देशाचा गौरव आणि अखंडत्व यासाठी असामान्य कामगीरी बजावणार्या
व्यक्तींना भारत रत्न दिले पाहीजे याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण
नाही. देशाचं आंतरीक आणि बाह्य शत्रूंपासून देशाचं संरक्षण करणार्या अनेक महनीय
व्यक्तींना एकतर खुप उशीरा किंवा अजून भारत रत्न दिलं गेलं नाही. ज्या घटनेने
भारताला एका धाग्यात बांधून ठेवलं आहे त्या भार्तीय राज्यघटनेसाठी आपार कष्ट
करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९९० साली तर संस्थांनचं विलिनीकरण करून देशाला
शतखंडीत होण्यापासून वाचवणार्या सरदार वल्लभभाई
पटेल यांना १९९१ साली राजीव गांधींबरोबर भारत रत्न देण्यात आलं. तर त्या आधी नेहरूंना १९५५ साली आणि इंदीरा गांधींना १९७१ साली ते दोन्ही स्वत: पंतप्रधान पदावर
असतानाच भारत रत्न देण्यात आलं.
या पैकी कुणालाच ते दिलं नसतं तर त्यांच वैयक्तीकरित्या
काहीच बिघडणार नव्हतं, पण देशाभिमान जागृतकरणारी ही व्यक्तीमत्व गौरवली गेली
म्हणजे भावी पिढीला प्रेरणा मिळते आणि समाजात सकारात्मक भावना वाढीला लागण्याला
मदत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक असं व्यक्तीमत्व की ज्यांनी देशाचं स्वातंत्र्य,
सामाजिक स्थान, परराष्ट्र धोरण यांच्याबाबतीत जाज्वल्य इतिहास निर्माण केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीत ब्रिटीशांच्या नजरकैदेतून सुटून बंगालमधून अफग़ाणमार्गे
ते विदेशात जातात काय आणि जर्मनी, जपान सारख्या देशांच्या मदतीने भारताच्या
स्वतंत्र्याचा विडा उचलतात काय, सगळंच अद्भूत. आझाद हिंद सेनेचं नुसतं नाव घेतलं तरी
आजही अंगावर रोमांच उभे राहातात. अशा नेताजींना एक भावांजली म्हणून भारत रत्न खरंतर
सगळ्यात पहिल्यांदा द्यायला हवं होतं. पण... संपुर्ण देशातच नेहरूमार्गाने जाणार्या
राजकर्त्यांना (देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात नेहरू मार्ग आहेत, अगदी
सांताकृझ आणि विलेपार्ल्यात गेलं तरी नेहरू रोड असतोच असतो.) त्याचं
सोयर-सुतक नव्हतं. आपल्या बगलबच्यांना गल्लीबोळरत्न वाटत फिरताना या लोकांनी
भारतरत्नाचंही महत्व कमी केलं. जे बसू नये असे अनेक या पंगतीत आधी बसले.......! (वानगीदाखल: फिल्म स्टार एम.जी.रामचंद्रन ) असो.
पं. मदन मोहन मालविय हे भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस चे अध्यक्ष, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक आणि हिंदुस्थात टाइम्स चे
कार्याध्यक्ष होते, हा आणि एवढाच उल्लेख त्यांची महती सांगून जातो.
पं. मदन मोहन मालविय हे भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्ष,
बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक आणि हिंदुस्थात टाइम्स चे कार्याध्यक्ष होते,
हा आणि एवढाच उल्लेख त्यांची महती सांगून जातो.
No comments:
Post a Comment