25 January, 2019

केरळचा कोल्लम बायपास




केरळचा कोल्लम बायपास


गेली ४५ वर्षं रखडलेला केरळमधील कोल्लमचा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील 13 किलोमीटर लांबीचा दुपदरी कोल्लम बायपास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच राष्ट्राला समर्पित केला. पायाभूत विकासाला सरकारचे प्राधान्य आहे आणि कोल्लम बायपास हे याचे उदाहरण आहे, असे याप्रसंगी झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कोल्लम बायपासमुळे अलाप्पुझा आणि तिरुअनंतपुरम दरम्यान प्रवासाचा वेळ कमी होईल आणि कोल्लम शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल.

रस्ते जोडणीतील 'प्रगती' अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते बांधणीचा वेग जवळपास दुप्पट आहे. आधीच्या सरकारमधील 56 टक्क्‌यांच्या तुलनेत आज 90 टक्क्‌यांहून अधिक ग्रामीण गावे जोडण्यात आली आहेत. लवकरच 100 टक्के ग्रामीण रस्ते जोडणीचे उद्दिष्ट सरकार पूर्ण करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रादेशिक हवाई संपर्क आणि रेल्वेमार्गांच्या विस्तारामुळे लक्षणीय सुधारणा झाली असून यामुळे रोजगार निर्मिती झाली आहे.जेव्हा आपण रस्ते आणि पुल बांधतो तेव्हा शहरे आणि गावे जोडत नाही तर आपण महत्त्वाकांक्षांना कामगिरीशी जोडतो, आशावादाला संधींशी जोडतो आणि आशेला आनंदाशी जोडतो, असे पंतप्रधान म्हणाले.

पर्यटन हा केरळच्या आर्थिक विकासाचा कणा असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत त्याचे प्रमुख योगदान आहे. केरळची पर्यटन क्षमता ओळखून सरकारने स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनांतर्गत राज्यात सात प्रकल्पांना मंजुरी दिली असून यासाठी 550 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असे त्यांनी सांगितले.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.




No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates