भारतीयांचा भारतीयांसाठी |
सध्या मी इपिक ब्राऊजर च्या प्रेमात पडलोय. हा मस्त इंटर्नेट ब्राऊजर भारतीयांसाठी भारतीयांनी बनवलेला आहे. सर्वकाही भरतीय असून हा ब्राऊजर मराठी, हिन्दी, गुजराथी, कन्नड़, तेलुगु, बंगाली, तामिळ, मल्याळम, उर्दू आणि पंजाबीसहीत बारा भारतीय भाषांना पुर्णपणे सपोर्ट करतो. त्यासाठी आवश्यक असलेला वर्ड प्रोसेसरही यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. बहुतांश शब्द आपण कसेही टाईप केले तरी ते बरोबर केले जातात आणि त्याला पर्याय उपलब्ध करून दिले जातात.
इंटरनेटवरून कुठलीही गोष्ट डाऊनलोड करताना भिती असते ती व्हायरसची, पण इपिक मध्ये antivirus scanner अंतर्भूत केलेला आहे. आपण काहीही डाऊनलोड केले तरी ते स्कॅन करूनच घेतले जाते.
बाऊजर च्या डाव्या बाजूला असलेलं पॅनल खुप उपयोगी आहे नव्हे ती एक जादूच आहे. सर्वात वर असलेल्या India वर क्लिक केल्यास भारतातल्या बहुतांश भाषा तसचं राज्यांच्या बातम्या घेऊन हा ब्राओझर हजर होतो. महाराष्ट्राच्या बाबतीत लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, प्रहार इत्यादी इ पेपर आपणास सहज पहाता येतात.
भारतीय वॉलपेपरचा खजिना, विंडोज एक्सप्लोरर, व्हिडीओ, कामचं लिस्ट, टायमर, फेसबूक, आर्कूट, ट्विटर सारख्या साईटस्, जिमेल, याहू मेल, गेम्स्, बुकमार्कस्, आणि अनेक गोष्टी या इपिक मध्ये आहेत. खरच खुप उपयोगी ब्राऊजर आहे. नक्की वापरून बघा. हा ब्राऊजर आपण इथून फुकट डाऊनलोड करू शकता. कराच..!
डाऊनलोड |
No comments:
Post a Comment