तीन बाजूला कृष्णानदीचा किनारा लाभलेलं खिद्रापूर हे गाव तिथे असलेल्या पुरातन कोपेश्वर मंदीरामुळे खरं तर उभ्या भारताला माहित असलं पाहिजे होतं. पण भारताचं जाऊद्या, महाराष्ट्राची भटकंती करणार्या बर्याच जणांना त्याची गंधवार्ताही नाही. मलासुद्धा माझे मित्र रत्नदिप पाटील यांच्या मुळे एवढ्या सुंदर जागेची माहिती मिळाली आणि लगोलग मी त्या अप्रतीम मंदिराला भेट दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर रल्वे स्टेशनला उतरून मी प्रथम नरसोबाच्या वाडीला गेलो. (दत्त अवतार नरसिंहसरस्वतींच दर्शन घेणं हा एक उद्देश होताच.) नरसोबाच्या वाडीहून कुरूंदवाड मार्गे खिद्रापूर हे अवघं १६ कि.मी. एवढंच अंतर पार केलं की आपण कोपेश्वराच्या प्राचीन मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिराच्या प्रवेश द्वारात येईपर्यंत आतील सौंदर्याची कल्पना येत नाही. पण आत नजर जाताच कोपेश्वर मंदिराचं अप्रतिम शिल्प नजरेश पडतं आणि आपण स्तिमीत होऊन जातो.
शैव आणि वैष्णवपंथाच्या एकात्मतेचं प्रतिक म्हणून या मदिराकडे पाहिलं जातं. सुमारे दिड हजार वर्षापुर्वी आपल्या देशात वास्तुशास्त्र आणि शिल्पकला किती बहराला आली होती त्याचा हे मंदिर म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. शंकराचं मंदिर असलं तरी सभामंडपात नंदी नाही आणि गाभार्यात शिवलिंगाजवळच विष्णूची प्रतिमा म्हणून शाळुंखा स्थापित केली आहे. मुख्यमंडपात असलेलं स्वर्गद्वार, तिथल्या खांबांवर आणि भिंतीवर असलेलं कोरीवकाम यातून जशा पुराणातल्या अनेक कथा जिवंत होतात तसच सोळा किर्तीमुखांचं उत्कृष्ट शिल्प नजरेस पडतं. स्वर्ग मंडप एकूण ४८ खांबांवर उभा आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस खाली गजपट्टी, वर शंकर, विष्णू, गणेश अशा अनेक देवदेवतांबरोबरच स्त्रि-पुरूषांची शिल्पं पहायला मिळतात.
अजंठा आणि वेरूळ इथल्या शिल्पकलेहून काकणभर सरसच असा असलेली हा शिल्पखजिना दुर्लक्षित झाला आहे हे मात्र नक्की.
सुंदर फोटो.
ReplyDeleteमी अनेकवेळा जाऊन आलो आहे, खिद्रापुर जवळच सदलगा हे माझे आजोळ !
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती.. कोल्हापूर बाजूला माझे विशेष फिरणे झालेले नाही... अजून अश्या काही जागा कळवा.. मी नक्की जाणार आहे... :)
ReplyDeleteराज नमस्कार, वा ! एवढ्या सुंदर ठिकाणाजवळ आपलं आजोळ आहे हे वाचून बरं वाटलं. मी गेलो होतो तेव्हा मंदिराच्या कंपाऊंडचं काम पुरातत्व खात्यातर्फे चालू होतं आता ते पुर्ण झालं असेल.
ReplyDeleteरोहन नमस्कार, खरच हे मंदिर फार छान आहे जरूर जा.
ReplyDeleteफार छान फोटो. अतिशय सुंदर ,
ReplyDeleteसुनिल, धन्यवाद. खिद्रापूर तसं आपल्याला जवळ आहे आणि त्या ठिकाणी एवढं सुंदर मंदिर आहे हे पाहून मी थक्कच झालो होतो.
ReplyDelete