आजच्या लोकसत्तामध्ये मुंबई-पुण्यात दूध पिशव्यांतून मिळते ‘विष’! हि बातमी वाचली. आम्ही गोकूळचं दूध घेतो. आता गोकूळ असो नाहीतर इतर कुठल्याही ब्रॅन्डचं ते दूध शुद्ध आहे का? असा प्रश्न पडतो (एकवेळ पाणी घातेलेलं चालेल पण रसायनयुक्त नको असं म्हणण्याची पाळी आली.) हल्ली जगण्याशी संबंधीत सगळ्याच क्षेत्रात सम्राट निर्माण झालेत. शिक्षण, बांधकाम, अन्न, भाजी-पाला, फळं, दूध सगळी क्षेत्रं या सम्राटांनी व्यापून टाकलीत. या समाज कंटकांचा जेवढा व्याप वाढत गेला तेवढं सामान्यांचं जगणं मुष्कील झालं आहे. पुर्वी पेपरात नावं छापून आली की अशा लोकांना थोडी तरी शरम वाटत होती आता ती ही वाटेनाशी झाली आहे. लोकसत्ताच्या वरील बातमीत या संबंधी कोण कोण राजकिय लोक संबंधीत आहेत त्यांची नावं आहेत. त्यात पुढील नावं आहेत कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर, परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे राजेश परजणे यांचा गोदावरी, साई संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांचा श्रीरामपूर, आमदार शंकरराव गडाख यांचा नेवासे, माजी मंत्री विजयसिंह मोहिते यांचा सोलापूर, भंडारा, त्याचबरोबर दिनशॉ, हल्दीराम, प्रभात, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा अशोक मिल्क आदींसह राज्यातील २२ प्रकल्पांनी हे रासायनिक दूध खरेदी केले. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी आता प्लँटचालकांचे पालकत्व घेऊन बैठक आयोजित केली आहे. राजकीय हस्तक्षेपाला भीक न घालणारे पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्यासाठी मात्र हा तपास एकप्रकारे आव्हान आहे. नगर जिल्ह्य़ात कारवाई झाली. मात्र, अन्य जिल्ह्य़ांत सुरू असलेल्या गोरखधंद्यावर कोण ‘प्रकाश’ टाकणार?
आपलं बिंग आता फुटणार असं समजताच हे राजकिय लोक सक्रीय झाले आहेत. यांना आवर कोण आणि कसा घालणार? मुख्य म्हणजे आपल्या घरात येणारं दूध हे भेसळयुक्त आहे का हे ओळखायचं कसं?
खरं हो काका. भेसळ असलेल्या कितीतरी गोष्टी ओळखण्याच्या काही युक्त्या आहेत पण भेसळयुक्त दूध...? मी जे दूध विकत आणायचे त्यालाह एक विशिष्ट वास यायचा म्हणून दुसर्या ब्रॅन्डचं दूध वापरायला सुरूवात केली, तर त्याची चवच खराब होती. असं काय मिसळत असतील हे लोक दुधामधे की दूध टेट्रा पॅकमधून काढलं नाही तर सहा सहा महिने टिकतं. त्या प्रिझर्वेटीव्व्हजचाच आपल्याला त्रास होत नसेल ना?
ReplyDeleteकांचन, या बातमीत लिहिल्याप्रमाणे असे बनते रासायनिक दूध!
ReplyDeleteफॉम्र्युला १ - रिकाम्या पाण्याच्या बाटलीत रंग नसलेले दोन प्रकारचे दोन लिटर रसायन अकराशे रूपयांना मिळते. ते घुसळून पाणी मिसळले की एक हजार लिटर म्हणजे स्थानिक बाजारपेठेत ११ हजार, तर महानगरांत २० हजारांचे दूध तयार होते. एका रसायनाला जय विरू, तर दुसऱ्याला जय हिरा म्हणतात. त्यात ग्लुकोज पावडर, दूध पावडर मिसळली की दूध तयार!
फॉम्र्युला २ - कॉस्टिक सोडा, शिलाई मशिनसाठी वापरले जाणारे लुप ऑईल, सोप डिर्टजट व कारवॉशचा वापर करून दूध बनविले जाते.
फॉम्र्युला ३ - सोयाबीन तेल, केमिकल्स पावडर व नैसर्गिक दुधाचे मिश्रण केले जाते. अनेकदा पांढरे ग्रीसही त्यात वापरले जाते. संकलकांकडे जमा होणाऱ्या दुधात ४० टक्के मिश्रण केले की दूध प्रकल्पात जाते. तेथे पुन्हा प्रक्रिया होते. १२ हजार लिटरच्या टँकरमध्ये ८ हजार लिटर नैसर्गिक दूध व ४ हजार लिटर पाणी वापरून त्यात रासायनिक किंवा दूध पावडर टाकली जाते. पिशव्यांतून ते महानगरांमध्ये खासगी प्रकल्पांमार्फत पोहोचते.
मरा किंवा मारा !
ReplyDeleteया काळाबाजार करणा-या निच नरधमानां आवर घालण्या इतक सबळ महाराष्ट्र सरकार नाही. आता जनतेनेच स्व:ताचे रक्षण केले पाहिजे. भेसळयुक्त दुध तयार करणा-यानां आपण काही करू शकत नाही कारण ते मोठे राजकारणी माणस आहेत. पण ते दुध विकणारे सेंटरवाले तर तुमच्या आमच्यातील सामान्यजणच आहेत. त्यांना चाप लावला पाहिजे. त्यांनीच जर अशा विषारी दूधाची विक्री नाही केली तर ते तयार करणा-यांना ही विचार करावा लागेल. समजुन नाही घेतल तर दुधाच्या पिशवीच्या ऐवजी त्यालाच फोडल पाहिजे. अस केल तर आणि तरच ही या राक्षसानां दहशत बसेल. अर्थात हे सगळ इतक सोप नाही हे ही तितकच खरं.
अन्यथा आपले मरण आपल्या डोळ्यानी पहाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
विजयजी, आपण म्हणता तसं विकणार्यांना चाप लावला पाहिजे हे खरच पण विकणारेसुद्धा भेसळ करत असतात. तेव्हा त्या दुधावर ग्राहकानीच बहिष्कार घातला पाहिजे. हे जरी असलं तरी घरात येणारं दूध हे भेसळयुक्त आहे की कसं हे समजायला काय उपाय आहे?
ReplyDeleteखरंय तुमचं पण हे दूध ओळखता येणं फार गरजेचं आहे. नेत्यांच्या शरमे विषयी न बोललेलंच बरं.
ReplyDeleteआशा जोगळेकर
आशाजी, राजकिय नेत्यांच्या बेशरमीची हद्द झाली, त्यांच्या विषयी काय बोलणार?
ReplyDeleteमला तरी हे शक्य आहे असे वाटत नाही.शेवटी आपण विश्वासावरच जगतो. आरे चं दुध काहीआमचा घरपोच वाला देत नाही. मग उरलं ते फक्त गोकुल, महानंद.. त्याची अवस्था तर सगळ्यांनाच माहिती आहे..
ReplyDeleteभेसळीचं वर्णन फार निराशाजनक आहे. अशाने कुठल्याच ब्रॅन्डचं दूध विकत घ्यावंसं वाटणार नाही.
ReplyDeleteमहेंद्रदा, आरेने तर मागे टाकाऊ दूधभुकटी परदेशातून मागवली आणि त्याचं दूध बनऊन विकलं होतं. ज्याने काळजी घ्यायची ते सरकार आणि त्याचे बगलबच्चेच भेसळ करताहेत.
ReplyDeleteकांचन, प्रॉब्लेम हाच आहे की खाव तरी काय?
ReplyDeleteहा भेसळ युक्त दुधाचा प्रकार फार वाढत आहे...विष आहे ते..छान माहितीपूर्ण लेख आहे...इस को रोके कैसे सर जी...!!
ReplyDelete- संतोष सावरगावकर जोशी
तोच तर कळीचा मुद्दा आहे. .इस को रोके कैसे ?
ReplyDeleteभेसळयुक्त दुध ओळखायचं असेल तर एक चमचा दुधात आयोडीनचा एक थेंब टाकावा जर दुधाला निळा रंग आला तर त्यात भेसळ आहे असं समजावं.
ReplyDeleteछान खुपच छान
ReplyDelete