कायदे कितीही कडक असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे त्याचा कसा वापर करतात यावरच त्यांची परिणामकारकता अवलंबून असते. जिल्हाधिकारी हा तर जिल्ह्याचा राजाच असतो. प्रशासनाचा प्रतिनिधी असतो. त्याने मनात आणलं तर कायद्याचं राज्य आणि समाजिक न्याय यांची बूज राखली जाते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी अशी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. गर्भजल चिकित्साकरून मुलींना पोटात असतानाच संपवण्यार्यांविरूद्ध प्रभावी उपाय करणे किंबहूना अशी सोनोग्राफीची केंद्रे चालावणार्यांना धाक वाटेल अशी यंत्रणा उभारण्याचे महत्वाचे काम त्यांनी केलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून www.savethebabygirl.com अशी वेबसाइट तयार करून मुलींच्या जनन दरात चांगली सुधारणा घडवून आणली. इंफोसिस चे अध्यक्ष नारायण मुर्ती यांच्या अध्यक्षतेखालील समितीने देशातील शासकीय प्रवर्गातील सर्वोत्कृष्ट उपक्रम म्हणून या उपक्रमाची निवड केली आहे यावरूनच त्यांच्या या कामाचे महत्व लक्षात येते.
अशा उपक्रमाची सर्वांनीच नोंद घेतली पाहिजे आणि वाहवा केली पाहिजे. संपूर्ण बातमी लोकसत्ताच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचे त्रिवार अभिनंदन...!
वा! अशा वेबसाईटला पुरस्कार हा मिळायलाच हवा. खूप चांगला उपक्रम आहे, याचा फायदा निश्चितच होईल.
ReplyDeleteम्हणूनच ब्लॉग लिहिला. धन्यवाद.
ReplyDelete