयातली उत्तुंग शिखरे... गोठलेले तलाव... खळाळत्या नद्या... डोंगरांची रांगोळी... रंगांची उधळण असलेला लडाख... हिरवागार अरुणाचल... तळ्यांचे तवांग... आदिम संस्कृतीचे मेघालय... धीरगंभीर उत्तर सिक्किम... पाईनच्या मोठमोठे वृक्ष... हिमालयाच्या लांबच लांब पसरलेल्या रांगांमध्ये दिसणाऱ्या या अद्भूत गोष्टींनी वेड नाही लावले तरच नवल!

काश्मीरमधले लडाख, हिमाचल प्रदेशातील स्पितीव्हॅली, सिक्किम, आसाम, अरुणाचलमधील तवांग, मेघालय, नागालँड आणि शेजारचा भूतान... हिमालयाच्या कुशीत असलेल्या विविध परिसरांचे फोटोरूपी दर्शन या प्रदर्शनातून होणार आहे!

अधिक माहितीसाठी वाचा :

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5529279.cms


8 comments:

  1. जर येत्या दोन दिवसात ठाण्याला गेले तर जरूर हे प्रदर्शन पाहिन. खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. फोटो खुपच छान आहेत. प्रदर्शनाला येण्याचा प्रयत्न करतो.
    विशाल

    ReplyDelete
  3. माझा सुद्धा विचार आहे लडाख फोटेंचे प्रदर्शन भरवायचा... तिकडेच ठाण्यात. बघुया जमतय का...!

    ReplyDelete
  4. कांचन, रोहन आपलं स्वागत आहे.

    ReplyDelete
  5. Saw the exhibition. Snaps are too good to believe that they are taken by amature photographers.

    ReplyDelete
  6. फोटो सुंदरच. प्रदर्शनाला तर येऊ शकत नाही, माहितीबद्दल धन्यवाद.:)

    ReplyDelete
  7. Ap_M आपण प्रदर्शनाला आलात त्या बद्दल आभार.

    ReplyDelete
  8. भानस, हा पुर्ण प्रदेशच खरच पाहण्यासारखा आहे. कधी शक्य झालं तर पहा.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates