निवडा नवा मार्ग
यश आहे पुढं
तोडा सारी बंधनं
जोरात दौडूदे घोडं
बघा नवी स्वप्नं
लोक म्हणूदे वेडं
त्यांच्यापासून थोडंच आहे
अडणार आपलं घोडं
म्हणतील हे वय काय
रिस्क घ्यायचं आहे?
त्यांना काय माहित
यातच मजा आहे
पायात पाय घालू नका
हातात हात घाला
कुणी म्हणेल काळ आला
भेटूया ना त्याला
घोडं वाकडं धावलं तरी
सोडू नका लगाम
सवय झाली आता म्हणून
होवू नका गुलाम
कशासाठी जगायचं?
ठरवून घ्या पहिलं
वर्षामागून वर्षं संपली
हे ही वर्ष संपलं
कशासाठी थांबलाय
जायचंय ना पुढं?
बघा जरा निट
कुठे अडलं घोडं?
नरेंद्र प्रभू
अतिशय सुंदर.....वास्तव व प्रेरणादायी
ReplyDeleteAn Excellent Poem !!!
ReplyDeleteApratim Kavita
ReplyDeleteआभारी आहे.
DeleteVah, Surekh Kavita Narendraji,
ReplyDeleteआभारी आहे.
Delete