चेतन गौरीशंकर जानी, माझा जीवाभावाचा मित्र, काल परवापर्यंत हसत खेळत आमच्यात वावरणारा, काल अचानक आम्हाला सोडून गेला. चार दिवसाचा ताप हे तात्कालीक कारण पण आत होणारा त्रास ना त्याने कुटुंबियांना सांगितला ना मित्रांना.काम हाच त्याचा आराम होता. आजारी असताना सुद्धा तो काम करत राहिला. कंपनीसाठी, कुटुंबासाठी, त्याचं मात्र जगणं राहून गेलं, पान्नासीचं वय हे काय जगाचा निरोप घेण्याचं असतं? बरं चांगलीच माणसं अशी जातात. लोकांना मदत करण्यात चेतन कायम आघाडीवर असायचा. कुणाच निधन झालं तर प्रसंगी रजा काढूनही तो अंत्यविधीसाठी हजर रहायचा, सामान जमवण्यापासून सगळं करायचा. लोकांना खांदे देता देता स्वात:च कधी खांद्यावर आला समजलच नाही. मन मानायला तयार नाही पण उद्या कांगाला गेलो की चेतन जानीची खुर्ची खाली असणार. कंपनीचा ताळेबंद नीट करता करता स्वतःच्या जीवनाची खेळी मात्र तो अर्ध्यावर टाकून गेला. त्याच्या खर्चाची बाजू अपूर्ण राहीली. चेतन गेला आणि एक चैतन्य काळाच्या पडद्याआड गेलं. अजून खुपशे डाव खेळायचे राहून गेले. परवाच ‘फ्रेंडशीप डे’ होऊन गेला. आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा फ्रेंडशीप डेच होता. असा मित्र मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती आता तो नाही हे माझं दुर्दैव. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
श्रध्दांजली.
ReplyDeleteअसे अनेक जवळचे मित्र-आत्पेष्ट कामाच्या ताणामुळे डोळ्यादेखत निघून जातात... तरीही, ’ पुढच्यास ठेच मागचा शहाणा ’ या न्यायानेही आपण शहाणे होत नाही यापरिस दुर्दैव ते काय...
भानस आपण म्हणता ते अगदी योग्य आहे. चेतन त्याच्या कंपनी साठीच खपला.
ReplyDelete