स्थळ: शासकिय विद्यामंदिर खार, ड्राईंगची परिक्षा देण्यासाठी परिक्षार्थींची झुंबड उडालेली, त्यापेक्षा पालकांचीच जास्त गडबड. अगदी परिक्षेच्या हॉल मध्येच सगळ्यानी गर्दी केलीली असते. पहिली घंटा व्हायची वेळ आली तरी पालक मागे हटायला तयार नाहीत. अखेरपर्यंत आपल्या पाल्ल्याला अनेक सुचना देऊन ते पालक भंडाऊन सोडत होते. आता बाहेर चला किंवा तुम्हीच परिक्षेला बसा असा सुपरव्हीजन करण्यार्यांचा आर्त स्वर...... शेवटी कसं बसं सगळ्यांना बाहेर काढलं जातं.
पहिला पेपर वेळेच्या बर्याच आधी टाकून बच्चेमंडळी त्यांच्या आयासोबत शाळेच्या आवारातच गोंगाटाला सुरवात करतात. वर्गात बसून चित्र रंगवणार्यांना त्याचा त्रास होत असतो. जिकडे जागा मिळेल तिकडे बसून या आया आपल्या बछड्यांना खमण,ढोकळा, बर्गर, सॅन्डवीच भरवत असतात. थोड्याच वेळात त्या आवाराचं फुड मेळ्यात रुपांतर होतं. पुढच्या पेपराच्या वेळी पहिल्यावेळची पुनरावृत्ती. अशा पालकांची मुलं हॉल मध्ये आपले गुण दाखवत होतीच हे सांगायला नकोच.
आदल्या दिवशीच्या अनुभवामुळे दुसर्या दिवशी पालकांना आवारात प्रवेश दिला गेला नाही. पेपरचा वेळ पुर्ण होईपर्यंत मुलांचे पेपर घेतले गेले नाहीत. मधल्यावेळातही प्रवेश नाकारला गेला. पालकांनी दारवानाशी हुज्जत घातली. त्याने सरांचा हवाला दिला, “बुलाव तेरे सर को” अशी असभ्य भाषा केली गेली. मुख्याध्यापक आले आणि त्यानी मृदू स्वरात पण ठामपणे नकार दिला. हि गोजीरवाणी मग वैतागली. आत गेल्या वर दंगा केला, त्याना एका शिक्षकाने हाताला धरून निट वागण्याची सुचना केली. तर ती कारटी त्या शिक्षकानाच “तु कैसा हात पकडता है?” असं म्हणून त्यानाच आव्हान देऊ लागली. मुख्याध्यापकानी पुन्हा हस्तक्षेप केला.
सातवी आठवीतली ही मुलं त्या सेंटरवर परिक्षा द्यायला गेली होती कि पिकनीकला असा प्रश्न पडावा असं त्यांचं आणि त्यांच्या पलकांचं वागणं होतं. शिक्षकांशी सोडा पण मोठ्यामाणसांबरोबर कसं वागू नये याचा तो नमूना होता. हल्ली शाळांमधून मुलांना शिक्षा केली जात नाही. त्यात करून काही इंग्रजी शाळा या शाळा कमी आणि व्यापारकेंद्र जास्त, असा अनुभव येत चाललाय. बेशीस्त मुलांची गर्दी इथे वाढत चाललीय. पालक त्या मुलांचं “वो तो बडा सैतान है।“ अशा शब्दात कौतूक करणार. छडी वाजे छम् छम् नको पण किमान शिस्त या मुलांना कोण लावणार?
No comments:
Post a Comment