२००६ मुंबई लोकल ट्रेन्समध्ये झालेले स्फोट, २००७ साली समझौता एक्सप्रेसमध्ये झालेले स्फोट, २००८ मुंबईवरचा आतंकी हल्ला, २००८ अहमदाबाद स्फोट, २००८ बंगलोर स्फोट, २०१० पुणे जर्मन बेकरीत स्फोट, २०११ मध्ये मुंबईत पुन्हा झालेले स्फोट, आझाद मैदानात रझा अकादमीने केलेला थयथयाट, महिला पोलिसांची त्यात झालेली मानहानी अशी एकामागोमाग एक बॉम्बस्फोटांची आणि अतिरेकी हल्ल्यांची जंत्री भारतातल्या लोकांना काँग्रेस सरकारच्या राज्यात आगतिकपणे सहन करावी लागली आहे. वर 'बडे बडे देशोमें ऐसी छोटी छोटी बातें होती रेहेती है हा उद्दामपणाही ऐकावा लागला आहे. 'उरी' च्या निमित्ताने थिएटरमध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा लोकांना वाटणारा अभिमान ही त्या सगळ्या क्षणांची आणि हल्ल्यांची मनात साचलेली अगतिकता असते.
उरीच्या
हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सनी ही अगतिकता नाहिशी केली.
कोणीही यावं आणि टपली मारून जावं, असा भारत आता उरलेला नाही.
पुन्हा मोदीच का? याचं हे एक कारण आहे.
No comments:
Post a Comment