10 December, 2012

डॉ. रामाणी – अखंड उर्जा स्रोतयश हे अमृत झाले हा ग्रंथालीने आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे निमंत्रितांना उर्जा प्रदान करणारा होता. कार्यक्रम संपायच्या आधीच मन तृप्त झालं होतं आणि कार्यक्रमानंतर असलेली मेजवानी हा बोनस होता. डॉ. प्रेमानंद शांताराम रामाणी हे जागतिक किर्तीचे न्यूरोस्पायन सर्जन, त्यांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही पण कालच्या कार्यक्रमाला जे हजर होते त्यांना डॉक्टरांची पुन्हा नव्याने आणखीन ओळख झाली यात शंका नाही. गरिबीतून वर आलेली व्यक्ती वृध्दत्वाकडे झुकू लागली आणि वर्तमानात कितीही श्रीमंत असली तरी आपण भोगलेल्या हालपेष्टांचं भांडवल करत आपण किती कठीण परिस्थितीचा सामना केला ते सतत सांगण्यात धन्यता मानते. डॉ. रामाणी अशा गरिबीतून वर आले पण वर येताच त्यानी आपल्या गोव्यातील वाडी गावापासून कर्मभुमी मुंबई पर्यंत सगळ्याच अडलेल्या पडलेल्याला मदत करून समाजाचं ऋण फेडलं आणि आजही फेडत आहेत. आपल्या जन्मगावाचा तर त्यानी कायापालट केला. जागतिक किर्ती प्राप्त झाल्यावर तर भले भले प्रसंगी आपल्या मायदेशालासुध्दा भिक घालत नाहीत पण डॉ. रामाणी ते सगळं बाजूला ठेवून पुन्हा आपल्या देशाच्या क्षितीजावरच उगवतात.

पंच्याहत्तर वर्ष पुर्ण झाल्यावर माणूस किती थकला असेल असं वाटतं पण काल अखंड उर्जेचा स्रोत समोर वाहताना बघून धन्य झालो. आणि डॉक्टर ती उर्जा सभागृहातल्या प्रत्येकाला वाटत होते. सर्व सभागृह त्यात न्हाऊन निघालं होतं. तबला वादन, ट्रेकिंग, मॅरॉथॉन, लेखन ही वैद्यकीय व्यवसायापासून भिन्न असलेली क्षेत्रं धुंडाळताना ते त्या त्या क्षेत्रात तेवढेच लिलया वावरत असताना बघून हे त्यांचं आत्मिक बळ आहे हे सतत जाणवत राहात.

मुंबई विद्यापिठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख डॉ. रामाणींबद्दल बोलताना म्हणाल्या की शस्त्रक्रिया केल्यावर रामाणीसर त्याचं श्रेय घेण्यासाठी कधीच थांबत नसत. पण श्रेय सोडाच पण आपला अधिकार असला तरी त्या बद्दल आग्रही न राहण्याची ऋजूता डॉक्टरांच्या ठायी आहे हे मी माझे मित्र आत्माराम परब यांच्या कडून ऎकलं आहे, अनुभवलं आहे. लेह-लडाखच्या सहलीवर असताना आपली खरी ओळख न देताच डॉ. रामाणी इतर सहयात्रीं प्रमाणे सहलीत सामिल झाले होते आणि ओळख उघड झाल्यावरही कुठल्याही विशेष सोयीसवलतींना नकार देत राहीले. त्या सहलीत उत्साही मुलाप्रमाणे डॉक्टरांनी सर्व ग्रुपचे फोटो त्यांच्या त्यांच्या कॅमेर्‍यातून काढून दिले. प्रत्येक क्षण नव्याने जगण्याची ही हातोटी रामाणीसरांजवळ आहे म्हणून पंच्याहत्तरीत ते त्या वयाचे वाटत नाहीत.

जीवन आणि स्वास्थ्य या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचं, सत्तरीचे बोलच्या चौथ्या आणि ताठ कणाच्या पंधराव्या आवृत्तीचं प्रकाशन काल संपन्न झालं. डॉ. रामाणींच्या लेखनावर वाचक एवढं प्रेम का करतात? त्याचं कारण म्हणजे सगळं अनुभव कथन हे प्रामाणिक असतं आणि म्हणूनच मनाला भिडणार असतं. गंथालीने ही पुस्तकं अतिशय नेटकी आणि उत्तम दर्जाच्या स्वरूपात वाचकांना सादर केली आहेत ( ही पुस्तकं वाचनीय आहेत हे वेगळं सांगायला नको.)

या कार्यक्रमाचा परमोच्च्य बिंदू होता तो म्हणजे डॉ. रामाणींचा हृदय संवाद. ऍलोपथीचे एक डॉक्टर असूनही त्यांनी तिथे धडे दिले ते आयुर्वेदाचे. नियमीत व्यायाम, मेंदूला चालना देण्याचे खेळ, जीवन जगण्यासाठी परमेश्वराने दिलेलं जीवन म्हणजे पाणी त्याचं सेवन, फळं आणि पालेभाज्यांचं महत्व, लसूण, हळद, कांदा, टोमॅटो, सोयाबीन, फ्लॉवर, ब्रोकोली यांचं महत्व सांगताना डॉ. आयुर्बेदाचार्यच भासत होते. निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली देणारा हा ऋषी पुढील पन्नास वर्ष आम्हाला मार्गदर्शक होवो. देवा जवळ दुसरं काय मागायचं?             


नरेंद्र प्रभू
               

03 December, 2012

गंध धुंदतो... सुगंध तसाच
नित्य दरवळणारा
तू अवती भवती असताना
मला मोहवणारा

वार्‍याची झुळूक
नित्य नवी
तुझ्या अत्तराची कुपी त्या संगे
हवीच हवी

मला अजून त्याची
सवय झाली नाही !
मंद सुवासाची लहर
जुनी झालीच नाही !

कोटी कोटी श्वास
सुखावत गेले
जगण्याची धुंदी
वाढवत गेले

तुझ्या पाकळ्यांच्या आत
अशी काय जादू ?
किती किती पदर
त्याची लय कशी साधू ?

हे तुझं चिरंतन देणं
आणि माझं नित्य नवं होणं
वसंता सारखं बहरणं
आणि रातराणी होणं 

तो स्त्रोत तसाच ठेव
नित्य दरवळणारा
माझ्या अवती भवती
मला खुलवणारा


नरेंद्र प्रभू 

21 November, 2012

आभाराचा एक दिवसनोव्हेंबर महिन्याचा चौथा गुरूवार हा ‘थँक्स गिव्हिंग डे’ म्हणून अमेरिकेत साजरा केला जातो असं नुकतच वाचलं. उद्या २२ नोव्हेंबर हा या वर्षीचा थँक्स गिव्हिंग डे आहे. कृतज्ञता या शब्दा पाठोपाठ ‘व्यक्त’ हा शब्द येतो, म्हणजे आपल्याकडे सुद्धा ती गोष्ट आहे पण आपण ती अगदी हातचं राखून करतो. म्हणून दोन दोनदा कुणी थँक्स थँक्स म्हटलं की मला तरी काय करावं ते सुचत नाही. माझा एक पारसी मित्र खुपच गोड बोलणारा आणि हळूवार स्वभावाचा आहे. दहा वर्षांपुर्वी जेव्हा त्याची पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा तो एवढा चांगला कसा वागतो म्हणून मला खुप अप्रूप वाटायचं. नंतर मला त्याची सवयच झाली, पण शालीन स्वभाव म्हणजे काय हे त्याच्या वडीलांना भेटलो तेव्हा मला समजलं आणि बेहरामच्या स्वभावचं कोडं ही सुटलं.

खरं म्हणजे जन्माला आल्यापासून आपण सारखं काहीतरी घेत असतो किंवा कुणीतरी आपल्याला सतत सर्व काही देत असतं. हळू हळू आपल्याला त्याची सवय होऊन जाते आणि मग जे मिळतं तो आपला हक्कच आहे असं वाटायला लागलं. इथे सामंज्यस्य संपतं आणि “कोण म्हणतो देणार नाही...“ या पायरीपर्यंत आपण येऊन पोहोचतो. जन्माला आल्या आल्या आई, मग वडील, कुटूंब, मित्र, समाज, कुठल्याही लहान मुलाचं हास्य, एवढच काय प्राणीमात्र, निसर्ग, वर पसरलेलं अनंत आकाश, अथांग सागर, नद्या-नाले सतत आपल्याला काहीना काही देतच असतात. एवढं असूनही तक्रार करण्याची आपली सवय काहीकेल्या जात नाही. “काय करणार...” अशी सुरुवात करून जो तक्रारीचा पाढा सुरू होतो तो मग थांबतच नाही. आपली जेव्हा गैरसोय होते तेव्हा खरं तर जागं व्हायची वेळ असते. आता गैरसोय वाटते म्हणजे अशाच परिस्थितीत आधी कुणीतरी आपली सोय बघितलेली असते किंवा आधार दिलेला असतो. आई किंवा बायको आजूबाजूला नसतात तेव्हा नवरे मंडळींची काय त्रेधा उडते? किती करत असतात ही मंडळी आपल्यासाठी?

शाळेत असताना शिक्षक आपल्या उभ्या आयुष्याला आकार देण्यासाठी सतत झटत असतात. मोलाचं मार्गदर्शन करित असतात. त्या वेळी त्याचं महत्व कळलं नाही तरी नंतर पदोपदी त्यांची आठवण येतच असते. प्रवासात असताना चालक, सहलीत असताना सहल संयोजक किंवा सहलसाथी, निसर्गात असताना झाडं, वेली, फुलं आपल्यावर आनंदाची बरसात करत असतात. अनंत हस्ते दिलं जाणारं हे धन आपण आयुष्याभर घेतच असतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कर्तव्यच आहे.

‘अमेरिकन फॅड’ म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ते हा दिवस साजरा करतात म्हणून त्यांच्याप्रती आणि आयुष्यात आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टी मिळाल्या म्हणून ते मिळण्यासाठी कारण झालेल्या प्रत्येकाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया. मनापासून दिलेली दाद आणि मनापासून मानलेले आभार खुप काही देऊन जातात देणार्‍यालाही आणि घेणार्‍यालाही.               


        

19 November, 2012

जन भावना, मन भावना

                                                                                                               
तू चिरंजीव
तू शिवसैनिकांचा सदाशिव
तू ध्यास
तूच विश्वास  
तू आधार
तूच निर्धार
तू करुणाकर
तूच ईश्वर  
तू झंजावात
तूच वादळवाट
तू आमचा गर्व
तू एक पर्व
तू साक्षात्कार
तूच परिवार
तू जागता
तूच नेता
तू प्रेमळ
तू निर्मळ
तू विठ्ठल
तू दरवळ
तू करारी
तूच अधिकारी
तू चैतन्य
तू लोकमान्य
तू प्रेरणा
तूच धारणा
तू मनामनात
तूच धमण्यात 
तू गाज
तू आवाज
तू विर
तूच धिर
तू सण
तूच दर्शन
तू मान
तूच अभिमान
तू रत्नाकर
तूच जनसागर
तू भगवा 
तूझाच एक धावा  
तू विराट
तूच हिंदूहृदयसम्राट


नरेंद्र प्रभू 

10 November, 2012

सुख पाहता
अलिकडे वृत्तपत्रांची पहिली पानं सुख विकणार्‍या जाहिरातींनी भरलेली असतात. घर, ते सजवणारं सामान या पासून कडधान्यापर्यंत आणि इच्छित स्थळी पोहोचवणारी किंवा इच्छित स्थळी ठेवण्यासाठी असलेली गाडी या पासून ती चालत असताना कान, डोळे यांना सुखावणारी यंत्र (इलेक्ट्रॉनीक गॅझेटस) अशा अनेक प्रकारच्या जाहिराती सकाळी सकाळीच दृष्टीस पडतात. मित्रांनो सुख विकणारे हे दलाल असे प्रभातकालीच आपल्या घरात घुसखोरी करतात आणि मग तिन्ही त्रिकाळ आपला पिच्छा पुरवत असतात. टि.व्ही. हा आता जाहिराती पाहण्यासाठीच असतो. अधून मधून एखादं गाणं, चार संवाद, बातम्या या त्या जाहिरातींदरम्यान दाखवल्या जातात. घरात हा जाच सहन करावा लागत असल्याने जरा बाहेर पडावं तर बाहेरचं जग तुम्हाला सुखी करण्यासाठी जय्यत तयार असतं. रस्ते, बाजुचे मॉल, दुकानं, फुटपाथ आणि त्यातून वाट काढत कसेबसे आपण पुढे गेलो की ट्रेन आणि बस मध्येही हे सगळे देवदूत हजर असतात. (हल्ली स्वप्न ही मॉल मधलीच पडतात.) एवढं पार करून कामाकडे लक्ष द्यावं म्हटलं तर संगणकावर महाजालात या जाहिराती आपला पिच्छा सोडत नाहीत.

या जाहिराती हिच आपली सुख मोजायची पट्टी झालीय. जाहिरातीत दिलेल्या किंमतीपेक्षा एखादी वस्तू आपल्याला स्वस्त मिळाली की आपण सुखाऊन जातो. किंवा ती घ्यायला अधिर होतो. (भले त्या वस्तूची आपल्याला गरज असो नसो.) थोडक्यात जाहिराती शिवायचं जीवन ही कल्पनाच करवत नाही एवढी त्याची आपल्याला सवय झाली आहे.  मित्रांनो सुख हे असं विकत मिळतं का? केवळ इंद्रियांच सुख (ते सुद्धा दुसरे म्हणतात म्हणून) म्हणजेच सुख का? या जाहिरातींनी वाढवलेल्या उन्मादामुळे किंवा आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलांना तरी मिळूदे म्हणून हट्टाने आणलेल्या वस्तूंमुळे आपण सुखी होणार का? आता दिवाळीचं निमित्त, पण त्या आधी आलेल्या आणि पुढे येणार्‍या सणांच्या वेळी सर्वच प्रकारचं प्रदूषण करणारे आपण कोणतं सुख निर्माण करत असतो? असे अनेक प्रश्न आजकाल सारखे सतावू लागलेत.

या सगळ्या गलबल्यात आपण एका जागी शांत बसूही शकत नाही आणि त्यामुळे मनं शांतच होत नाही. हा सगळा गडबडीचा गाळ खाली बसल्याशिवाय प्रसन्न कसं वाटणार? एवढ्या सगळ्या गोंधळामुळे आपण आपल्या संवेदनासुद्धा हरवून बसलो आहोत. त्या संवेदना, निर्व्याज आनंद परत मिळवायचा असेल तर शांतता निर्माण केली पाहिजे किंवा एखाद्या शांत ठिकाणी गेलं पाहिजे आणि ते शक्य नसेलतर एका जागी शांत बसून डोळे बंद करून गतजीवनातले तृप्तीचे क्षण आठवले पाहिजेत मग ती एखाद्या पक्षाची शिळ असेल, नदीचा किनारा असेल, समुद्राची गाज असेल, पौर्णिमेचं चांदणं असेल, खळातता प्रवाह असेल, रिमझिमणारा पाऊस असेल, पर्वत शिखरं असतील, हरणाचं बागडणं असेल, अगदी मांजरीचं पायात घोटाळणं असेल किंवा तूमच्या बाळाचं पडणारं पहिलं पाऊल असेल, शांत बसून डोळे बंद करून हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करा, खरा आनंद, उत्कटतेचे ते क्षण नक्कीच आपल्याला आनंद देतील. मी या दिवाळीत हे करून पाहणार आहे. सुख, सुख म्हणतात ते हेच असेल......!
हि दिवाळी आपणा सर्वांना सुखमय आणि आनंददायी जावो.   


04 November, 2012

चाहूलशितल वारा, धुंद गारवा
धुक्यात दडली वाट
कुणीतरी येते, चाहूल देते
असे मोकळा घाट  

स्पर्श दवाचा, तळ पायाला
हुरळून होतो गात
क्षणात गाणे मनात गातो
हुरहुरतो अंतरात

ती दिसली, हसली
बसून बोलली
आठवणीची
एक साख़ळी

नरेंद्र प्रभू 


29 October, 2012

संसद अधिवेशन की अधोगतीची मोशन?


संसदेचं गेलं अधिवेशन कामकाज न होण्यामुळेच गाजलं. हजारो करोड रुपयांचा घोटाळ्याला तोंड द्यावं लागू नये म्हणूनच तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मिळून मुद्दामच तर हे नाटक केलं नसेल ना ? आता पुन्हा संसदेचं हिवाळी अधिवेशन होऊ घातलय आणि पुन्हा तोच तो गोंधळ घालून घोटाळेबहाद्दर नामानिराळे राहाण्याचा प्रयत्न करणार आहेत. द हिंदू या नियतकालीकाची  एक चित्रफित आत्ताच  फेसबुकवर पाहायला मिळाली. ही मार्मिक चित्रफित   खाली दिलेल्या दुव्यावर मुद्दम पाहाच.  


Hats Off 'The Hindu' for this video. A must watch.http://www.facebook.com/photo.php?v=4240719848781

28 October, 2012

मला वाटते


मला वाटते आकाशातून उंच उडावे
मला वाटते क्षितीजावरती गाणे गावे
मला वाटते ढगांमागूनी विहरत जावे
मला वाटते सांज कोवळे उन नहावे

मला वाटते नील नभाचे हात धरावे
मला वाटते चंद्र चांदणे पिऊन घ्यावे
मला वाटते चांदण्यांसवे तिथे रमावे
मला वाटते धुमकेतुचे शेपूट व्हावे

मला वाटते शितल वार्‍यावर पहूडावे
मला वाटते उष:कालीचे रंगच व्हावे
मला वाटते दवबिंदूसह खाली यावे
मला वाटते चिवचिवणारे गाणे गावे

नरेंद्र प्रभू


26 October, 2012

MTNL 3G DATA CARD SETTING


I have purchased 3G Data Card from Mahanagar Telephone Nigam Limited Mumbai (MTNL Mumbai). After completing auto setup I was expecting that Internet will start smoothly and surfing will be the great   experience. But when I try to connect to net “PPP Link control Protocole was Terminated” error occur. After trying to get solution from net I called customer care No 1503 and got positive response.  Instructions are as follows:

For Windows 7 OS

Go To Control Panel

> Phone   & Modem     

> Modem Menu

> Select Com for HSPADataCard USB Modem 1

> Click on Properties Option

> Click Diagnostics

> Click Query Modem

After few seconds system will detect your USB Modem  then

Ø      Click Advanced Menu

Ø      In Extra Setting type extra initialization commands as

at+cgdcont=1,”ip”,”mtnl.net” 

Click OK

After doing this setting and selecting proper Connection (in my case MTNL Mumbai 3G pre paid) internet connection was established.

MTML/BSNL 3G is the best service in available 3G services in Mumbai and Maharashtra

***
disconnected frequently ?  here is the Solution The BSNL 3G data card card gives blazing fast speeds but comes with a downside...It gets disconnected frequently! This way you cannot fire and forget your downloads. It may get disconnected as soon as it see's your back.

There is workaround for this problem. That is to use windows dial-up.

This works for me and should work for you, still DO IT AT YOUR OWN RISK!. I dont take any responsibilty of something going wrong to your system.

1) I assume that you have installed the bundled software inside the USB 3G data card and you can connect the 3G internet form it AND the device is connected to the system.

2) Open Device Manager. The "HSPADataCard USB Modem" should be listed there. Right click to open properties. In the open window choose the "Advanced" tab. In the 'extra initialization commands:' enter at+cgdcont=1,"IP","bsnlnet". click OK to close the window.
image:
Find attached images

3) From Control Panel open "Network and Sharing Center". From the left hand pane click "Change Adapter Settings". You should see a dial-up connection for your 3G Modem.Right click and choose properties. Select the "General" Tab. In the Phone Number box enter *99# Create a shortcut to the dial-up connection on your desktop. (If not you will have to create Dial-up connection in "Network and Sharing Center". See bottom of the post)

image:
Find attached images


4) Select the "Options" tab make changes as follows :

Check "Display progress while connecting"
Uncheck all others.
Enter "Redial attempts" 99
Enter "Time between redial attempts" 1 Second
Enter "Idle time before hanging "never"

Check "Redial if line is dropped"

Click OK
image:
Find attached images


DONE!
Right Click the dial-up connection and click "Connect"
Your internet should be running now.

Now windows automatically attempts to connects to the modem if line is dropped.

Note: Dont connect through your BSNL software! It should stay running in the background. you may minimize it to sys tray.

[To Create Dial-up connection open "Network and Sharing Center". Click "Setup a new connection or network". Click next. Follow the instructions. Enter phone no as *99# when prompted. Leave username and password blank when prompted.]
***


when you will get red signal in teracom 3g software it means no coverage.

when it turn to green but GPRS or EDGE network, it means 2G network, so you dont get speed.

When its show UMTS or HSPA, it means its 3G So you will get 200 to 400 kBPS minimum.

IF you want to use other sim card in Teracom 3G datacard, then you can contact me on :rushabh2886@gmail.com Its free for social service.

***

OR


try 'Reconnect'. i think it works fine too. just give it a go. you can find the software in cnet or softpedia.
20 October, 2012

हार्ट-टू-हार्ट - नितीन पोतदार
झी चौवीस तास वर कॅर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांची हार्ट-टू-हार्ट या कार्यक्रमात आत्ताच झालेली मुलाखत मराठी मनाला खरंच अंतर्मुख करणारी होती. देशभर चाललेली अंधाधुंदी, भ्रष्टाचार, विकृत राजकारण, बेभरवशाचे सर्वच क्षेत्रातील नेते या सर्वांमुळे भांबावून गेलेल्या मराठी मनाला आश्वासक आधार देणारी ही मुलाखत होती.

  • विश्वासार्हता हा माराठी माणसाचा ब्रॅन्ड आहे.
  • स्वत:च्या कामात झोकून द्या यश मिळतच.
  • जागतीक स्थरावर अंगभूत गुणांनाच फार महत्व आहे.
  • परकीय गुंतवणूकीची देशाला गरज आहे.
  • मराठी माणूस कुठल्याच क्षेत्रात मागे नाही.
  • सरस्वती की लक्ष्मी ?  याला दिलेलं हार्डवर्क हे उत्तर.

असे अनेक मुद्दे या मुलाखती दरम्यान आले. उदय निरगुडकर यांनी घेतलेली ही मुलाखत मनाला उभारी देणारी होती. आज पाहायला चुकला असाल तर उद्या नक्की पहा.
   

17 October, 2012

सॅन्डस्केपकवी विष्णू सुर्या वाघ/छायाचित्र उमेश साळगावकर


उमेश साळगावकर
विष्णू सुर्या वाघ या गोमंतक पुत्राला ही सुंदर कविता  सुचली ती माझे मित्र उमेश साळगावकरांची छायाचित्रं पाहून. जिथे सागरा धरणी मिळते... तिथे.... अनेकांनी अनेकदा आपली सकाळ विशेषत: सायंकाळ नक्कीच रमणीय केली असेल. वाळूचे किल्ले बांधले असतील किंवा आपल्या नावाची अक्षरं कोरली असतील, पण अशा सागर वेळेवर जेव्हा उमेश साळगावकरांसारखा जातीवंत कलाकार जातो तेव्हा ती त्यांच्या कॅमेर्‍यामागच्या डोळ्याला अधिकच देखणी दिसते. सागर आणि रुपेरी वाळू यांच जे अतूट नातं आहे त्याचं तितकंच विलोभनीय चित्रण साळगावकरांनी आपल्या कॅमेर्‍याव्दारे केलं आहे. सागर किनारा, त्यावरची हळवी झालेली वाळू, कधी लाटांनी तर कधी दवबिदूंनी. कधी तिथल्याच उभयचरांनी केलेली कशीदा आणि नैसर्गिक कलाकुसर यांचं प्रत्ययकारी दर्शन आपल्याला साळगावकरांच्या छायाचित्रांमधून पाहायला मिळतं आणि ते पाहून आपण स्तिमित होतो. आपण नेहमीच पाहिलेला किनारा काय सौदर्य ल्यालेला असतो त्याची प्रचिती येते.

गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ छायाचित्रणात कौशल्य दाखवून अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणार्‍या उमेश साळगावकरांनी छायाचित्र प्रदर्शनातून रसिकांना आनंद दिला आहे. आजवर निसर्गाची अदाकारी नेहमीच आपल्याला भुलवीत आली आहे. पण ती अधिक डोळसपणे पाहायला लावणारं छाया, प्रकाश आणि वाळू यांच्या सुरेख आकृतीचं छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. ‘सॅन्डस्केप’ या शिर्षकाखाली होणारं हे त्यांचं चौथं प्रदर्शन आहे. सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम गुरूवार दिनांक १८ ऑक्टोबर सायंकाळी वा. मुंबई क्रिकेट असोसियेशन चे अध्यक्ष मा. रवी सावंत यांच्या शुभहस्ते होणार असून १९ ते २४ ऑक्टोबर २०१२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी या वेळेत, जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी रोड, काळाघोडा मुंबई ४०० ००१ या ठिकाणी प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनामुल्य खुले राहील. हे प्रदर्शन पुन्हा एकदा आपल्याला सागरतीरी जायला नक्कीच उद्युक्त करील.

04 October, 2012

ज्ञातव्य – एक नेत्रसुखद अनुभव
ज्ञातव्य हे सुलेखनकार सुभाष गोंधळे यांचं चित्रप्रदर्शन आर्टीस्ट सेंटर गॅलरीत सध्या सुरू आहे. कालच हे चित्र प्रदर्शन पाहाण्याचा योग आला आणि वाट वाकडी करून आर्टीस्ट सेंटर गॅलरीत गेल्याचं समाधान वाटलं. नुसती अक्षरं, शब्द पण ते सुलेखनाच्या माध्यमातून समोर आले की स्तिमीत व्हायला होतं. देवनागरी लिपीतील स्वर आणि व्यंजनं, त्यांच्या उच्चारणातील सुलभता आणि काठीण्य चित्रांच्या माध्यमातून किती सहजतेने हाताळलेलं आहे ते ती चित्र पाहाताच लक्षात येतं.

सुलेखनकार सुभाष गोंधळे (सुगो)
ॐ नम: शिवाय हा मंत्र तर आपल्याला थेट मंदीराच्या गाभार्‍यात घेऊन जातो. मंत्रोच्चारानंतर निर्माण होणारी स्पंदनं आणि आवर्तनं ही चित्रांच्या माध्यमातून कॅनव्हारवर प्रकट करणं हे सुगोंच्या शैलीचं खास वैशिष्ट्य म्हणता येईल. कराग्रे वसते लक्ष्मी या मंत्राचे भावही कॅनव्हासवर तेवढयाच ताकदीने साकार झाले आहेत.


हे अक्षरांनो मंत्र व्हा असं जर म्हटलं आणि खरोखरच ती अक्षरं मंत्र झाली आणि आपल्याशी बोलू लागली तर? अक्षरं, शब्द आपल्या अर्थ, भावासहीत आपल्याला सामोरी आली तर काय बहार येईल? सुगो अर्थात सुभाष गोंधळे हे सुलेखनकार ज्ञातव्य (समजण्यास सोपे) या आपल्या प्रदर्शनाव्दारे आपल्याला ही संधी उपलब्ध करून देत आहेत. सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी शब्दांना असे आकार दिले आहेत की ते शब्द आपल्याशी त्यांच्या अर्थासहीत बोलू लागतात. आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात.

केवळ अक्षरांना आकार देऊन पाहाणार्याला आध्यात्मिक अनुभवाचा प्रत्यय देण्याचं  काम सुगो करतात ते पाहून अचंबीत व्हायला होतं. , स्वस्तिकअशा चिन्हांना सुगोंनी ज्या रंगसंगतीत सादर केलं आहे ती पाहाताना ध्यान धारणेची प्रभावळ पाहिल्याचा आनंद मिळाला तर नवल वाटू नये.

देवनागरी लिपीचं सौंदर्य मंत्रांच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरवतांना सुगोंनी त्या भाषेचा आत्मा, नजाकत याला नक्कीच न्याय दिला आहे. प्रत्येक अक्षराला त्याचं स्वत:चं व्यक्तित्व, स्वभाव आणि लय प्राप्त करून देताना सुगोंच्या कुंचल्यातून सादर झालेली एक अप्रतिम अदाकारी पाहाताना मन मोहून जातं. सुलेखन ही एक कला तर आहेच पण ते एक व्यक्त होण्याचं साधनही आहे. आपल्याशी बोलणारी ही अक्षरं, ते शब्द, मंत्र याचा आनंदानुभव घ्यायचा असेल तर सुगोंच्या प्रदर्शनाला अवश्य भेट दिली पाहिजे. सदर प्रदर्शन आर्टीस्ट सेंटर गॅलरी, ऍडोर हाऊस, ६ के दुभाष मार्ग, जहांगीर आर्ट गॅलरी जवळ, काळाघोडा, फोर्ट मुंबई ४०० ००१ या ठिकाणी, १ ते ७ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील. बोलणारे शब्द थेट हृदयाशी संवाद साधतात याचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येईल.    


26 August, 2012

कायद्यावर घाला! जनात आणि वनातही.देशात आणि राज्यात अखंड अवनतीचंच राज्य सूरू आहे. इथल्या संविधानावर, कायद्यावर, निसर्गावर राजरोसपणे हल्ला होतो आहे. राजकीय नेतृत्व हतबल आणि संभ्रमावस्तेत चाचपडताना दिसत आहे. गुंडापुंडांच्या हातात सत्ता गेल्यासारखं वाटत राहतं. महाराष्ट्रातील सव्यसाची आणि झोकून देऊन काम करणार्‍या मानमीय व्यक्तिंपैकी राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचा लेख कायद्याचे राज्य आहे कुठे? (११ ऑगस्टाची दंगल)  आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची  पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया (पश्चिम घाट परिसर अभ्यास अहवाल) मुलाखत आजच्या लोकसत्ता मध्ये आली आहे. शहरात आणि गावात चाललेली अंधाधुंदी या वर प्रकाश टाकणारे आणि विचारकरायला लावणारे हे लेख जरूर वाचच.


गाडय़ांना आगी लावत, पत्रकारांवर पाशवी हल्ले चढवत, पोलिसांना जीवघेणं बदडून काढत आणि त्यांच्या बंदुका, काडतुसे हिसकावून घेऊन गुंड पळून जात असताना आणि सर्वात कळस म्हणजे महिला पोलिसांचा भरदिवसा हे पशुतुल्य हल्लेखोर विनयभंग करत असताना पोलिसांनी काय करायचे? महात्माजींच्या सत्याग्रहीप्रमाणे हात जोडून त्यांनी गुंडांना विनंती करायची, की कायद्यानं दिलेला अधिकार वापरून हा हिंसाचार, विनयभंग थांबवायचा? पोलिसांचा हा अधिकार का काढून घेतला गेला? हा संयम, ही पळवाट, की कायदे बिनदिक्कत तोडणाऱ्यांना पोलीस नेतृत्वाने आणि राज्यकर्त्यांनी दिलेले हे उत्तेजन? या राज्यात कायद्याचे राज्य आहे तरी काय, असा हतबल करणारा प्रश्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात उभा राहतो.  पुढे वाचा>>>    

            
पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या समितीने सारे वास्तव अहवालात मांडून  सूचना केल्या. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचा त्यात सहभाग होता. पण ते बदलून जाताच मंत्रालयाने अचानक ठरविले, आमचा अहवाल दडपून ठेवायचा. नव्या मंत्री जयंती नटराजन यांना विनंती केली, की मी तुम्हाला भेटू इच्छितो, म्हणजे या अहवालात काय आहे ते सांगता येईल, नंतर तुम्ही काय तो निर्णय घ्या. मात्र, त्यांनी भेट नाकारली.
मग लोकांनी माहिती अधिकाराखाली तो अहवाल मागितला व माहिती आयुक्तांनी आणि नंतर उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढून तो जाहीर करायला लावला..
पर्यावरण तज्ज्ञ आणि पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ.माधव गाडगीळ यांनी लोकसत्ताच्या आयडिया एक्स्चेंजकार्यक्रमात साधलेला मुक्त संवाद. पुढे वाचा>>>  


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates