तू कळलीस मला
मी आई होताना
तू रुजलीस माझ्यात
मी आई होताना
मी आई होताना
तूच खेळलीस माझ्यात
मी आई होताना
माझं आई होणं होतं
तूझचं पुढलं रुप
पण मी अजून नाही ग झाले
तीर्थस्वरूप
आई असते सुखाची सावली
आई असते खरच माऊली
जरा का कधी ठेच लागली
आई ग... हीच परवली
कृपाळू आहे माझी माय
गाईच्या गोड दुधावरची साय
तुझ्यावाचून मन रमत नाय
खरंच अगदी करमत नाय
माझं लेकरू मला बिलगतं
माझं मन तुझ्यात गुंततं
तुझी सय, माझा हात
प्रेमभरला त्याच्या केसात
सुंदर. खरच छान कविता आहे.
ReplyDelete