28 April, 2019

मतदान कराच




आम्ही जे बटन दाबलं त्याच चिन्हाला आमचं मत गेलं. इकडेतिकडे नाही! काहीच गडबडघोटाळा नाही. मतदान कराच. 

लोकशाहीने दिलेल्या हक्कांपैकी मतदानाचा हक्क हा सर्वात मोठा हक्क आहे. आपल्या मतदानाच्या या हक्कामुळे परिवर्तन होऊन देशाचे भवितव्य ठरू शकते. त्यामुळे निराशावादी भूमिका न घेता सर्वांनी जागरुकतेने व प्रत्येक निवडणुकीध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यामध्ये आपला खारीचा वाटा उचललाच पाहिजे. लोकशाहीचे बळकटीकरण करायचे असेल तर जागरुक युवा मतदारांचा एक मोठा वर्ग अस्तित्वात येणे गरजेचे आहे ज्यामुळे आपला देश विकसनशीलतेकडून विकसित देश होण्यास निश्चितच मदत होईल. मतदानातून लोकशाही सक्षम होत असते. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लोकशाही मजबूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे देश घडवायचा असेल तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. ती जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यासाठी मतदान करणे हाच एकमेव लोकशाही मार्ग ठरतो.

मतदान न करण्याचं  कोणतंही कारण असू शकत नाही. पाच वर्षांनी सर्व मतदारांना चालून आलेली ही सुसंधी असते. १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) किंवा पुलवामा सारखा हल्ला अशा प्रसंगी आपलं राष्ट्रप्रेम उफाळून वर येतं, पण त्या वेळी आपण काहीच कृती करू शकत नाही, मतदान करून मात्र आपण आपल्यासाठीच सक्षम सरकार निवडून आणू शकतो, तेव्हा मतदान कराच अशी कळकळीची विनंती आहे. 

तेराचा पाढा



आमच्या सान्वीने तेराचा पाढा पाठ केला हे ऐकलं आणि ही कविता सुचली   

तेराचा पाढा
किती ग वेडा
म्हणता येतो का
धडा-धडा?

तेरा एके तेरा
तेरा दुना सव्वीस
एवढंच पाठ केलं
वेळा बावीस!

तेरा त्रिक एकोणचाळीस
तेरा चोक बावन
वाचून काढलं
अंकलिपीत पाहून

तेरा पाची पासष्ठ  
तेरा सक अठ्ठ्याहत्तर
येतं एका झटक्यात
तो मात्र बहाद्दर

तेरा सप्ते एक्याण्णव
तेरा आठे एकशे चार
पाठ व्हायला
वेळ लागतो फार 

तेरा नवे एकशे सतरा
इथे मात्र वाटतो खतरा
तेरांधाय एकशे तीस
जीव झाला कासावीस

नरेंद्र प्रभू
२८/०४/२०१९


27 April, 2019

मोदींनी काय केलं?



गेली पाच वर्षं सत्तेवर राहून मोदींनी काय केलं? कोणते दिवे लावले? असं विचारणार्‍यांनी जरा इकडे लक्ष द्यावं. मोदींनी काय केलं?

  1. दोन लाख खोटी मनरेगा कार्ड बंद केली.
  2. ८० लाख फर्जी शिक्षकांचा पगार बंद केला.
  3. चार कोटी खोटी रेशन कार्ड बंद केली. 
  4. तीन लाख फर्जी LPG कनेक्शंस बंद केली.
  1. यादी आणखीही मोठी आहे, विचार करून मतदान करा.   




26 April, 2019

चीन नमलं



चीनने जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं मान्य केलं आहे. तीन दिवसांच्या बीआरआय समिटमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले आहेत. विशेष म्हणजे लोकसत्ता ने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.  

अरुणाचल प्रदेश आपला आहे असा दावा करणाऱ्या चीनने अखेर आपली चूक सुधारली असून जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं मान्य करत नमती भूमिका घेतली आहे. बीजिंग येथे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह समिट सुरु असून यावेळी चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले. आश्चर्यकारकरित्या या नकाशांमध्ये जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग दाखवण्यता आले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, भारताने सलग दुसऱ्यांना परिषदेवर बहिष्कार टाकूनही नकाशात भारत बीआरआयचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तीन दिवसांच्या बीआरआय समिटमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले. चीनने जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचं अविभाज्य भाग दाखवणं तसं भारतासाठी आश्चर्यकारकच असून विरोधाभास निर्माण करणारं आहे.

चीनने याआधी अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग दाखवणारे अनेक नकाशे नष्ट केले होते. हा चीनचा भाग असल्याचा दावा वारंवार चीनने केला असून भारतीय नेत्यांनी केलेल्या दौऱ्यांचाही निषेध केला आहे. याआधी चीनने त्यांच्या नकाशात जम्मू काश्मीर हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा भाग असल्याचा दावा अनेकदा केला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने जाणुनबुजून आखलेली ही रणनीती असण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात चीनमधील चॅनेल सीजीटीएऩ टेलिव्हिजनने कराचीमधील चिनी दुतावासावर झालेल्या हल्ल्याचं वृत्त देताना पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीरही वेगळं दाखवलं होतं.
पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर वेगळं दाखवण्याचा परिणाम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कोरिडोअरवर (सीपीईसी) होण्याची शक्यता आहे. सीपीईसी पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताने त्याचा विरोध केला होता.

मोदी सरकारच्या परराष्ट्र नितीचा हा विजय असून याआधीच्या सरकारांनी घेतलेली बोटचेपी भुमिका जुगारून देऊन भारताची रास्त बाजू सक्षमपणे जगासमोर आणणार्‍या मोदी सरकारला दुसरी टर्म सुरू करण्यासाठी हा शुभ संकेतच आहे.      

11 April, 2019

९०० पेक्षा जास्त कलाकारांचा भाजपला पाठिंबा



९०० पेक्षा जास्त कलाकार आणि लेखकांनी एकत्र येऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. नेशन फर्स्टया मंचाखाली एकत्र येऊन या कलाकार व लेखकांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी मजबूर नाही तर मजबूत सरकार पाहिजे असे या पत्रकात म्हटले आहे. यात पंडित जसराज, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, मालिनी अवस्थी, विवेक ओबेरॉय, कोयना मित्रा, गायिका अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, रिता गांगुली यांच्यासह ९०७ कलाकारांचा समावेश आहे.

या कलाकारांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचेही कौतूक केले आहे. काही दिवसांपूर्वी सहाशेहून अधिक कलाकारांनी भाजप आणि मित्रपक्षांविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. यात अमोल पालेकर, नसिरहुद्दीन शाह, गिरीश कर्नाड आदी कलाकारांचा सामावेश होता. भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे सांगत व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर अनेक दिग्गज कलाकार भाजप व पंतप्रधान मोदींच्या समर्थानात उतरले होते. याच धर्तीवर ९०७ कलाकार नेशन फर्स्टया मंचाखाली एकत्र येऊन भाजप आणि मोदींची देशाला आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

मोदी सरकार चांगले काम करत असून मागील पाच वर्षात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. दहशतवाद या समस्येविरोधात उभे राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. गेल्या पाच वर्षात देशाने भ्रष्टाचारमुक्त, सुशासन, देशाला विकासाच्या मार्गावर नेणारे सरकार पाहीले आहे, त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल आणि दहशतवादाला हद्दपार करायचं असेल तर सध्याच्या घडीला कमकुवत नाही तर मजबूत सरकारची आवश्यकता आहे. याचमुळे जनतेने कोणत्याही दबावात न येता मतदान करण्याचे आवाहन या कलाकारांनी केले आहे.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates