24 May, 2014

काश्मीरी पंडीतांचं पुनर्वसन होणार


काश्मीरी पंडीतांच्या मालमत्ता हडपणारे सशस्त्र अतिरेकी 

१९९० च्या जानेवारी महिन्यात एका काळरात्री काश्मीरी पंडीतांवर घाला घातला. विघटनवादी पाकिस्तान्यांनी आणि त्यांना साथ देणार्‍या श्रीनगर मधल्या मुसलमानांनी हाडं गोठवून टाकणार्‍या कडाक्याच्या थंडीत काश्मीरी पंडीतांवर हल्ला केला. नेसत्या वस्त्रानीशी त्या काळेखात काश्मीरी पंडीतांच्या स्वप्नांची आणि कित्येकांच्या जीवनाची राखरांगोळी झाली. सुमारे पाचलाख काश्मीरी पंडीत विस्थापीत झाले. श्रीनगरच्या नंदनवनात सुखात जगणार्‍या या भारतीयांना आपल्याच देशात पुन्हा एकदा ‘सरहद्द’ पार करावी लागली. देशाच्या विविध भागात गेली पंचवीस वर्षं ही पिडीत जनता पॉलिथीनच्या छपराखाली हालाखीचं जीवन जगत आहे. या काळात त्यांच्या मालमत्ता अतिरेक्यांनी बळकावल्या आहेत.
जीवनाची पहाट होण्याआधीच आघात झाला.
  

हलाकीचं जीणं  पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी काश्मीरी पंडीतांच दु:ख जाणून घेताना. 

आजवरच्या केंद्र तसच जम्मू-काश्मीर सरकारांनी त्यांच्या पुनर्वसनाच्या अनेक घोषणा केल्या पण त्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी कागदावरच राहिल्या. आता मोदी सरकार येवू घातलं असताना प्रत्यक्ष शपथ घ्यायच्या आधी कामा सुरूवात झाली आहे. काश्मीरी पंडीतांचं पुनर्वसन दृष्टीपथात आलं आहे. 
          
२००७ साली श्रीनगरमध्ये काश्मीरी पंडीतांच्या मालमत्ता आणि शाळांची मी टिपलेली दृश्य मनाला हेलावून गेली. आता त्या आपल्या बांधवांसाठी खरंच “अच्छे दिन” येणार.

काय योजना आहेत:

मोदी जी के आने के साथ काश्मीरी पंडितों के लिए शुभ सूचना:-
1. उनको पुनः कश्मीर में बसाने का कार्य प्राथमिकता के साथ किया जाएगा।।

2. प्रत्येक कश्मीरी पंडितों के विस्थापित परिवार को जमीन न होने पर 12 लाख रूपए एवं जमीन होने पर 8 लाख रूपए मिलेंगे।।

3. प्रत्येक कश्मीरी परिवार के 1 व्यक्ति को सरकारी नौकरी मिलेगी।।

4. विद्यालय जाने वाले उनके बच्चों को 1000 रूपए/प्रतिमाह का वजीफा दिया जाएगा।।

5. इनके परिवारों को उचित सुरक्षा दी जायेगी और घाटी में अमन-चैन और आपसी प्रेम सद्भाव के माहौल के लिए बड़े स्तर पर प्रयास शुरू किये जायेंगे।।

6. कश्मीरी पंडितों को पुनः बसाने के लिए युद्धस्तर पर अभियान शुरू किया जाएगा और प्रत्येक विस्थापितों को उनके कागजों की जांच करके शासन द्वारा लाभ का फायदा मिलेगा।।

धन्यवाद।। कोटिशः आभार मोदी जी।।
वन्दे मातरम्

आपल्या मायभूमीत असले फलक दाखवणारं नामर्द सरकार तेव्हा सत्तेत होतं.


कारगील युद्धानेही पंडीतांचे हाल थांबले नाहीत. 


यांना अधिकार द्या.


अशा नजरेने पाहण्याची हिम्मतही होता नये. 


हीच ती काश्मीरी पंडीतांची उजाड घरं. 


हे घर गेल्या पंचवीस वर्षांपासून वाट बघतय. 


देव नाही देवालयी


जाळपोळीतून शाळाही सुटल्या नाहीत. 


आकाश मोकळं होत आहे.


आता नुसती पान नाही तर कमळ फुललं आहे. 


या फुलांमध्ये आता कमळही मानाचं स्थान घेईल.


नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत रत्न ?


मोदी सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत रत्न देणार अशी बातमी आहे.   

देशाचा गौरव आणि अखंडत्व यासाठी असामान्य कामगीरी बजावणार्‍या व्यक्तींना भारत रत्न दिले पाहीजे याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. देशाचं आंतरीक आणि बाह्य शत्रूंपासून देशाचं संरक्षण करणार्‍या अनेक महनीय व्यक्तींना एकतर खुप उशीरा किंवा अजून भारत रत्न दिलं गेलं नाही. ज्या घटनेने भारताला एका धाग्यात बांधून ठेवलं आहे त्या भार्तीय राज्यघटनेसाठी आपार कष्ट करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९९० साली तर संस्थांनचं विलिनीकरण करून देशाला शतखंडीत  होण्यापासून वाचवणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल यांना १९९१ साली राजीव गांधींबरोबर भारत रत्न देण्यात आलं. तर त्या आधी  नेहरूंना १९५५ साली आणि इंदीरा गांधींना  १९७१ साली ते दोन्ही स्वत: पंतप्रधान पदावर असतानाच भारत रत्न देण्यात आलं.


या पैकी कुणालाच ते दिलं नसतं तर त्यांच वैयक्तीकरित्या काहीच बिघडणार नव्हतं, पण देशाभिमान जागृतकरणारी ही व्यक्तीमत्व गौरवली गेली म्हणजे भावी पिढीला प्रेरणा मिळते आणि समाजात सकारात्मक भावना वाढीला लागण्याला मदत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक असं व्यक्तीमत्व की ज्यांनी देशाचं स्वातंत्र्य, सामाजिक स्थान, परराष्ट्र धोरण यांच्याबाबतीत जाज्वल्य इतिहास निर्माण केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीत ब्रिटीशांच्या नजरकैदेतून सुटून बंगालमधून अफग़ाणमार्गे ते विदेशात जातात काय आणि जर्मनी, जपान सारख्या देशांच्या मदतीने भारताच्या स्वतंत्र्याचा विडा उचलतात काय, सगळंच अद्भूत. आझाद हिंद सेनेचं नुसतं नाव घेतलं तरी आजही अंगावर रोमांच उभे राहातात. अशा नेताजींना एक भावांजली म्हणून भारत रत्न खरंतर सगळ्यात पहिल्यांदा द्यायला हवं होतं. पण... संपुर्ण देशातच नेहरूमार्गाने जाणार्‍या राजकर्त्यांना (देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात नेहरू मार्ग आहेत, अगदी सांताकृझ आणि विलेपार्ल्यात गेलं तरी नेहरू रोड असतोच असतो.)   त्याचं सोयर-सुतक नव्हतं. आपल्या बगलबच्यांना गल्लीबोळरत्न वाटत फिरताना या लोकांनी भारतरत्नाचंही महत्व कमी केलं. जे बसू नये असे अनेक या पंगतीत आधी बसले.......! (वानगीदाखल: फिल्म स्टार एम.जी.रामचंद्रन ) असो.

पं. मदन मोहन मालविय हे भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस चे अध्यक्ष, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक आणि हिंदुस्थात टाइम्स चे कार्याध्यक्ष होते, हा आणि एवढाच उल्लेख त्यांची महती सांगून जातो. 

पं. मदन मोहन मालविय हे भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्ष, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक आणि हिंदुस्थात टाइम्स चे कार्याध्यक्ष होते, हा आणि एवढाच उल्लेख त्यांची महती सांगून जातो. 

नवं मोदी सरकार नेताजींना आणि पं. मदन मोहन मालविय  भारतरत्न देणार असं ऎकल्यापासून खरंच “अच्छे दिन” आलेत म्हणायला हरकत नाही.  हे दोघी महनिय स्वातंत्र्यपुर्व काळात कॉग्रेसचे अध्यक्ष होते हे विशेष. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना भारत रत्न देण्यात येईल तो सुदिन, मी त्याची वाट पहातोय. 

20 May, 2014

पेला संपुर्ण भरला आहेया देशात ‘राजकारण’ ही एक शीवी झाली होती. राजकारणी लोकांपासून चार हात दूर राहिलेलं बरं असंच सर्व सामान्य लोकांचं मत होतं. पण ‘अच्छे दिन आने वाले है।’  आणि ‘सबका साथ, सबका विकास’ अशा दोन घोषणा देवून नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूकांचा प्रचार सुरू केला आणि जसजसे निकालाचे दिवस जवळ येवू लागले तसतसे ते चांगले दिवस नक्की येतील असा विश्वास वाटायला लागला. निवडणूका संपल्या आणि प्रचारही संपला. निकालाचा दिवस आला. भारतीय जनाता पक्षाला संपुर्ण बहूमत मिळालं आणि गेल्या कित्येक दिवसात खर्‍या आनंदाचा दिवस साजरा केला. त्या दिवसा पासून मोदींनी केलीली भाषणं ही प्रचारकी भाषणं नव्हती, तर ती एका जबाबदार नेत्याची भाषणं होती. आता त्यांच्यासाठी सगळे भारतीय समान आहेत आणि सव्वा करोड जनतेचे ते नेते आहेत.


आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉल मध्ये झालेलं नरेंद्र मोदींच भाषण म्हणजे जनतेला विश्वास वाटावा आश्वस्थ व्हावं असं वक्तव्य होतं. ज्या संसद भवनात आजपर्यंत केवळ कुस्त्या, सभात्याग आणि गोंधळच पाहिला त्या ठिकाणी आज मंदीराचं पावित्र्य पहायला मिळालं. संसद भवनात प्रवेष करायच्या आधी नरेंद्र मोदींनी अक्षरश: गुडघे टेकून संसद भवनाच्या पावित्र मंदीराला नमस्कार केला आणि सत्तेच्या उन्मादात भाषण न ठोकता अटल बिहारी वाजपेईंची आठवण काढून ते सद्गदीत झाले. ते अश्रू येवढे किमती होते की सेंट्रल हॉल मधल्या अनेक मान्यवरांचे डोळे पाणावले त्यात वरूण गांधी सारखे तरूण तर होतेच पण लालकृष्ण आडवानी आणि रवीशंकर प्रसाद सारखे जेष्ठही होते. मुद्देसूद, समर्पक, अप्रतिम असं ते भाषण होतं. 

तो भावूक क्षण सरताच नरेंद्र मोदींनी देशासाठी कण कण आणि क्षण क्षण अर्पण करण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले “मला निराशेने कधीच ग्रासलं नाही”  समोरचं पाण्याने अर्ध भरलेलं ग्लास उचलून ते म्हणाले “मला विचाराल तर हे ग्लास  अर्धं भरलेलं नाही की अर्धं रिकामं नाही, तर हे ग्लास अर्धं पाण्याने आणि अर्धं हवेने पण भरलेलच आहे” मित्रहो गेल्या बारा वर्षात याच सकारात्मकतेने त्याना पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत आणलं आहे. Motivation साठी आता देशाच्या तरूण पिढीला दुसर्‍या कुठल्या गुरूकडे किंवा क्लासमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आता रोजच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे सकारात्मकतेचं मुर्तीमंत उदाहरण दुरदर्शनच्या वाहीन्यांवर पाहाता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला एक सशक्त तगडा नेता लाभला आहे. गंगा शुद्धीकरणाबरोबरच भ्रष्टाचाराची गटारगंगाही आता साफ होईल. खरच अच्छे दिन आ रहे है। पेला संपुर्ण भरला आहे.

                       

11 May, 2014

तुझी सयतू कळलीस मला
मी आई होताना
तू रुजलीस माझ्यात
मी आई होताना

तू रुळलीस माझ्यात
मी आई होताना
तूच खेळलीस माझ्यात
मी आई होताना
  
माझं आई होणं होतं
तूझचं पुढलं रुप
पण मी अजून नाही ग झाले
तीर्थस्वरूप

आई असते सुखाची सावली
आई असते खरच माऊली
जरा का कधी ठेच लागली
आई ग... हीच परवली

कृपाळू आहे माझी माय
गाईच्या गोड दुधावरची साय
तुझ्यावाचून मन रमत नाय
खरंच अगदी करमत नाय

माझं लेकरू मला बिलगतं
माझं मन तुझ्यात गुंततं
तुझी सय, माझा हात
प्रेमभरला त्याच्या केसात

   

06 May, 2014

कावळ्याचं घर आहे शेणाचं


खिडकी बाहेरच्या झाडावर काल कावळा घरटं बांधत होता. आजूबाजूच्या काटक्या जमा करून त्याचं ते काम चाललं होतं. उंच अगदी झाडाच्या टंशीवर त्याने घर बांधायला घेतलं होतं. म्हटलं यंदा पाऊस लवकर येणार आणि भरपूरही पडणार. पक्षांनी उंचावर घर बांधलं की पाऊस भरपूर, मध्यावर बांधलं की मध्यम आणि खाली बांधलं तर कमी पाऊस पडणार असं म्हटलं जातं. पक्षांना हवामानाचा अंदाज येतो, पावसाच्या आगमनाची वेळ कळते असं म्हणतात. ते खरंही असलं पाहिजे नाही तर त्याना जगणं मुश्किल होईल. (तसं ते आज झालंही आहे. सोसायटीने आजच झाडांची छाटणी केली आणि कालपर्यंत पक्षांनी सुरक्षीत ठरवलेली जागा उजाड करून टाकली.)

भारतीय शेती ही मांसूनवर अवलंबून असते आणि आपला शेतकरी त्या मान्सूनचा अंदाज निसर्गात होणार्‍या बदलांवरून पुर्वांपार करीत आला आहे. हल्ली सरकारी खाती शेतकर्‍यांना मदत केल्याचा आभास निर्माण करतात आणि त्याला आणखी खोलात ढकलण्याचं कर्म करतात. राजकारणाचा धंदा झाल्यापासून तर सरकारी (अधिकारी)  कोण आणि सरकार (राजकारणी) कोण हेच कळेनासं झालं आहे. भारतीय हवामान खातं दरवर्षी हवामानाचा अंदाज वर्तवतं. या वर्षीही त्यानी तो वर्तवला आहे आणि यंदा कमी पाऊस पडेत असं भाकीत ऎकण्यात आलं. त्यांचं ते भाकीत दरवर्षी खोटं ठरतं तसं यंदाही ठरो. हवामान खात्याच्या कावळ्यांच शेणाचं घर या वर्षीच्या पावसात आणि सोळा तारीखला लागणार्‍या निकालात वाहून जावो.   

मित्रहो ते भाकीत खोटंच आहे आणि यंदा कमी पाऊस पडेत असं त्यानी मुद्दाम ठसून सांगितलं आहे कारण त्या अंदाजाच्या आड राहून त्यांना भ्रष्टाचार करता यॆणार आहे किंवा त्या भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी त्यानी तयार केली आहे. अवर्षण, महापूर या सारखी संकटं म्हणजे चंगळ अस समिकरण हल्ली सरकारी पातळीवर रुढ झालेलं आहे. पण अशी संकटं येवो अथवा न येवो आपली झोळी भरली गेली पाहिजे म्हणून नेपथ्य करायचं आणि मग ठरवलेलं नाटक वठवायचं हा शिरस्ता झाला आहे. पाऊस कमी पडला तर मग कृत्रीम पाऊस पाडता येईल, तो पाडण्यासाठी विमान खरेदी करावं लागेल, विमान खरेदी करायच म्हणजे मग त्याचा उपयोग करून पाऊस पडला काय न पडला काय, पण आपले हात तर ओले होतील, असा आपल्या फायद्याचा कुटील विचार करून पाऊस पडणारच नाही असं कारस्थान कागदोपत्री केलं गेलं आहे. हे करताना मग त्याचा परीणाम म्हणून  दुष्काळ पडणार सांगितले तर शेअर बाजार कोसळेल, परकीय गुंतवणूक कमी होईल, शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँका डबघाईला येतील, खते, बी-बियाणे, फवारणीची औषधे, शेतीची अवजारे आदी उद्योगधंदे बंद पडतील, साठेबाजीने महागाई वाढेल, शेतकरी आत्महत्या करतील अशी कारणे देत दरवर्षी, 'सरासरी पाऊस चांगलाच होईल' असे सांगितले गेले. गेल्या पासष्ट वर्र्षांच्या इतिहासात हवामान खात्याने केवळ दोनदाच दुष्काळाची माहिती दिली आणि त्या दोन्ही वेळा दुष्काळ पडला नाही.

मात्र या वेळी हवामान विभागाच्या 'लक्षवेधी' अंदाजांबद्दल शंका येणे रास्त आहे. या वेळी आवर्जून दुष्काळाची भीती निर्माण केली जात आहे. मान्सून सरासरीपेक्षा कमी होणार असल्याच्या भाकितामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, या चिंतेने गुंतवणूकदार शेअर विक्री करू लागले आहेत. यात एफएमसीजी कंपन्यांची जास्त विक्री ग्रामीण भागांत असल्यामुळे पावसाचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊन त्यांच्या शेअरना लगेच फटका बसला आहे. गारपिटीने आधीच खचलेल्या शेतकऱ्यांना तर धडकी भरविणारा हा अंदाज आहे. असे इतर तोटे झाले आणि शेतकर्‍या बरोबरच देश खड्ड्यात गेला तरी चालेल. सरकारी बाबूंच्या कृत्याचा पर्दाफाश करणारा लेख आजच्या लोकसत्तात आला आहे तो खाली देत आहे जरूर वाचा:    

किरणकुमार जोहरे
Published: Tuesday, May 6, 2014

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजांवर सरसकट शंका घेणे रास्त मानले जात नाही, तरीही तसे करणारा हा युक्तिवाद.. यंदा मान्सून उत्तमच होणार, अशी चिन्हे मांडणारा आणि हवामान खात्याने दूरचे निकष वापरण्याऐवजी स्थानिक स्थितीकडे का पाहिले नसावे, असा प्रश्न विचारणारा..

अर्थशास्त्राचे कोणतेही पुस्तक हेच सांगते की, भारतीय शेती हा फार मोठा जुगार आहे. शेतकरी जिंकण्याच्या आशेवर जुगार खेळतो. जुगाराच्या पटावर एका वेळी शंभर कौरवांनी खेळावे अशी व्यवस्था नसते; तरी शेतकऱ्याचा जणू प्रतिपक्ष बनलेले व्यापारी, दलाल, कर्ज देणाऱ्या बँका, सावकार आदी मंडळी कौरवांप्रमाणे नेहमी फायदाच पाहतात. व्यापाऱ्यांनी व्यापार न करता दानशूर कर्ण बनावे अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल खरे, परंतु नफा कमावताना शोषण होणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी करणे यातही काही गर आहे का? द्रौपदीला दावावर लावावे त्याप्रमाणे शेतकरी आयुष्याचे सर्वस्व पणाला लावत असतो.. अशा वेळी हवामान खात्याची भूमिका 'चाणाक्ष शकुनीमामा'प्रमाणे असते.. कशी, ते पुढे पाहू.

पाचवी 'साऊथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरम' ('सॅसकॉफ') परिषद पुण्यात झाली. आतापर्यंत सॅसकॉफचे अंदाज नेहमीच चुकले आहेत. परिषदेत भारताने मनाचा मोठेपणा दाखवत स्वत:कडे सरासरीपेक्षा कमी मान्सून ठेवून घेत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश व म्यानमार असा इतरत्र सरासरी मान्सून वाटून दिला. शेतकऱ्यांना घाबरविण्यासाठी हिरवा-पिवळा आलेखाचे प्रसारमाध्यमांना वाटपदेखील झाले. नर्ऋत्येकडून ईशान्येकडे सरकताना कमी असलेला मान्सून अचानक उडी मारत, वायव्य आणि उत्तर ईशान्येला वाढून सरासरी कसा बनतो याचे 'विज्ञान' मात्र अनाकलनीय आहे. आगमनाची तारीख माहिती नाही तरी मान्सूनचे स्वरूप सांगून हवामान विभाग मोकळे झाले.
अधिकृत अंदाजांचे 'गौडबंगाल'

गेल्या ५२ वर्षांपासून 'हवामान संशोधन केंद्र' म्हणजेच 'इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजी' (आयआयटीएम) हवामान खात्याच्या उद्धारासाठी व अचूक मान्सूनच्या माहितीसाठी कटिबद्ध आहे. आयआयटीएम व अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन (ईएसएसओ)ने भारतात वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानंतर आपल्या हवामान खात्याने (आयएमडी) एक टक्का आणखी घटवत ९५ टक्केच पाऊस होईल अंदाज जाहीर केला. जूनपासून किमान दोनदा बदलाच्या अटी लागू करीत मान्सून अंदाजात फेरफार करण्याचे हक्कही स्वत:कडे राखून ठेवले. सांख्यिकीय मॉडेलने आकडेमोड करीत दिले गेलेले हे अधिकृत अंदाज होय.

डिसेंबर-जानेवारीतील उत्तर अटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानातील फरक, फेब्रुवारी-मार्चमधील विषुववृत्तीय दक्षिण हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान, फेब्रुवारी-मार्चमधील पूर्व आशियातील समुद्रसपाटीवरील दाब, जानेवारीचे वायव्य युरोपचे जमिनीलगतचे तापमान आणि फेब्रुवारी-मार्चमधील विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील उबदार पाण्याचे तापमान या पाच घटकांचा वापर करीत हा अंदाज दिला गेला. हेच पाच घटक का निवडले, कन्याकुमारीचे सोडून युरोपच्या जमिनीलगतच्या तापमानाचा भारताशी संबंध किती, तसेच हिमालय व सहय़ाद्री पर्वतरांगांवरील तापमान, वारे, दाब असे भारतीय घटक का आवश्यक वाटले नाहीत..? हे आणि असे प्रश्न 'सर्वज्ञ' हवामान खात्याला कोणीही विचारायचे नाहीत, हा अलिखित नियम आहे.
'फिक्सिंग'चा 'गेम'?

खेळ सुरू होण्याआधीच प्रतिपक्षाने नांगी टाकली की 'बाय' मिळाल्याने न खेळताही दुसरा संघ विजेता ठरतो. खो-खोसारख्या खेळात याला मान्यता आहे. याला 'मॅच फििक्सग' असे कुणी म्हटले तर, यंदा हवामान संशोधन केंद्र आणि हवामान खाते यांनी 'मान्सून फििक्सग'चा 'गेम' केला आहे असेच मानावे लागेल. कारण पाच टक्क्यांपर्यंत त्रुटी असलेले हे अंदाज ९० टक्क्यांपासून १०१ टक्क्यांपर्यंत पावसाच्या सर्व शक्यता देतात. म्हणजे पाऊस कमी होवो, सरासरी (चार महिन्यांत ८७० मिलिमीटर) होवो किंवा नॉर्मलपेक्षा जास्त होवो, आकडेमोडीमुळे हवामान विभागापुढे मान्सूनला नांगी टाकावीच लागेल.

भारतासारखा मान्सून नाही, तरी भारतीय मान्सून अंदाज कसे वर्तवावे याचे धडे भारतीय 'अनुभवी' शास्त्रज्ञांना, अमेरिका व कॅनडा देत आहेत ही मोठी 'आंतरराष्ट्रीय गंमत' आहे. 'अमेरिकन एक्सपरिमेंटल क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर'च्या शास्त्रज्ञांनी १जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी ८८ टक्केपावसाचा निष्कर्ष काढला. त्यासाठी एप्रिलचे केवळ पहिले दहा दिवस निवडले. एकपासून तीसपर्यंत असे वेगवेगळे कमी-अधिक दिवस निवडून कितीही वेगवेगळे मान्सून-निष्कर्ष मिळवता येतील. म्हणजे पाऊस कसाही पडला तरी हवामान खात्याचे अंदाज किती अचूक आणि खात्रीने सुधारले हे पटवून देता येईल हे 'गौडबंगाल'देखील समजून घ्यायला हवे.
या वेळी 'एल निनो'च्या भीतीचा बागुलबुवा उभा केला गेला आहे. पेरू या देशाजवळ, प्रशांत महासागरात पूर्वेला पाण्याचा प्रवाह जास्त गरम झाला की बाष्पीभवन जास्त होऊन पाऊस आधीच समुद्रात कोसळून जातो व मान्सून खराब होऊ शकतो असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे निम्म्या वेळा काहीही प्रभाव न दाखविणारा एल निनो (ख्रिस्ताचा मुलगा असे मच्छीमारांनी दिलेले नाव) प्रवाह १९९७ मध्ये सर्वात उष्ण असतानादेखील भारतातील मान्सूनवर काहीच फरक पडला नव्हता.

कृत्रिम पावसासाठी फासे?
दुष्काळ पडणार सांगितले तर शेअर बाजार कोसळेल, परकीय गुंतवणूक कमी होईल, शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँका डबघाईला येतील, खते, बी-बियाणे, फवारणीची औषधे, शेतीची अवजारे आदी उद्योगधंदे बंद पडतील, साठेबाजीने महागाई वाढेल, शेतकरी आत्महत्या करतील अशी कारणे देत दरवर्षी, 'सरासरी पाऊस चांगलाच होईल' असे सांगितले गेले. गेल्या पासष्ट वर्र्षांच्या इतिहासात हवामान खात्याने केवळ दोनदाच दुष्काळाची माहिती दिली आणि त्या दोन्ही वेळा दुष्काळ पडला नाही.
मात्र या वेळी हवामान विभागाच्या 'लक्षवेधी' अंदाजांबद्दल शंका येणे रास्त आहे. या वेळी आवर्जून दुष्काळाची भीती निर्माण केली जात आहे. मान्सून सरासरीपेक्षा कमी होणार असल्याच्या भाकितामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, या चिंतेने गुंतवणूकदार शेअर विक्री करू लागले आहेत. यात एफएमसीजी कंपन्यांची जास्त विक्री ग्रामीण भागांत असल्यामुळे पावसाचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊन त्यांच्या शेअरना लगेच फटका बसला आहे. गारपिटीने आधीच खचलेल्या शेतकऱ्यांना तर धडकी भरविणारा हा अंदाज आहे.
नेमक्या अशा वेळी, दुसरीकडे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या नावाखाली अब्जावधी रुपयांच्या विमानांकरिता अमेरिकेशी करार करण्यासाठी हवामान संशोधन संस्थेचा अट्टहास सुरू आहे. एक तर, जमिनीवरून अग्निबाणांच्या मदतीने रसायनांचा ढगात मारा करीत पाऊस वाढवायचे व कमी करण्याचे तंत्र रशिया व चीन वापरते आहे; तेव्हा आपण मात्र विमानांकडेच पाहात आहोत. परंतु मुद्दा असा की या विमानखरेदीच्या तुलनेत, समुद्राचे खारे पाणी बाष्पीभवन करीत गोडे करण्यासाठी येणारा खर्च अत्यल्प आहे. त्याच्या काही पटींनी अधिक खर्च करीत कृत्रिम पावसाचा मुंबईकरांसह एकंदर देशावर होणारा 'प्रयोग' खरोखर महाग म्हणायला हवा. विमानाने ढगात जाऊन रसायनांचा फवारा अपघात व अपयश या दोन्हीमुळे घातक आहे. अशा वेळी सरकारने, केवळ 'पांढऱ्या हत्ती'ला चाऱ्याची सोय होईल. त्यामुळे असे निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे.
आकडेमोडीने भीती निर्माण करीत मान्सूनलाच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक सरकारलाही हवामान खाते आपल्या तालावर नाचवू पाहात आहे. शेतकऱ्यांचे 'मसिहा' बनत हवामान खात्याला विविध प्रोजेक्ट्सच्या नावाखाली अब्जावधी रुपये जनतेच्या खिशातून यापुढेही ओढता येतील. त्यामुळे नवीन आलेल्या सरकारला हवामान खात्याची 'हवा-ए-अंदाज' सुधारण्यांकडे पाहावे लागेल. राजकीय समीकरणे बदलत असताना हवामान खात्याची भाकिते वैज्ञानिक आधारावर किती आणि राजकीय डावपेचाचा भाग किती याबाबतही नक्कीच 'संशोधना'स वाव आहे.
गारपीट, विजांची वादळे, पक्ष्यांचे स्थलांतर, पक्ष्यांची घरटी बांधण्यासाठीची धावपळ आदी अनेक घटक महाराष्ट्रात मान्सून लवकर व पुरेपूर बरसण्याचे संकेत देत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याआधी हवामान खात्याची 'हवा' तपासून घ्यायची गरज आहे. 'चीत भी मेरी, पट भी मेरा' असे म्हणत देशभरातील शेतकऱ्यांना नाचविणाऱ्या तरी 'मैं सबसे बडा खिलाडी' अशा आविर्भावात वावरणाऱ्या हवामान खात्यालाही चाप हवा.   
लेखक भौतिकशास्त्र व मान्सूनचे अभ्यासक असून लेखात व्यक्त झालेली मते वैयक्तिक आहेत.

त्यांचा ई-मेल  kkjohare@hotmail.com                                          

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates