कायदा सर्रास धाब्यावर बसवणार्यांचंच हे राज्य आहे काय असा प्रश्न हल्ली वारंवार पडतो. सामान्य माणूस कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असताना धनदांडगे, राजकारणी, बिल्डर, व्यापारी मात्र कायद्याचं सतत उल्लघन करताना दिसतात. मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपटांचे कमीत कमी ४४ खेळ लावले पाहिजेत असा कायदा आहे. त्यासाठी मल्टिप्लेक्सच्या मालकांना राज्य सरकारच्या करांतून कर सवलत मिळते. आजपर्यंत करोडो रुपयांची अशी कर सवलत घश्यात घालून हे मालक मोकळे झाले, पण ही सवलत घेताना किमान ४४ खेळांची अट हे मल्टिप्लेक्स मालक सोयीस्कररीत्या विसरले. कुणी हा कायदा त्यांच्या लक्षात आणून दिला तर त्याला ते भिक घालत नाहीत. मेहरबानी म्हणून मराठी चित्रपटांचे खेळ सकाळच्या वेळात आणि ते सुद्धा कामाच्या दिवसात लावले जातात. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करूनही त्यांना चित्रपटगृह मिळत नाही. चित्रपट कामगारांच्या संस्थेने वारंवार विनंती करूनही हे मुजोर मालक त्यांना दाद देत नाहीत. ज्या सरकारचा या मालकांवर वचक पाहिजे ते सरकार आणि कायद्याची अंम्मलबजावणी करणारे अधिकारी मालकांच्या ताटाखालची मांजरं बनली आहेत. अशा परिस्थितीत कायदा दाखऊन द्यायचं स्वातंत्र्य कुणी स्वातंत्र्यदिनाच्या पुर्व संधेला घेतलं तर ते चुक आहे काय? या मुजोरांना हीच भाषा कळते काय? सरकार आतातरी त्यांना वठणीवर आणणार काय? की पोलीस संरक्षणात हिंदी, गुजराती, तेलगू, मल्याळम चित्रपटांचे खेळ चालू ठेवून पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार?
मराठी माणसाने अस्मितेचा मुद्द उपस्थित केला की त्याला राष्ट्रीयत्वाचे धडे द्यायचे आणि तीच अस्मिता त्या चंद्राबाबूने दाखवली की त्याला कोंबडी वडे खिलवायचे? गिरण्यांच्या जमीनी बिल्डरांच्या घशात घालताना गिरणी कामगारांची देणीही थकवायची? बांद्र्याच्या सरकारी वसाहतीमधून सरकारी कर्मचार्यांना हाकलून ते श्रीखंड बिल्डरांसोबत वाटून खायचं? बांधकामांच्या ठिकाणी झालेल्या डासांच्या तावडीत मुंबईकरांना देवून मलेरीयाची जोपासना करायची? दिल्लीत कॉमनवेल्थ घोटाळा, मुंबईत जमीन घोटाळा, कायद्याचं राज्य मागणार्यांना ‘काय द्या’ आणि बोला म्हाणायचं, असच जर चालणार असेल तर या मुजोरांना वठणीवर कोण आणणार हा खरा प्रश्न आहे.
आमच्याच घरात आम्हाला बंदी..
ReplyDeleteज्या महाराष्ट्रात चित्रपट बनवायचे,तिथेच प्रदर्शित करून बक्कळ पैसेही कमवायचे पण त्या महाराष्ट्राचे मराठी चित्रपट नाही दाखवायचे..
ही वृत्ती ठेचलीच पाहिजे...आधीच काळ सोकावलेला आहे...अजून किती सहन करायचे.
आमच्याच घरात आम्हाला बंदी..
ReplyDeleteज्या महाराष्ट्रात चित्रपट बनवायचे,तिथेच प्रदर्शित करून बक्कळ पैसेही कमवायचे पण त्या महाराष्ट्राचे मराठी चित्रपट नाही दाखवायचे..
ही वृत्ती ठेचलीच पाहिजे...आधीच काळ सोकावलेला आहे...अजून किती सहन करायचे.
झंप्या, आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. आताच्या या काळात हे बोके सोकावले आहेत.
ReplyDeleteतुमचा राग शब्दाश्ब्दातून व्यक्त होतोय आणि तो रास्तही आहे. मराठी राज्यात मराठी चित्रपटानां, थियटर मिळ्त नाही आणि मिळालंच तेही अवेळी. यात बदल व्हायला हवाय, या बाबत कोणाचही दुमत असण्याच कारण नाही. पण या बरोबर, मल्टिप्लेक्समध्ये जाउन हिंदी अथवा इंग्रजी चित्रपट पहणा-या मराठी प्रेक्षकाची सरासरी किती आहे याचाही विचार पहायला पाहिजे. फक्त 'खळळ फटाक' हाच एकमेव तोड्गा आहे अशा भ्रमात राहणे म्हणजे निवळ् स्वत:ची फसवणुक करुण घेण्याचा प्रकार ठरेल. मराठीवर अन्याय होतोय म्हणुन उर बडवण्याचा सहाजोगपणा करायचा आणि आपल्या मुलांना मात्र इंग्रजी माध्यमाचा अट्टाहास करायचा. मराठी मानसातला हा दुटप्पीपणा जो पर्यंत जात नाही तो पर्यंत, मराठी भाषा, मराठी चित्रपट आणि मराठी मानसावर असे अन्याय कारक हल्ले होतच राहणार. समस्त मराठी प्रेक्षकांनी हिंदी तसेच इग्रजी चित्रपटांवर पुर्णपणे बाहिश्कार घातल्यावर, मल्टिप्लेक्सच्या मालकांचा माज उतरणार नाही अस तुम्हाला वाटत ? मराठी माणसानेच तर चित्रपट व्यवसायाची महुर्तमेढ रचली. मराठी प्रेक्षकांनीच हिंदी नट आणि नटयाना चंदेरी तारे, तारका केले. मुगले- ए - आजम, मदर इंडीया, शोले या हिंदी चित्रपटाचे रेकाँर्ड निर्माण करण्यात मराठी प्रेक्षकांचा सिंहाचावाटा नव्हता काय ? आणि राजकारणी या मल्टिप्लेक्सच्या मालकांच्या ताटाखालच मांजर झाले असतील, तर त्या मांजरांच्या पेकाटात लाथ घालायला नको काय ? हो पण तीही पध्दतशीर बर का ? नुसत 'खळ्ळ् फटाक' नव्हे.
ReplyDeleteविजयजी नमस्कार, प्रतीक्रीयेबद्दल धन्यवाद. प्रश्न कायदा पाळण्याचा आहे, त्याची अम्मलबजावणी करणारं सरकार झोपेचं सोंग घेणारा असेल तर त्याला पर्याय काय? हे मल्टिप्लेक्स चालक करात सवलत घेतात पण ज्या मराठी चित्रपटांसाठी अशी करसवलत दिली जाते ते चित्रपटच दाखवत नाहीत. सार्वत्रिक बहिष्कार घालायला आता तसा लढा देणारा वर्ग निदान मुंबईत तरी राहिलेला नाही. गिरणी कामगार होते तेव्हा लढे दिले जात होते. त्या लढ्यातला तारा(महाकवी नारायणा सुर्वे) काळाचा असतन्गत झाला. या मुजोरांना कोणती भाषा कळेल?
ReplyDelete