
आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉल मध्ये झालेलं नरेंद्र मोदींच भाषण म्हणजे जनतेला विश्वास वाटावा आश्वस्थ व्हावं असं वक्तव्य होतं. ज्या संसद
भवनात आजपर्यंत केवळ कुस्त्या, सभात्याग आणि गोंधळच पाहिला त्या ठिकाणी आज
मंदीराचं पावित्र्य पहायला मिळालं. संसद भवनात प्रवेष करायच्या आधी नरेंद्र
मोदींनी अक्षरश: गुडघे टेकून संसद भवनाच्या पावित्र मंदीराला नमस्कार केला आणि
सत्तेच्या उन्मादात भाषण न ठोकता अटल बिहारी वाजपेईंची आठवण काढून ते सद्गदीत
झाले. ते अश्रू येवढे किमती होते की सेंट्रल हॉल मधल्या अनेक मान्यवरांचे डोळे
पाणावले त्यात वरूण गांधी सारखे तरूण तर होतेच पण लालकृष्ण आडवानी आणि रवीशंकर
प्रसाद सारखे जेष्ठही होते. मुद्देसूद, समर्पक, अप्रतिम असं ते भाषण होतं.
तो भावूक क्षण सरताच नरेंद्र मोदींनी देशासाठी कण कण आणि
क्षण क्षण अर्पण करण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले “मला निराशेने कधीच ग्रासलं
नाही” समोरचं पाण्याने अर्ध भरलेलं ग्लास
उचलून ते म्हणाले “मला विचाराल तर हे ग्लास अर्धं भरलेलं नाही की अर्धं रिकामं नाही, तर हे
ग्लास अर्धं पाण्याने आणि अर्धं हवेने पण भरलेलच आहे” मित्रहो गेल्या बारा वर्षात
याच सकारात्मकतेने त्याना पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत आणलं आहे. Motivation साठी आता देशाच्या तरूण
पिढीला दुसर्या कुठल्या गुरूकडे किंवा क्लासमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आता
रोजच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे सकारात्मकतेचं मुर्तीमंत उदाहरण दुरदर्शनच्या
वाहीन्यांवर पाहाता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला एक सशक्त तगडा
नेता लाभला आहे. गंगा शुद्धीकरणाबरोबरच भ्रष्टाचाराची गटारगंगाही आता साफ होईल. खरच
अच्छे दिन आ रहे है। पेला संपुर्ण भरला आहे.
No comments:
Post a Comment