skip to main |
skip to sidebar
मरगळलेलं मन, उदास वतावरण, काळजी, चींता अशा अनेक गोष्टींमुळे मनात मळभ दाटून येतं आणि नेमक्या त्याच वेळी एखाद्या मित्राचा फोन येतो.............. बोलणं संपतं.......... आणि आधी दाटून आलेले ते कृष्णमेघ पार नाहीसे होतात. लख्ख प्रकाश पडतो. आपण उत्साहने कामाला लागतो. उदास वाटणं किंवा उत्साही वाटणं या आपल्या मनाच्या आत दडलेल्या लाटा, कधी कुठची येवून थडकेल सांगणं कठीण. हेच मन मग आपल्याला विचारांच्या खोल खोल गर्तेत घेवून जातं. आणि तेवढ्याच वेगात तेच मन उभारी घेतं. असं होतं खरं. प्रिय व्यक्ती भेटणं, चांगले विचार, लेख वाचनात येणं, ‘
या जन्मावर... या जगण्यावर...... शतदा प्रेम करावे....’
सारखं गाणं, कारणं काहीही असोत पण मनाला उभारी येते, चैतन्याचा झरा पुन्हा वाहू लागतो हे महत्वाचं. आजच माझ्या मित्राचा फोन आला आणि मला अशी अनुभूती आली, ती आपल्या पर्यंत पोहोचवली एवढच.
हा न्याय आपल्या ब्लॉगमधील लेखनाला लागू पडतो. असेच लिहित रहा.
ReplyDeleteवाह..छान लिहिलंय.. मनापर्यंत पोहोचलं..
ReplyDeletemannab, नमस्कार. आपल्या अशा प्रकारच्या प्रतिक्रीयेमुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो. आभारी.
ReplyDeleteमहेंद्रजी, छान प्रतिक्रीया दिलीत. धन्यवाद.
ReplyDeleteमन उधान वा-याचे....
ReplyDeleteएक भावव्यथा समर्पक शब्दात मांडलीत. छान खुपच छान !
विजयजी, हे मनच आपल्या सर्व व्यवहारांवर अधिराज्य गाजवत असतं. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
ReplyDelete