आजपर्यंत माझे तीन रिफंड या खात्याने रिचवले. पुढचे तीन बाकी आहेत त्यातल्या एकाची रिफंड ऑर्डर आली असं मी समजत होतो पण ती डिमांड ऑर्डर होती. कापलेला टी.डी.एस्. जमेत न धरल्याने मी त्या खात्याचं देणं लागतो असं ती ऑर्डर सांगत आहे. रिफंडचे पैसे करदात्याच्या खात्यात जमा करायचे असा नियम केल्यापासून या बाबू लोकांना भिक कोण देणार म्हणून त्यानी ही शक्कल लढवली आहे. घेताना मानेवर बसून घ्यायचं आणि द्यायच्या वेळी पुन्हा हात पुढे करायचा.
प्रामाणिकपणे कर देणार्याला इथे त्रासच सहन करावा लागतो. करबुडव्यांना, थकबाकीदारांना या देशात पद्-म पुरस्कार मिळतात. रस्त्यावर, सरकारी जागेत अतीक्रमण करणार्यांच्या पाठीशी थेट राहूल गांधी ते अशोक चव्हाण सगळे प्राधांन्याने उभे रहातात. कर चुकवला की करमाफी मिळते आणि योग्यवेळी भरला तर मात्र तुमची छळवणूक होते. हा देश महासत्ता होणार की विकला जाणार?
आपण राईट टू इन्फरमेशन कायद्यानुसार याची चौकशी करू शकता.
ReplyDelete