दसावाच्या कार्यक्रमात करुणा देव आणि बाळ कुडतरकर |
नव्वद वर्षाचा युवा आवाज असं ज्याला आजही म्हणता येईल तो आवाज म्हणजे आकाशवाणीचे सदाबहार कलावंत बाळ कुडतरकर यांचा आवाज. बाळ कुडतरकर, निलम प्रभू (आताच्या करूणा देव) आणि प्रभाकर जोशी यांच्या आवाजाचं गारूड सत्तर, ऎशी च्या दशकात सर्वानीच अनुभवलय. आकाशवाणीवरची नाटकं, श्रुतिका या अशा काही झोकात सादर होत की केवळ आवाजाच्या जादूवर सगळा प्रसंग डोळ्यासमेर तरळत असे. ‘पुन्हा प्रपंच’ सारखी श्रुतिका ऎकतना तर ते प्रसंग डोळ्यासमोर घडताहेत असा भास होत असे. त्या काळात ज्यांनी आकाशवाणी ऎकली असेल त्यांना शब्दांची आणि आवाजाची ताकद काय असते त्याचा प्रत्यय आलाच असेल. गेल्याच वर्षी दादर सार्वजनिक वाचनालयातर्फे झालेल्या एक कार्यक्रमात बाळ कुडतरांना ऎकायची संधी मला लाभली होती. ( वाचा: आकाशवाणीचे मुकुटमणी (भाग:१) आणि आकाशवाणीचे मुकुटमणी (भाग:२))
हे कलाकार सुद्धा सरकारी नोकरीतच होते. पण आपल्या कामावर असलेली त्यांची अधळ निष्ठा आणि झोकून काम करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी मिळालेल्या संधीचं सोन केलं. तो काळ आता खुप मागे गेला, बरीच वर्ष त्यांचा आवाज ऎकायला मिळाला नाही तरी मनाच्या एका सोनेरी कप्प्यातून त्याचे प्रतिध्वनी अजूनही ऎकू येतात. आज लोकसत्ता मध्ये बाळ कुडतरकरांवरचा करूणा देव यांचा एक लेख वाचला आणि या आठवणी जाग्या झाल्या. लोकसत्ताचा लेख आपण वाचा: आमचेही बाळासाहेब!
खर आहे प्रभू सर,
ReplyDeleteत्या काळात ‘पुन्हा प्रपंच’ या श्रुतिकेच प्रचंड वेड होत. निलम प्रभू तसेच बाळ कुडतरकर आणि प्रभाकर जोशी यांच्या आवाजाच्या जोरावर प्रसंग समोर उभा राहत असे. ‘पुन्हा प्रपंच’ या श्रुतिकेपायी मी अनेक वेळा कामावर उशिरा गेलो होतो.तेव्हा आमच्याकडे 'बुश' कंपणीचा ट्रँझिंस्टर होता. निलम प्रभू यांचा आवाज तर हिमलयातल्या नदीच्या खळखळाटा सारखा वाटायचा. त्याच्या आवाजाची जादू एव्हडी होती की, लग्नानंतर मी माझ्या पत्नीच नाव देखिल निलम असच ठेवल. शनिवारच्या लोकसत्ता मधील लेख निलम प्रभू अर्थात करुणा देव यांनी छानच लिहीला आहे.
विजयजी, 'पुन्हा प्रपंच' मधलं कुटूंब खरोखरीचं वाटायचं. वहिनींचं नाव त्या श्रुतिके मधून आलं ही मात्र बातमी आहे.
ReplyDelete