07 May, 2010

अखेर ताडोबाला ‘बफर झोन’ लाभले


महाराष्ट्रातील वन क्षेत्र आक्रसत चालले आहे. वन मंत्री हे वनांचे संरक्षक न होता भक्षक होत आहेत. महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांच्या पहिल्याच जाहिर सभेला मी उपस्थित होतो. त्यानी या खात्याचा कारभार नाराजीनेच स्विकारल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होतो. कोकण असो नाहीतर विदर्भातील ताडोबा जंगल, संबंधीत राजकारण्यांना ती आपली बापजाद्याची मिळकत वाटत असावी. कोकणात जसे मायनींगचे प्रकल्प येत आहेत तसाच आघात ताडोबावर घालण्याची तयारी महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी चालवली होती. मंध्यंतरी केंद्रीय वन मंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्राचे वन मंत्री पतंगराव कदम यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. वन खात्याच्या कारभारावर नाराजी प्रकट केली होती. ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात अदानीच्या  कोळसाखाणींना परवानगी द्यावी म्हणून आपले राजकारणी देव पाण्यात घालून बसले होते. पण केंद्रीय वन खात्याने हा प्रस्ताव हाणून पाडला.

गेल्या २६ जानेवारीला केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ताडोबाची पाहणी केल्यानंतर राज्य शासनाने तातडीने बफर झोनची अधिसूचना काढावी असे निर्देश दिले होते. यानंतरही राज्य शासन यासंबंधीची अधिसूचना काढण्यास विलंब लावत आहे, हे लक्षात आल्यानंतर गेल्या आठवडय़ात खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना एक पत्र लिहून तातडीने अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मात्र तातडीने हालचाली होवून अखेर शासनाने अधिसूचना काढली. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये या बफर झोनची निर्मिती होणार असून यात यापुढे कोणत्याही प्रकारच्या खाणींना परवानगी देण्याचा मार्ग बंद होणार आहे ही वन्यप्रेमीना दिलासा देणारी बातमी आहे.

यंदा विक्रमी लाख ३७ हजार पर्यटकांनी ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला भेट दिली असून तब्बल पाच कोटींची उलाढाल झाली आहे. विविध शुल्काच्या माध्यमातून शासनालाही ४० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे या वरून या प्रकल्पाची लोकप्रियता लक्षात यावी.            

9 comments:

  1. अप्रतीम फोटो.

    ReplyDelete
  2. खरे तर हे आधीच व्हायला हवे होते. ताडोबा उद्यान गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिध्द आहेच. लोक आवर्जून भेट देतात. यंदाचा विक्रमी आकडा त्याची सत्यता दर्शवतोच आहे. उशीरा का होईना झाले हे महत्वाचे.

    ReplyDelete
  3. भानस, चार वर्षांपूर्वी मी ताडोबाला गेलो होतो. तेव्हा पासून ताडोबाच्या प्रेमात पडलो. खुप छान जंगल आहे. वर दिलेल्या फोटोंवरून अकल्पना येईल.

    ReplyDelete
  4. खरचं आनंदाची बातमी आहे. जगातील वाघ-संख्या घटत असताना अगदी केंद्र सरकारने एका अदानी सारख्या मोठ्या उद्योगसमूहाविरुद्ध कडक भूमीका घेऊन उशीरा का होईना योग्य ती दखल घेतली आहे. बातमी तत्परतेने प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  5. क्रिष्णकाथ, आपण म्हणता ते अगदी बरोबर, हे केंद्राने केलं म्हणून अन्यथा अदानी ग्रुपने अडाणीपणा केला हेच आपल्याला पहावं लागलं असतं.

    ReplyDelete
  6. maharastrachya nashibi haran party karnaare karma daridri mantri aslyavar dusare kai apekshit aahe?

    ReplyDelete
  7. maharastrachya nashibee haranachi shikar karun sarkari rest house madhe party karnaare congress che mantri, va tyanchyavar karvai na karnaare CM
    yanchya kadun kai apeksha thevnar?

    ReplyDelete
  8. विजय, आपण म्हणता ते बरोबरच आहे. केंद्रीय मंत्री जयराम रमेश अडून बसले म्हणून एवढं तरी झालं.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates