डोळ्यात आसवांची धग ही अजून ओली
अवचीत पावसाची सर ती सरून गेली
तो हुंदका कुणाचा दाबीत ओठ होता
आक्रोश वेदनांचा कानात येत होता
रंगात रंगलेला तो आसमंत गेला
चिखलात रंग सारा बेरंग होत गेला
मातीच माणसाची घटका भरून गेली
अन उब माऊलीची घटकेत दूर झाली
जो थांबला जरासा, त्याला नसे निवारा
करीती अजून दंगा, पाऊस, उन, वारा
नरेंद्र प्रभू
तुमच्या कवितेतील व्यथा जरी खरी असली तरी निसर्गाच्या पुढे कोणाचच काहीही चालत नाही हे वास्तव आहे. २००८ मध्ये कोशीच्या पूरामुळे बिहारी बांधव कसे हतबल झाले होते ते मी जवळून पाहीले आहे.
ReplyDeleteविजयजी, निसर्ग दयामाया दाखवत नाही हे खरेच.
ReplyDelete